Father's Day 2025 Messages: बाबांचे प्रेम म्हणजे आभाळाएवढी माया! वडिलांना हे सुंदर मेसेज पाठवून साजरा करा खास दिवस

Happy Father's Day 2025 Messages: जून महिन्याच्या तिसऱ्या रविवारी फादर्स डे साजरा केला जातो. यानिमित्त वडिलांना खास मेसेज नक्की पाठवा.

जाहिरात
Read Time: 3 mins
Happy Father's Day 2025: वडिलांना पाठवा खास मेसेज!

Happy Father's Day 2025 Messages: वडील म्हणजे प्रत्येक लेक-लेकीसाठी सुरक्षाकवच आणि जीवनाचा आधारस्तंभ असतात. मुलांचे जीवन घडवण्यासाठी बाबा कोणत्याही संकटांचा न घाबरता सामना करतात. त्यांच्याशिवाय आयुष्याची कल्पना करणेही शक्य नाही. वडिलांची शिकवण आपल्याला प्रत्येक संकटाची परिस्थिती हाताळायला शिकवते. बाबा म्हणजे खऱ्या आयुष्यातील सुपरहिरो. वडिलांप्रति प्रेम, सन्मान व्यक्त करण्यासाठी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी (15th June 2025) 'फादर्स डे' (Father's Day 2025) साजरा केला. तुम्ही देखील वडिलांना खास मेसेज पाठवून त्यांचे आभार नक्की माना. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

फादर्स डे 2025 खास मेसेज (Happy Father's Day 2025 Wishes In Marathi)

1. बाबांचे अस्तित्व म्हणजे माझ्या प्रत्येक स्वप्नाची प्रेरणा
तुमच्यामुळेच मी जगायचे कसे ते शिकलो
संकटांचा धाडसाने सामना केला
तुमच्यावर आजही आहे माझे मनभरून प्रेम 

2. पप्पा तुमचे प्रत्येक कष्टाचे पाऊल
मला आजही आठवते
पितृ दिन म्हणजे तुमचे ऋण मान्य करण्याचा क्षण

3. बाबा तुमच्या शिकवणीचे आणि प्रेमाचे अस्तित्व कायम माझ्या मनात आहे
हॅपी फादर्स डे 2025!

Photo Credit: Canva

4. जगामध्ये सर्व काही मिळू शकते
पण वडिलांचं प्रेम आणि मार्गदर्शन कधीही काहीही बदलू शकत नाही
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

5. तुमचे माझ्यावरील प्रेम कधी शब्दांमध्ये उतरले नाही, पण तुमच्या कृतीतून ते कायम जाणवते
फादर्ड डे 2025 हार्दिक शुभेच्छा!

6. तुम्ही माझ्या पाठीवर दिलेली कौतुकाची थाप आजही मला आत्मविश्वास देते
बाबा आयुष्यभर तुमचे प्रेम असेच मला मिळत राहो
'फादर्ड डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

7. बाबा तुमचे माझ्यावर रागावणे लहानपणी मला गंभीर वाटायचे
पण आता कळते त्यातही माया आणि शिस्त होती
फादर्स डेच्या शुभेच्छा!

8. तुमचा येणारा फोन कॉल 
माझ्यासाठी उपदेश, चौकशी आणि काळजीचे डोस असतात
कायम असेच सोबत राहा बाबा
हॅपी फादर्स डे 2025!

Advertisement

9. बाबा म्हणजे देवदूत
जे नेहमी माझे संरक्षण करत आले आहेत
तुमचे आशीर्वाद सदैव माझ्यावर असू देत 
फादर्स डेच्या शुभेच्छा!

10. जसजसे वय वाढत आहे
तसतसे तुम्ही देवासारखे वाटू लागलात
शांत, संयमी, समजूतदार आणि रक्षण करणारे माझे बाबा
Happy Father's Day 2025 !

Advertisement

(नक्की वाचा: Happy Father's Day 2025 Wishes: जीवनाची योग्य दिशा दाखवणारे बाबा! फादर्स डेनिमित्त पाठवा खास मेजेस)

11. तुमच्या आशीर्वादाशिवाय माझे एक पाऊलही पुढे जाऊ शकत नाही 
देव तुमचे आरोग्य आणि आयुष्य उत्तम ठेवो
बाबा तुम्हाला पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

12. फक्त देवच सर्वत्र असू शकतो असे म्हणतात
पण मला देव कायम तुमच्यामध्ये जाणवतो 
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Photo Credit: Canva

13. बाबा म्हणजे देवाचेच रूप 
कुठेही न दिसता सर्व ईच्छा पूर्ण करणारे 
Happy Father's Day 2025

14. मी लहान असलो तरी तुमच्या कुशीत जगातलं सगळ्यात मोठं बळ वाटतं.
हॅपी फादर्स डे 2025!

15. बाबा आता म्हणतात "मी थकलोय"
पण माझ्यासाठी तुम्हीच अजून सुपरहिरो आहात!
हॅपी फादर्स डे 2025!

16. तुमच्या शब्दांमध्ये जरी थोडासा कठोरपण असायचा
तरी प्रत्येक वाक्यात एक प्रेमाचा सूर लपलेला असायचा 
हॅपी फादर्स डे 2025!

Photo Credit: Canva

17. तुमचं बोलणं अगदी कमी
पण कृतीतून दिसणारे प्रेम म्हणजे अगदी शंभर नंबरी सोने आहे

18. वाऱ्याला दिशा देणे शक्य नसते
पण वडिलांचे मार्गदर्शन आयुष्याला योग्य दिशा देत असते 
Happy Father's Day 2025 !

19. तुमच्या पावलांवर पाऊल ठेवणे चालणं म्हणजेच जीवनाचं शहाणपण शिकणे
बाबा, तुमच्या पावलांची दिशा आम्हाला कायम पुरो.
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Advertisement

20. वडिलांची मिठी म्हणजे सर्वात सुरक्षित ठिकाण
हॅपी फादर्स डे 2025!