जाहिरात

Happy Father's Day 2025 Wishes: जीवनाची योग्य दिशा दाखवणारे बाबा! फादर्स डेनिमित्त पाठवा खास मेजेस

Happy Father's Day 2025 Wishes: आईप्रमाणे बाबा देखील आपल्या जीवनातील महत्त्वाचा भाग असतात. आपले जीवन घडवण्यामध्ये त्यांचेही मोठे योगदान असते. फादर्स डेनिमित्त बाबांनी खास मेसेज नक्की पाठवा.

Happy Father's Day 2025 Wishes: जीवनाची योग्य दिशा दाखवणारे बाबा! फादर्स डेनिमित्त पाठवा खास मेजेस
Happy Father's Day 2025 Wishes: हॅपी फादर्स डे 2025!

Happy Father's Day 2025 Wishes In Marathi: दरवर्षी जून महिन्यातील तिसऱ्या रविवारी 'फादर्स डे' (Father's Day) म्हणजे 'पितृ दिन' साजरा केला जातो. यंदा 15 जूनला पितृ दिन साजरा केला जाणार आहे. हा दिवस अशा एका व्यक्तीचा सन्मान करण्यासाठी, प्रेम-कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो जे आपल्या कुटुंबाचे केंद्र असते शिवाय आपल्या जीवनाचा आधारस्तंभ देखील असतात. वडील मुलांवरील त्यांचे प्रेम जाहीरपणे व्यक्त करत नसेल तरीही त्यांचे मुलांवर निस्वार्थ आणि अपार प्रेम असते. वडिलांचे चांगले भविष्य घडावे म्हणून वडील कोणत्याही अडचणींना सामोरे जाण्यास तयार असतात. त्यांनी दिलेल्या शिकवणीमुळे तसेच शिस्तीमुळे मुलांच्या जीवनाचा पाया भक्कमरित्या रचला जातो. वडिलांनी (Happy Father's Day 2025 Wishes) केलेल्या त्याग आणि मेहनतीप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी 'फादर्स डे' (Happy Father's Day 2025 Wishes) साजरा केला जातो. फादर्स डे निमित्त वडिलांपर्यंत मनातील भावना पोहोचवण्यासाठी त्यांना खास मेसेज नक्कीच पाठवा. याकरिता आम्ही तुमच्यासोबत सुंदर शुभेच्छा संदेशांची यादी शेअर करत आहोत. 

पितृदिनाचे शुभेच्छा संदेश | Happy Father's Day 2025 Wishes

1. बाबांनी मला जगायला शिकवले
योग्य-अयोग्याचे भान मला बाबांनी दिले
माझ्या आयुष्याला योग्य दिशा दाखवली
तुमच्या मार्गदर्शनाशिवाय बाबा मी काहीच नव्हतो
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

2. वडील म्हणजे कुटुंबाचा आधारस्तंभ
बाबांनी आम्हा सर्वांसाठी जे काही केले
त्या गोष्टी शब्दांत मांडणं अशक्यच
आज तुमच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा आहे दिवस
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

3. जगात कोणीही कितीही मार्गदर्शन केले 
तरी वडिलांच्या एका शब्दांत जितकी ताकद असते तितकी कशातच नसते
'फादर्स डे'निमित्त बाबा तुमचे मनापासून खूप आभार! 

4. आई प्रेमाचे दुसरे नाव 
तर बाबा म्हणजे विश्वास आणि ताकदीचे जग 
वडिलांच्या प्रेमाच्या सावलीत मोठे होणे म्हणजे आयुष्यभराचे वरदान
हॅपी फादर्स डे 2025!

5. पितृ दिन म्हणजे आदर्श पित्याचे आभार मानण्याचा छोटासा प्रयत्न
तुमचे प्रेम आणि शिस्त कायम आमच्यासोबत राहतील बाबा
Happy Father's Day 2025

6. तुमच्या कठोर शिस्तीने कधीतरी मला रडवलं असेल 
पण आज समजतंय की तिच माझी खरी ताकद होती 
बाबा तुमचा प्रत्येक शब्द माझ्यासाठी दिशादर्शकासारखाच 
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

7. आईच्या मिठीत माया असते 
बाबांच्या स्पर्शात आत्मविश्वास 
तुमचे अस्तित्वच माझ्यासाठी आहे जगण्याची प्रेरणा
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा! 

8. तुमच्या शिकवणीतून बाबा मी जगाशी लढायला शिकलो
जीवनात कोणत्याही संकटासमोर कधीच नाही झुकलो आणि ना झुकणार
कारण माझ्या पाठीशी आहेत बाबा 
Happy Father's Day 2025

फादर्स डेनिमित्त इन्स्टाग्रामसाठी कॅप्शन | Happy Father's Day 2025 Instagram Captions

9. माझी ओळख तुझ्यामुळेच आहे पप्पा 
माझ्या आयुष्यात तुमचे स्थान काय आहे
हे शब्दांत कसे सांगू? 
राहण्यासाठी पायाखाली आहे जमीन
पण माझ्यासाठी तुम्ही आभाळ आहात बाबा 
Happy Father's Day 2025

10. माझ्या जीवनातील तुमचे अस्तित्व हे माझी आहे ताकद 
आज मी जे काही ते केवळ माझ्यावरील तुमच्या संस्कारांमुळे 
पितृ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

11. बाबांचे जीवन हेच माझ्यासाठी आहे प्रेरणादायी पुस्तक 
तुमच्या कृतीतून तुम्ही आम्हाला शहाणपण शिकवले
तुमचे आभार मानण्यासाठी शब्दही अपुरे आहेत
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

12. आयुष्यात मी प्रत्येक उंची गाठू शकलो 
पण जेव्हा बाबांनी मिठीत घेतले 
तेव्हा आभाळाला स्पर्श केल्यासारखे वाटले
Happy Father's Day 2025

13. तुमचे हसणं, प्रेम आणि महत्त्वाचे म्हणजे पाठबळ
आयुष्यात या गोष्टी जीवनात असतील तर कोणतीही अडचण कधीच मोठी वाटणार नाही
बाबा प्रत्येक गोष्टीसाठी खूप खूप धन्यवाद 
'फादर्स डे'च्या शुभेच्छा!

14. बाबांच्या प्रेमाची आणि कष्टांची तुलना कोणत्याही गोष्टीशी करता येणार नाही
तुमचे प्रत्येक पाऊल माझ्यासाठी आहे प्रेरणा 
Happy Father's Day 2025

15. आई जीवन जगायला शिकवते
बाबा जीवन जगण्यासाठी शिस्त आणि मूल्य शिकवतात
तुमची शिकवण आयुष्यभर कायम आमच्यासोबत राहणार 
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

16. तुमचे प्रेम नेहमी अबोल असते बाबा
पण त्यातली ऊब कायम जाणवते
बाबा तुमच्यामुळेच आज मी आत्मविश्वासाने उभा आहे
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

17. फादर्स डे म्हणजे केवळ एक दिवस नसतो 
तुमच्यासारख्या वडिलांचे आभार मानण्यासाठी 
कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक खास क्षण असतो 
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

18. बाबांची कठोर शिस्त
डोक्यावरील मायेचे हात 
दाखवलेली प्रत्येक वाट ठरली यशस्वी
हॅपी फादर्स डे 2025!

फादर्स डेच्या शुभेच्छा |Happy Father's Day 2025 Short Messages

19. सर्वसामान्य वाटणाऱ्या बाबा तुमच्या गोष्टी
आज जेव्हा मी झालो मोठा 
तेव्हा त्यांचे खरे मूल्य समजले 
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

20. बाबा म्हणजे संयम आणि संस्कारांची शाळा
'फादर्स डे'निमित्त बाबा तुमचे खूप खूप आभार  

21. तुमचे प्रेम म्हणजे वादळ
कधी सौम्य, कधी कठोर तर कधी रुक्ष
पण नेहमीच संरक्षण करणारे
बाबांचे मानावे तितके आभार कमीच
'फादर्स डे'च्या हार्दिक शुभेच्छा!

22. ज्यांच्या डोक्यावर वडिलांचा हात असतो 
ते असतात भाग्यवान 
वडील सोबत असतील तर प्रत्येक हट्ट देखील होतो पूर्ण  
Happy Father's Day 2025

23. कधी-कधी तुम्ही खूपच कठोर वागलात
पण आता समजतंय की त्या कठोरपणामुळेच 
मला जीवनातल्या कठीण प्रसंगांना मी धैर्याने सामोरे गेलो 

24. वडील म्हणजे कडुलिंबाचे झाड
त्यांच्या पानांमध्येही कडवटपणा
पण वृक्षाची छाया असते थंडावा देणारी
Happy Father's Day 2025

फादर्स डे व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस  | Happy Father's Day 2025 WhatsApp Status

25. तुमच्यासोबत उभे राहिले की या जगाची भीती वाटत नाही 
बाबा आहेत म्हणूनच आम्ही आहोत
फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

26. आई शिकवते प्रेम
बाबा शिकवतात धैर्य
या दोघांच्या बळ आणि मायेने मला हरणेच शिकवलं नाही

27. बाबा तुमचं अस्तित्व 
माझ्या जीवनाचे रक्षण करणारी ढाल आहे 
पितृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

28. लहानपणी तुमचा हात पकडून चालायला शिकलो
प्रत्येक संकटांचा सामना करायला शिकलो
जेव्हा कधी धडपडलो तेव्हा-तेव्हा तुम्ही दिले प्रोत्साहन
वडिलांमुळे माझे आयुष्य आहे खूप सुंदर 
Happy Father's Day 2025

29. बाबांनी व्यक्त न केलेले प्रेम
दिलेल्या शिस्तीमुळे खऱ्या अर्थाने मी घडलोय 
फादर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा!

30. बाबा एक आधारस्तंभ आहेत, एक विश्वास आहात तुम्ही
तुमच्यामुळे अस्तित्व आहे माझे, तुम्ही आहात माझी शान 
हॅपी फादर्स डे 2025!

Listen to the latest songs, only on JioSaavn.com