Fatty Liver Food: फॅटी लिव्हरने त्रस्त आहात? काय खावे आणि काय टाळावे? डॉक्टरांनी दिली 5 हेल्दी स्नॅक्सची यादी

Fatty Liver Food: फॅटी लिव्हरच्या समस्येमध्ये काय खावे? सौरभ सेठी यांनी लिव्हर निरोगी ठेवण्यासाठी पाच सर्वोत्तम पदार्थांची माहिती दिली आहे. सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Fatty Liver Food: फॅटी लिव्हरच्या समस्येमध्ये काय खावे आणि काय टाळावे?"
Canva
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • फॅटी लिव्हर असलेल्या लोकांनी आहारात अव्होकॅडोचा समावेश करावा कारण त्यात चांगली चरबी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात
  • पनीर आणि मोझारेला चीजमध्ये प्रोटीन व कॅल्शियम भरपूर असल्यामुळे ते स्नॅक्स म्हणून उपयुक्त ठरतात
  • बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, चिया आणि अळशीच्या बियांचा सेवन फॅटी लिव्हरवर सकारात्मक परिणाम करू शकतो
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Fatty Liver Food: फॅटी लिव्हर (Fatty Liver) या समस्येने ग्रस्त असलेले लोक अनेकदा याच विचारात असतात की आहारामध्ये नेमक्या कोणत्या पदार्थांचा समावेश करावा आणि करू नये. AIIMS, हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड यासारख्या नामांकित संस्थांमधून शिक्षण घेतलेले प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट (Gastroenterologist) डॉ. सौरभ सेठी यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम हँडलवर याबाबत अतिशय माहितीपूर्ण व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओद्वारे त्यांनी लिव्हर निरोगी ठेवण्यास मदत करणाऱ्या पाच पदार्थांबाबत माहिती दिली आहे. 

फॅटी लिव्हरमध्ये काय खावे?

1. अव्होकॅडो (Avocado)

अव्होकॅडोमध्ये हेल्दी फॅट्स (चांगली चरबी), फायबर आणि व्हिटॅमिन ई सारखे अँटी-ऑक्सिडंट्स आढळतात. हे शरीरात जमा झालेली खराब चरबी (Bad Fat) कमी करण्यास आणि इन्सुलिन रेझिस्टन्स (Insulin Resistance) नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. जर तुम्हाला याची चव वाढवायची असेल तर तुम्ही त्यात थोडे मीठ आणि काळी मिरी घालू शकता.

Advertisement

(नक्की वाचा: Fatty Liver: सावधान! जे तुम्ही हेल्थ ड्रिंक समजून पिताय तोच ज्युस लिव्हर खराब करतोय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा)

2. पनीर किंवा मोझरेला चीज (Paneer Or Mozzarella Cheese)

पनीर आणि मोझरेला चीजमध्ये प्रोटीन- कॅल्शियम चांगल्या प्रमाणात असते. त्यामुळे आहारामध्ये तुम्ही साधे पनीर किंवा चीज स्टिकचा स्नॅक्समध्ये समावेश करू शकता. 

3. नट्स आणि बिया (Nuts and Seeds)

डॉ. सौरभ यांनी सांगितले की बदाम, अक्रोड, सूर्यफुलाच्या बिया, चिया सीड्स आणि अळशीच्या बिया यामध्ये हेल्दी फॅट्ससह प्रोटीन मोठ्या प्रमाणात असते. यापैकी काही बियांचे भाजून किंवा कच्च्या स्वरुपातही सेवन केले जाऊ शकते. 

(नक्की वाचा: गोड रसाळ फळात लपलंय 'हे' धोकादायक रसायन, कसं आणि कोणत्या वेळेस खाल्ल्यास बनते विष? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा)

4. ग्रीक योगर्ट (Greek Yogurt)

डॉक्टरांच्या मते ग्रीक योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स आणि हाय-क्वॉलिटी प्रोटीन असते, जे आतडे आणि लिव्हर दोन्हीच्या आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते. हे बेरीज किंवा नट्ससोबत खाल्ले जाऊ शकते.

5. भाज्यांच्या स्टिक्स (Vegetable Sticks)
काकडी आणि सेलरी (Celery) यासारख्या भाज्यांच्या स्टिक्स ह्युमससोबत (Hummus) सोबत खाल्ल्या जाऊ शकतात. याद्वारे शरीराला फायबर आणि प्रोटीनचा पुरवठा होईल, ज्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते.

Advertisement

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)