जाहिरात

गोड रसाळ फळात लपलंय 'हे' धोकादायक रसायन, कसं आणि कोणत्या वेळेस खाल्ल्यास बनते विष? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा

Lychee Side Effects: रसाळ आणि गोड लीची रिकाम्या पोटी किंवा जास्त प्रमाणात खाताय? आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. शास्त्रज्ञांनी काय सल्ला दिला आहे, जाणून घ्या.

गोड रसाळ फळात लपलंय 'हे' धोकादायक रसायन, कसं आणि कोणत्या वेळेस खाल्ल्यास बनते विष? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा
"Lychee Side Effects: रिकाम्या पोटी लीची खाणे आरोग्यासाठी महाग पडेल का?"
Canva
  • लीचीमध्ये व्हिटॅमिन सी, फायबर, पोटॅशियम आणि नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असते
  • लीचीचे नियमित आणि संतुलित सेवन त्वचा, हृदय, रक्तवाहिन्या आणि पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते
  • कच्च्या किंवा अर्धवट पिकलेल्या लीचीमध्ये असलेली विशिष्ट रसायने रिकाम्या पोटी खाल्ल्यास ब्लड शुगर कमी करू शकतात

Lychee Side Effects: उन्हाळा सुरू होताच बाजारात आंबा, कलिंगड, खरबूज आणि लीची यासारख्या फळांची आवक वाढते. यामध्ये लीची हे गोड, रसाळ फळ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडते. न्युट्रिशनिस्टच्या मते लीची फळामध्ये व्हिटॅमिन आणि अँटी-ऑक्सिडंट्सचं प्रमाणही जास्त असते. पण एकीकडे हे फळ शरीराला फायदा पोहोचवत असले तरी दुसरीकडे यामुळे आरोग्याला नुकसानही पोहोचू शकते.

लीची फळ आरोग्यासाठी का फायदेशीर आहे? | Lychee fruit side effects

लीचीमध्ये व्हिटॅमिन सी जास्त प्रमाणात असते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती (इम्युनिटी) मजबूत होण्यास मदत मिळते. याव्यतिरिक्त लीचीमध्ये फायबर, पोटॅशियम, कॉपर आणि अनेक प्रकारचे नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स असतात. यामुळेच लीची त्वचा, हृदयासह संपूर्ण आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते.  

लीची खाल्ल्यास शरीराला कोणते फायदे मिळतात? | Lychee Fruit Benefits

वैज्ञानिकांच्या मते लीचीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी शरीरात 'कोलेजन' तयार करण्यास मदत करते. कोलेजन हे एक असे प्रोटीन आहे जे त्वचा, हाडे आणि रक्तवाहिन्या मजबूत ठेवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. तसेच यातील फायबर पचनसंस्था सुधारण्यास मदत करते. फायबर आतड्यांची समस्या दूर करण्यासह बद्धकोष्टता यासारख्या त्रासापासून आराम देते. पोटॅशियम हृदय आणि रक्तदाबासाठी (ब्लड प्रेशर) फायदेशीर मानले जाते, कारण ते शरीरातील द्रवांचे (फ्लुइड्स) संतुलन राखण्यास मदत करते.

(नक्की वाचा : Uric Acid Control Tips: 'मी फक्त डाळ खातो,तरीही युरिक अ‍ॅसिड का वाढतंय?' जाणून घ्या काय खावे आणि काय टाळावे)

लीची कधी ठरू शकते आरोग्यासाठी हानिकारक? |  Lychee poisoning facts

संशोधनातील माहितीनुसार कच्च्या किंवा अर्धवट पिकलेल्या लीचीमध्ये काही नैसर्गिक रसायने असतात. ज्यामध्ये 'हायपोग्लायसिन-ए' आणि 'मेथिलीन सायक्लोप्रोपाइल ग्लायसिन' यासारख्या घटकांचा समावेश असतो. सामान्यतः हे घटक लोकांसाठी मोठी समस्या निर्माण करत नाहीत, पण काही विशिष्ट परिस्थितींमध्ये त्यांचा परिणाम गंभीर होऊ शकतो. उदाहरणार्थ दीर्घकाळ भुकेले राहणे किंवा सकाळी रिकाम्या पोटी जास्त प्रमाणात लीची खाणे.

(नक्की वाचा : Ayurveda Wheat Eating Rules: रोज गव्हाची पोळी खाताय? पीठ चाळताय? कोंडा फेकताय? मग डॉ. पै यांनी सांगितले आयुर्वेदाचे 3 नियम वाचाच)

शास्त्रज्ञांचे काय म्हणणे आहे?

शास्त्रज्ञांच्या मते शरीराला ऊर्जेसाठी ग्लुकोजची गरज असते. जेव्हा एखादी व्यक्ती जेवण करत नाही, तेव्हा शरीर आधीपासून साठवून ठेवलेली ऊर्जा वापरते. पण जर शरीरातील ऊर्जेचा साठा आधीच कमी असेल, तर समस्या वाढू शकते. लीचीमध्ये असलेली काही रसायने शरीराच्या त्या प्रक्रियेवर परिणाम करू शकतात, ज्याद्वारे शरीर आवश्यकतेनुसार नवीन ग्लुकोज तयार करते. परिणामी रक्तातील साखरेची पातळी (ब्लड शुगर लेव्हल) वेगाने कमी होऊ शकते. या स्थितीला 'हायपोग्लायसीमिया' म्हटले जाते.

लीची ब्लड शुगर कशी कमी करते?

जेव्हा ब्लड शुगर खूप जास्त कमी होते, तेव्हा त्याचा सर्वात मोठा परिणाम मेंदूवर होतो. मेंदू ऊर्जेसाठी प्रामुख्याने ग्लुकोजवर अवलंबून असतो. जर पुरेशा प्रमाणात ग्लुकोज मिळाले नाही तर अशक्तपणा, चक्कर येणे, बेशुद्ध होणे किंवा फिट्स येणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार लीचीची समस्या तेव्हाच उद्भवते जेव्हा ती रिकाम्या पोटी, अतिशय जास्त प्रमाणात किंवा कुपोषण यासारख्या परिस्थितीत खाल्ली जाते. एक सामान्य आणि निरोगी व्यक्ती जर जेवणानंतर संतुलित प्रमाणात लीचीचे सेवन करत असेल तर त्याला या फळातील व्हिटॅमिन, पोषक घटक आणि अँटी-ऑक्सिडंट्सचा शरीराला पूर्ण लाभ मिळतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

(Content Source IANS)

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com