भूक ही नैसर्गिक असते. एखादी व्यक्ती तिच्या वेळेत जेवली नाही किंवा उशीर केला तर भूक लागते. सर्वसाधारणपणे एक व्यक्ती दिवसभरात तीन वेळा जेवते. आणि त्या जेवणाच्या वेळात दोन वेळा स्नॅक्स म्हणून काहीतरी खाते. मात्र अनेकदा एखाद्याला अवेळी किंवा वारंवार भूक लागत असल्याचं दिसून येतं. असं केव्हातरी होणं ठीक परंतू नियमित किंवा वारंवार होत असेल तर त्यामागे गंभीर कारणं असू शकतात. आहारतज्ज्ञ सौम्या लुहाडिया यांनी याबाबत लोकांना अलर्ट केलंय, सौम्या यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून काही टिप्स आणि ट्रिक्स शेअर केल्या आहेत. या टिप्स आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. सध्या सौम्या यांचा असाच एक व्हिडिओ चर्चेत आहे, या व्हिडिओ त्यांनी वारंवार भूक लागण्यामागील कारणांचा ऊहापोह केला आहे.
वारंवार भूक लागण्याची कारणं...
आहारतज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, जर तुम्ही कमी जेवत असाल तर तुम्हाला वारंवार भूक लागू शकते. जेवताना कमी खाल्ल्याने आपल्या शरीरातील लेप्टिन आणि सिरोटोनिन पातळी बिघडते. जर तुम्ही नाश्ता, दुपारचं जेवणं किंवा रात्रीच्या जेवणात पुरेसं अन्न खाल्लं नाही तर तुम्हाला वारंवार भूक लागू शकते.
नक्की वाचा - अमेरिकेत विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर 'टिकटॉक' अटॅक, शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण
शरीरात पाण्याचं प्रमाण कमी झाल्यानंतर भुकेची इच्छा जागते. कारण अनेकदा तुम्हाला भूक नाही तर तहान लागलेली असते. मात्र आपला मेंदू गोंधळतो आणि तहानेला भूक समजतो. अशावेळी पुरेशा प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे.
अपुऱ्या झोपेमुळेही भूक वाढू शकते. अपुऱ्या झोपेमुळे अनेक हार्मोन्स उदाहरणार्थ ग्रेलिन आणि लेप्टिन गोंधळतात आणि अवेळी भूक लागते. त्यामुळे चांगली झोप घेणं आवश्यक आहेत