जाहिरात

Changes From August: केड्रिट कार्ड ते UPI... 1 ऑगस्टपासून 'हे' 5 नियम बदलणार, आत्ताच जाणून घ्या

Changes From 1 August 2025: 1ऑगस्ट 2025 पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, जे तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात.

Changes From August: केड्रिट कार्ड ते  UPI... 1 ऑगस्टपासून 'हे' 5 नियम बदलणार, आत्ताच जाणून घ्या

Rules Change From 1st August 2024:  1ऑगस्ट 2025 पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, जे तुमच्या खिशावर आणि दैनंदिन जीवनावर परिणाम करू शकतात. यामध्ये क्रेडिट कार्ड, UPI, LPG, CNG, बँक सुट्ट्या आणि विमान इंधनाच्या किमतींचा समावेश आहे. या नव्या बदलांचा तुमच्या खिशावर, दैनंदिन कामकाजात कसा परिणाम होईल, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे, जेणेकरून तुम्ही तुमचे बजेट नियोजन करू शकाल आणि पुढील महिन्यात होणारा कोणताही आर्थिक त्रास टाळू शकाल.

क्रेडिट कार्डशी संबंधित बदल

क्रेडिट कार्डशी संबंधित महत्त्वाचे बदल होत आहेत. जर तुम्ही SBI कार्ड वापरत असाल तर 1 ऑगस्टपासून काही को-ब्रँडेड कार्डवरील मोफत हवाई अपघात विमा संपेल. आतापर्यंत SBI, UCO बँक, सेंट्रल बँक, PSB, करूर वैश्य बँक आणि अलाहाबाद बँक यांच्यासह, काही कार्डांवर 50 लाख ते 1 कोटी रुपयांपर्यंतचे विमा कव्हर देत होते. आता ही सुविधा बंद केली जात आहे, ज्यामुळे कार्डधारकांना धक्का बसू शकतो.

Surya Grahan: शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण कधी लागणार? 6 मिनिट 22 सेकंदासाठी जग अंधारात बुडेल

गॅस दरात बदल: LPG आणि व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत बदल होऊ शकतो. दर महिन्याप्रमाणे  1 ऑगस्ट रोजी तेल कंपन्या सिलिंडरच्या किमती निश्चित करतात. जुलैमध्ये 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 60 रुपयांनी कमी करण्यात आली होती, परंतु एलपीजीची किंमत तशीच राहिली. आता 1 ऑगस्ट रोजी एलपीजी स्वस्त होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे घरगुती बजेटला दिलासा मिळेल.

UPI पेमेंटमध्ये बदल: यूपीआय द्वारे पेमेंट करणाऱ्यांसाठी नवीन नियम लागू होतील. जर तुम्ही पेटीएम, फोनपे किंवा गुगल पे वापरत असाल तर नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने काही मर्यादा घातल्या आहेत. आता तुम्ही दिवसातून फक्त 50 वेळा बॅलन्स तपासू शकाल आणि मोबाईल नंबरशी लिंक केलेले बँक खाते 25 वेळा तपासू शकाल.

नेटफ्लिक्स किंवा म्युच्युअल फंड हप्ते यासारखे ऑटोपे व्यवहार आता दिवसातून तीन वेळा टाइम स्लॉटमध्ये प्रक्रिया केले जातील. सकाळी 10 वाजण्यापूर्वी, दुपारी 1 ते संध्याकाळी 5आणि रात्री 9.30  नंतर. अयशस्वी व्यवहारांची स्थिती दिवसातून फक्त 3 वेळा तपासता येईल आणि प्रत्येक चेकमध्ये 90 सेकंदांचे अंतर असेल.

Night Shift: रात्रपाळी करणाऱ्यांमध्ये वाढतेय प्रजनन क्षमतेसंबंधी समस्या, तज्ज्ञांचा गंभीर इशारा

सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीत बदल
एप्रिल 2025 पासून त्यांच्या किमती बदललेल्या नाहीत, जेव्हा मुंबईत सीएनजी ७९.५० रुपये प्रति किलो आणि पीएनजी ४९ रुपये प्रति युनिट होता. आता 1 ऑगस्ट रोजी किमती बदलण्याची अपेक्षा आहे.

पुढच्या महिन्यात अनेक बँक सुट्ट्या असतील
ऑगस्टमध्ये बँक सुट्ट्यांची यादी बाहेर आली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया दर महिन्याला सण आणि महत्त्वाच्या तारखांवर आधारित सुट्ट्या निश्चित करते, ज्या वेगवेगळ्या ठिकाणी बदलू शकतात. ऑगस्ट महिन्यात 16 दिवस बँक सुट्ट्या असतील.

एटीएफच्या किमती
1 ऑगस्ट रोजी विमान इंधनाच्या म्हणजेच एटीएफच्या किमती देखील बदलू शकतात. याचा विमान तिकिटांच्या किमतींवर परिणाम होऊ शकतो. या बदलांमुळे तुमचा मासिक खर्च वाढू शकतो, म्हणून आगाऊ नियोजन करा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com