
Solar Eclipse August 2: 2025 मध्ये 21 सप्टेंबरला सूर्यग्रहण लागणार आहे. त्याच वेळी, लोकांमध्ये 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणाबाबत गोंधळ आहे. या दिवशी पृथ्वी अंधारात जाईल असं म्हटलं जात आहे. मात्र शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण 2025 मध्ये नाही तर 2 ऑगस्ट 2027 रोजी होणार आहे. Space.com नुसार, 2027 मध्ये होणारे सूर्यग्रहण हे 21 व्या शतकातील सर्वात मोठे सूर्यग्रहण असेल. असे सूर्यग्रहण यापूर्वी 1991 मध्ये झाले होते आणि असे ग्रह, इण पुढे 16 जुलै 2114 रोजी होईल. 2025 मध्ये 21 सप्टेंबर रोजी सूर्यग्रहण होणार आहे. पण, येथे ज्या सूर्यग्रहणाबद्दल बोलले जात आहे ते हे नाही. त्याचवेळी, 2 ऑगस्ट रोजी होणाऱ्या सूर्यग्रहणामुळे पृथ्वीवर अंधार पडेल असा लोकांमध्ये संभ्रम आहे.
साल 2027 मध्ये शतकातील सर्वात मोठं सूर्यग्रहण | Eclipse Of The Century
2 ऑगस्ट 2027 रोजी होणारे हे सूर्यग्रहण सुमारे 6 मिनिटे 22 सेकंदांचे असेल. या सूर्यग्रहणादरम्यान, चंद्र सूर्याला पूर्णपणे झाकून टाकेल.
11 देशात होणार अंधारजया सूर्यग्रहणाचा परिणाम सुमारे ११ देशांवर होईल. एकूण सूर्यग्रहण ११ देशांमध्ये दिसेल. यातील बहुतेक देश उत्तर आफ्रिका आणि मध्य पूर्वेतील आहेत. हे पूर्ण सूर्यग्रहण स्पेन, जिब्राल्टर, अल्जेरिया, मोरोक्को, ट्युनिशिया, लिबिया, सौदी अरेबिया, येमेन, सुदान, इजिप्त आणि सोमालिया येथून दिसेल. याशिवाय, आंशिक सूर्यग्रहण आफ्रिका, युरोप आणि दक्षिण आशियामधून दिसेल. हे सूर्यग्रहण उर्वरित जगातून दिसणार नाही.
भारतातून सूर्यग्रहण दिसेल का?
२०२७ मधील पूर्ण सूर्यग्रहण भारतातून अंशतः दिसेल, म्हणजेच या दिवशी भारतात अंशतः सूर्यग्रहण दिसेल आणि भारताच्या कोणत्याही भागातून पूर्ण सूर्यग्रहण दिसणार नाही. राजस्थान, गुजरात, गोवा आणि महाराष्ट्रातून अंशतः सूर्यग्रहण दिसेल.
सूर्यग्रहण कधी लागणार?भारताच्या वेळेनुसार, या सूर्यग्रहणाची वेळ सायंकाळी 4 ते 6 वाजेपर्यंत असेल.
पूर्ण सूर्यग्रहण काय असतं?सूर्यग्रहण ही एक खगोलीय घटना आहे. ज्यामध्ये चंद्र, सूर्य आणि पृथ्वीमध्ये घडते. सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येते तेव्हा पूर्ण सूर्यग्रहण लागतं. या स्थितीत सूर्य पूर्णपणे झाकला जातो. अशात सूर्याचा प्रकाश रोखला जातो आणि ज्या भागातून हे सूर्यग्रहण पाहता येते त्या भागात अंधार पसरतो.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world