स्मार्टवॉच आता आपल्या आयुष्यातील एक महत्त्वपूर्ण भाग बनला आहे. स्मार्टफोनवरुन कॉलला उत्तर देणं असो की हातात बांधून वॉक करणं असो... स्मार्टवॉचशिवाय मनगट अपूर्ण वाटू लागलं आहे. सध्या मार्केटमध्ये विविध कंपनीचे, चांगल्या फिचरसह फिटनेस बँड उपलब्ध आहेत. तुम्हालाही नवं स्मार्टवॉच खरेदी करायचं असेल तर तुमच्यासाठी जबरदस्त डील आहे. प्रसिद्ध बियरबल ब्रँड Fire-Boltt च्या स्मार्टवॉचवर सध्या चांगली सवलत मिळत आहे. कंपनीच्या Fire-Boltt Talk स्मार्टवॉच Amazon वर 92% डिस्काउंटसह खरेदी करता येऊ शकेल. या जबरदस्त डिलविषयी जाणून घेऊया...
Fire-Boltt Talk Bluetooth Calling Smartwatch Amazon Discount Offer
Fire-Boltt Talk ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉच सध्या स्वस्त दरात खरेदी करण्याची संधी आहे. या स्मार्टवॉचचा MRP 11,999 रुपये लिस्टेड आहे. मात्र Amazon वर हे स्मार्टवॉच केवळ 999 रुपयात खरेदी करता येऊ शकेल. कंपनी या स्मार्टवॉचवर 92% सवलत देत आहे. इतकच नाही तर यसह तुम्हाला बँकेकडूनही ऑफर मिळू शकेल. mazon Pay ICICI Bank क्रेडिट कार्डातून याची खरेदी केली तर 5% कॅशबॅकही मिळेल.
Fire-Boltt Talk Bluetooth Calling Smartwatch Specifications
Fire-Boltt Talk ब्लूटूथ कॉलिंग स्मार्टवॉचमध्ये 1.39 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. ज्याला TFT LCD डिस्प्ले आहे. फुल टच डिस्प्ले असून यात 240x240 पिक्सल रिजॉल्यूशन सपोर्टेड आहे. यामध्ये डुअल बटन आहे. स्मार्टवॉचमध्ये हँड्स ऑन वॉयस असिस्टेंट देण्यात आला आहे. कंपनीच्या या स्मार्टवॉचमध्ये 120 हून अधिक स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. यामध्ये बिल्ट-इन माइक आणि स्पीकरदेखील आहे. ज्यामुळे स्मार्टफोनला कनेक्ट झाल्यानंतर यामधून कॉलला उत्तर देता येऊ शकतं.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world