Fish Eating : मनसोक्त खा! मासे खाणाऱ्यांच्या सर्वात मोठ्या अडचणीवर 5 जबरदस्त उपाय, पाहा लिस्ट

Fish bone stuck in Throat : तुमच्यासोबत असं काही घडलं तर काही घरगुती उपायांनी तुमची सुटका होऊ शकते.

जाहिरात
Read Time: 2 mins


Ghashat kata adkala tar kay karal मस्तपैकी माशांवर ताव मारत असाल आणि अचानक घशात काटा अडकला तर...? सर्वसाधारणपणे मासे खाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला याचा अनुभव आला असेल. घशात काटा अडकल्यानंतर आधी अस्वस्थ वाटू लागतं आणि नंतर जोरजोरात खोकला येऊ लागतो. मात्र घाबरण्याचं कारण नाही. कारण घाबरल्याने परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. तुमच्यासोबत असं काही घडलं तर काही सोप्या घरगुती उपयायांनी तुमची यातून सुटका मिळू शकेल.  घशात काटा अडकला तर काय करायला हवं? 

घशात माशाच्या काटा अडकला तर सर्वात आधी ही ५ कामं करा...

१ जोरजोरात खोकू नका...

सर्वात आधी घाबरू नका. जोरात खोकला येत असेल तर त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न करा आणि हळूहळू खोका. अनेकदा काटा तोंडाच्या वरच्या बाजूला अडकलेला असू शकतो, खोकल्यामुळे तो बाहेर निघून जाऊ शकतो. जास्त जोरात खोकू नका, अन्यथा तोंडात जखम होऊ शकते. 

२ केळं खा

काट्यावर केळ खाणं हा चांगला उपाय आहे. केळ्याचा एक मोठा तुकडा घ्या आणि न चावता गिळण्याचा प्रयत्न करा. केळं गुळगुळीत आणि चिकट असतं, त्यामुळे काटा केळ्यामध्ये अडकण्याची शक्यता अधिक आहे. 

३ ब्रेड आणि दूध

ब्रेड (चपातीचा तुकडाही घेऊ शकता) दूध किंवा पाण्यात भिजवा. यानंतर ब्रेडचा गोल आकार करून न चावता गिळून घ्या. काटा ब्रेकमध्ये अडकून थेट पोटात जाऊ शकतो. 

Advertisement

नक्की वाचा - Buttermilk: ताक 'या'आजारांसाठी रामबाण उपाय! ताक पिण्याची योग्य वेळ कोणती? 99 टक्के लोकांना माहितच नाही

४ ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइल प्यायल्याने घशात चिकटपणा येतो. यामुळे काटा काढता येणं सोपं जातं. घशात काटा अडकला असेल तर एक चमचा ऑलिव्ह ऑइल हळूहळू प्या. 

Advertisement

५ कार्बोनेट्रेड ड्रिंक

काही तज्ज्ञांच्या मते...सोडा, कोका-कोलासारखे कार्बोनेटेड ड्रिंक प्यायल्याने गॅस निर्माण होतो, यामुळे अडकलेला काटा निघण्यास मदत होते. मात्र हे पेय पिण्याची पद्धत लक्षात ठेवाव. फार वेळ हे पेय तोंडात ठेवू नये, एक घोट घेताच लगेच गिळून घ्या. 

डॉक्टरांकडे कधी जाल? 

वरील घरगुती उपाय केल्यानंतरही काटा निघत नसेल आणि गिळायला त्रास जाणवत असेल किंवा घशातून रक्त येत असेल, श्वास घ्यायला त्रास होत असेल तर कशीचीही वाट न पाहता तातडीने डॉक्टरांकडे धाव घ्या. डॉक्टर वैद्यकीय उपकरणांनी काही मिनिटात काटा बाहेर काढतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काटा काढण्यासाठी आपली बोटं घशात टाकू नये, यामुळे परिस्थिती अधिक  खराब होऊ शकते. 

Advertisement