Weight Loss Transformation: वजन कमी करण्याची सुरुवात अनेकदा मोठमोठ्या योजनांसह आव्हानांनी देखील होते, पण ध्येयापर्यंत फक्त तोच पोहोचू शकतो जो संयम, नियमित मेहनत आणि योग्य सवयींचा अवलंब करतो. याचे एक उत्तम उदाहरण हेले (Hayleigh) आहे, जिने आपली वेट लॉस जर्नी इन्स्टाग्रामवर शेअर करून हजारो लोकांना प्रेरित केले आहे. हेलेने सांगितले की तिने 3 वर्षांत 47 किलो वजन कमी करून 116 किलोग्रॅमवरून 69 किलोग्रॅमपर्यंतचा प्रवास पूर्ण केला. एक व्हिडीओ शेअर करून तिने लाइफस्टाइल आणि आहाराशी संबंधित अशा पाच महत्त्वाच्या बदलांबाबत माहिती सांगितली, ज्यामुळे वजन कमी करण्यात खूप मदत मिळाली. तुम्ही देखील या 5 सवयींचा अवलंब करू शकता.
1. वॉकिंग
हेलेने सांगितले की, वजन कमी करण्यासाठी चालण्याचा व्यायाम हा सर्वात अंडररेटेड एक्सरसाइज आहे. मोकळ्या हवेत 30 ते 45 मिनिटे चालल्याने शरीर सक्रिय तर राहतेच शिवाय मनही शांत होते. सोबत चरबी (फॅट्स) वेगाने बर्न होण्यास मदत मिळते, असे तिनं सांगितले.
2. पुरेसे पाणी पिणे
हेलेने सांगितले की तिच्या वेट लॉस जर्नीमध्ये पुरेसे पाणी पिणे हा अतिशय महत्त्वाचा भाग होता. तिच्या मते, जेव्हा तिने दररोज जास्त पाणी पिण्यास सुरुवात केली, तेव्हा तिची खाण्याची इच्छा (क्रेव्हिंग्स) खूप कमी झाली. सोबतच दिवसभर काम करण्यासाठी ऊर्जाही वाढू लागली. पाणी पिण्यासोबतच तिने दररोज एक ग्लास इलेक्ट्रोलाइट्स घेण्याचाही सल्ला दिला, ज्यामुळे शरीरात पाणी आणि आवश्यक खनिजांचा (मिनरल्स) समतोल राखला जातो.
3. 100 ग्रॅम प्रोटीन
हेलेने सल्ला दिला की वजन कमी करण्यासाठी रोज कमीत कमी 100 ग्रॅम प्रोटीन नक्की घेतले पाहिजे. आपला अनुभव शेअर करताना तिने सांगितले की दररोज कमीत कमी 100 ग्रॅम प्रोटीन घेतल्यामुळे तिला दीर्घकाळापर्यंत पोट भरलेले जाणवायचे. सोबतच वारंवार भूक लागत नव्हती आणि स्नायू (मसल्स) तयार होण्यासही मदत मिळाली.
4. सकाळी उठल्यानंतरचे रूटीन
हेलेने सांगितले की सकाळी उठल्यानंतर सर्वात आधी वर्कआउट किंवा मेडिटेशन केले पाहिजे. याशिवाय कमीत कमी 30 मिनिटांपर्यंत फोनपासून दूर राहिले पाहिजे. तिचे असे मानणे आहे की यामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्य सुधारते. सोबतच तिने सांगितले,'फक्त दोन आठवडे हे करून पाहा. तुम्हाला स्वतःला जाणवेल की तुमचा स्ट्रेस कमी झाला आहे, झोप सुधारू लागली आहे आणि तुमच्यामध्ये आधीपेक्षा जास्त ऊर्जा, एकाग्रता आणि शांतता आली आहे.'
(नक्की वाचा: Clove Water Benefits: सकाळी रिकाम्या पोटी 21 दिवस लवंगचे पाणी प्यायल्यास काय होईल? जाणून घ्या 4 मोठे फायदे)
5. फायबर
हेलेने सांगितले की वजन कमी करण्यासाठी आपल्या आहारात फायबरने समृद्ध असलेल्या कमीत कमी तीन प्रकारच्या भाज्यांचा नक्की समावेश करा. खरं तर, फायबरमुळे कार्बोहायड्रेट्स पचण्याची प्रक्रिया सोपी होते आणि पचनसंस्था योग्य प्रकारे काम करते. याशिवाय यामुळे पोट जास्त वेळ भरलेले जाणवते आणि भूक कमी लागते.
(नक्की वाचा: Acidity Home Remedies: अॅसिडिटीसाठी अँटासिड घेताय? काय करावे आणि काय टाळावे? डॉ. पै यांनी सांगितले सीक्रेट)
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)