रोगप्रतिकारक शक्ती आपल्याला रोगांपासून वाचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावते. योग्य आहार घेतल्याने रोगप्रतिकार शक्ती केवळ मजबूत होत नाही तर आपले आरोग्य दीर्घकाळ चांगले राहते. अनेकदा आपण अशा गोष्टी खातो ज्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. आजच्या जीवनशैलीत आपण असा आहार घेतो, ज्याचा आपल्या रोगप्रतिकारक शक्तीवर काही प्रमाणात परिणाम होतो. यासाठी काही सवयी बदलणे आवश्यक आहे.
प्रक्रिया केलेले अन्न (Processed Food)
पॅकेज्ड स्नॅक्स, फास्ट फूड आणि इन्स्टंट नूडल्स यांसारख्या प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये पौष्टिकतेची कमतरता असते आणि त्यात ट्रान्स फॅट्स आणि ॲडिटीव्ह्सचे प्रमाण अधिक असते. यामुळे शरीरात चरबी वाढू शकते आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात.
( नक्की वाचा- Weight Loss Drink: पोटाच्या सर्व समस्या होतील दूर, प्या या दोन गोष्टींपासून तयार केलेले गुणकारी पेय)
साखरयुक्त पदार्थ (Sugar Food)
जास्त साखर खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते. ज्यामुळे पांढऱ्या रक्त पेशींची कार्यक्षमता कमी होते. यामुळे संसर्गाशी लढण्याची शक्ती कमी होऊ शकते.
सोडा आणि एनर्जी ड्रिंक्स
सोडा आणि एनर्जी ड्रिंक्समध्ये हाय फ्रक्टोज कॉर्न सिरप आणि केमिकल्स असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. याच्या अतिसेवनाने लठ्ठपणा येऊ शकतो.
(नक्की वाचा : दिवसभरात इतके लिटर पाणी प्यायलात तर पटकन कमी होईल वजन)
मीठाचं अतिसेवन
जास्त मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढतो आणि किडनीवर दबाव येतो. याचा देखील रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होतो. ज्याचा आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
तळलेले अन्न
तळलेल्या पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट असते, ज्यामुळे शरीरातील खराब कोलेस्ट्रॉल वाढते. तसेच रोगप्रतिकारशक्ती कमकुवत होऊन हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.
दारू पिणे
जास्त प्रमाणात मद्यपान केल्याने शरीराच्या डिटॉक्सिफिकेशन सिस्टमवर नकारात्मक परिणाम होतो. यामुळे रोगप्रतिकारक शक्तीच्या पेशी कमकुवत होऊ शकतात, ज्यामुळे संसर्गाचा धोका वाढतो.
(नक्की वाचा :फोनवर बोलताना भीती वाटतीय, तुम्हाला असू शकतो टेली फोबिया! तो कसा ओळखणार?)
कॅफिनचा अतिवापर
कॅफिनच्या अतिसेवनामुळे डिहायड्रेशन आणि झोपेची समस्या उद्भवू शकते. झोपेच्या कमतरतेचा थेट परिणाम रोगप्रतिकारक शक्तीवर होतो.
पॅकेज फ्रूट ज्यूस
पॅकिंग केलेल्या ज्यूसमध्ये नैसर्गिक फायबरची कमतरता असते आणि त्यात साखरेचे प्रमाण जास्त असते. ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्तीवर नकारात्मक परिणाम होतो.
प्रिझर्व्हेटिव्ह फूड
प्रिझर्व्हेटिव्ह अन्न शरीरातील टॉक्सिन्स वाढवतात आणि रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत करू शकतात. त्यामुळे जास्त प्रिझर्वेटिव्ह्ज वापरणे टाळावे.