Amla And Turmeric Healthy Probiotic Drink: फक्त भारतातच नाही तर जगभरात अनेकजण पोटाशी संबंधित समस्यांमुळे त्रस्त असतात. कोणाला आंबट ढेकर येतात, कोणाचं पोट फुगतं तर कोणाला बद्धकोष्ठाचा त्रास होतो (Problem of bloating, constipation and acidity). या सर्व समस्या चुटकीसरशी दूर करण्यासाठी एक पेय फायदेशीर ठरू शकते. पूर्वी अनेकांच्या घरामध्ये हे पेय आवर्जून तयार केले जात असे. पण आताच्या धकाधकीच्या जीवनात आणि इजी-टु-मेकच्या युगात तितकीशी मेहनत घेणे अनेकांना शक्य होत नाही. पण या पेयामुळे शरीराच्या पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत मिळते आणि त्याचा संपूर्ण शरीराला फायदाही होतो.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
तुम्ही अगदी बरोबर ओळखले, आपण कांजी या पेयाबाबत बोलत आहोत. पण इतर पेयांच्या तुलनेत कांजी तयार करण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे. कांजीच्या पारंपरिक रेसिपीमध्ये आवळा आणि कच्च्या हळदीचा (Amla And Turmeric Drink) वापर केला जातो. हे दोन्ही घटक आरोग्याच्या दृष्टीकोनातून फायदेशीर आहेत. आयुर्वेदिक औषधोपचारांमध्ये आजही आवळा आणि कच्च्या हळदीचा वापर केला जातो. या दोन्ही घटकांचे सत्त्व कांजीमध्ये उतरल्याने त्याचा शरीरावर सकारात्मक परिणाम झटपट परिणाम होतो.
नक्की वाचा : दिवसभरात इतके लिटर पाणी प्यायलात तर पटकन कमी होईल वजन
कांजी म्हणजे काय ?
आंबवण्याची प्रक्रिया करुन कांजी हे पेय तयार केले जाते. कांजीमध्ये विविध औषधी वनस्पती, भाज्या आणि मसाल्यांचाही समावेश केला जातो. शरीराला ऊर्जा देणारे हे पेय तीन-चार दिवस आंबवल्यानंतर तयार होते. कडाक्याची थंडीमध्ये शरीरात उष्णता निर्माण व्हावी यासाठी उत्तरेकडील काही राज्यांमध्ये कांजी पेय तयार केले जाते. या कांजीमध्ये मोहरी, आवळा आणि ओली हळद मिक्स केल्याची त्याच चव वाढते तसेच याचा फायदाही होतो.
नक्की वाचा : 80 हजारांचा iPhone16 अवघ्या 35500 रुपयांत मिळवा, काय आहे ऑफर?
कांजीमध्ये हळद आणि आवळ्याचा समावेश का करावा?
आवळ्यातील घटक डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखांपर्यंत शरीराच्या प्रत्येक अवयवासाठी पोषक आहेत. शरीराला आवश्यक असणारे व्हिटॅमिन सीचा उत्तम स्त्रोत म्हणजे आवळा. व्हिटॅमिन सीमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्तीही वाढते आणि त्वचेवरही नैसर्गिक तेज येते. हळदीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, ज्यामुळे शरीरावरील जखम लवकर ठीक होण्यास मदत मिळते. हळदीतील कर्क्युमिन घटकामुळे शरीरामध्ये होणारी जळजळ कमी होते, पचनशक्ती वाढते आणि यकृत निरोगी राहण्यासही मदत होते.
नक्की वाचा :फोनवर बोलताना भीती वाटतीय, तुम्हाला असू शकतो टेली फोबिया! तो कसा ओळखणार?
हळद आणि आवळायुक्त कांजी पिण्याचे फायदे
आवळ्यातील पोषणतत्त्वांमुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती वाढते, सर्दी-पडशासारख्या संसर्गजन्य आजारांपासून शरीराचे संरक्षण होते. इतकंच नव्हे तर त्वचेचा पोत सुधारण्यापासून ते केसगळतीपर्यंतच्या अनेक समस्या दूर होतात. हळदीमुळे शरीर डिटॉक्स होते आणि पचनप्रक्रिया सुधारते. विशेषतः यकृत निरोगी राखण्यास मदत मिळते.
उर्जावर्धक आणि शक्तिवर्धक
कांजीमुळे पचनक्रिया सुधारतेच शिवाय थंडीमध्ये शरीरामध्ये उष्णताही निर्माण होते. कांजीमुळे शारीरिक वेदनाही कमी होण्यास मदत मिळते.
आवळा आणि हळदीची कांजी कशी करावी ?
- 200 ग्रॅम आवळा
- ओल्या हळदीचे तीन तुकडे (अंदाजे 100 ग्रॅम)
- एक चमचा पिवळी मोहरी
- एक-दोन हिरव्या मिरच्या
- दीड लिटर पाणी
- चवीनुसार खडे मीठ किंवा काळे मीठ
- कांजी कशी तयार करायची ?
कांजी तयार करण्याची रेसिपी
- काचेच्या बरणीत एक लिटर कोमट पाणी घ्यावे
- पाण्यामध्ये अंदाजे 100 ग्रॅम ओली हळद, 200 ग्रॅम आवळा, एक टेबलस्पून वाटलेली पिवळी मोहरी आणि 1 चमचा काळे किंवा खडे मीठ घाला.
- हे पेय मऊ कापडाने झाकून बरणीचे झाकण घट्ट बंद करा.
- ही काचेची बरणी दोन-तीन दिवस सूर्यप्रकाशात ठेवा.
- तीन दिवसांनंतर हे पेय तयार होईल.
- रिकाम्यापोटी रोज 100-150 मिलीलिटर पेय नियमितपणे प्यायल्यास त्याचे सकारात्मक परिणाम शरीरावर दिसू लागतील.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world