जाहिरात

Frequent Urination: सतत लघवीला होतेय? गंभीर आजाराचा धोका वेळीच ओळखा, अन्यथा 1 चूक तुम्हाला ICUमध्ये पोहोचवेल

Frequent Urination: वय वाढल्यामुळे जास्त वेळा लघवीला जावं लागतं असा विचार करणे किती धोक्याचे ठरू शकते, यावर प्रसिद्ध युरोलॉजिस्टनी दिलेला हा धक्कादायक खुलासा नक्की वाचा.

Frequent Urination: सतत लघवीला होतेय? गंभीर आजाराचा धोका वेळीच ओळखा, अन्यथा 1 चूक तुम्हाला ICUमध्ये पोहोचवेल
"Frequent Urination: वारंवार लघवीला होतेय? मग वेळीच व्हा सतर्क"
NDTV

Frequent Urination: वाढत्या वयानुसार वारंवार लघवीला येणे ही एक सामान्य गोष्ट आहे, असा अनेकांचा समज आहे. वाढत्या वयोमानानुसार ब्लॅडर म्हणजेच मूत्राशयामध्ये काही बदल नक्कीच होत असले तरी डॉक्टरांच्या म्हणण्यांनुसार ही समस्या सातत्याने जाणवत असेल किंवा त्रासदायक ठरू लागली तर याकडे केवळ वयाचे परिणाम म्हणून दुर्लक्ष करू नये. 

अमेरिकेच्या नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ डायबिटीज अँड डायजेस्टिव्ह अँड किडनी डिसीझेसच्या मते, वारंवार लघवीला येण्यामागे आरोग्याशी संबंधित अनेक समस्या असू शकतात. यामध्ये वाढलेले प्रोस्टेट, ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर, युरिन इन्फेक्शन (UTI), डायबिटीज (Diabetes), ब्लॅडर स्टोन (Kidney Stone) आणि काही न्युरोलॉजिकल (मज्जासंस्थेशी संबंधित) आजारांचा समावेश आहे. योग्य वेळेत निदान झाले तर यापैकी बऱ्याच समस्यांवर औषधोपचार शक्य आहेत.

वाढत्या वयासोबत वारंवार लघवीला येणे नॉर्मल आहे का?

वय वाढण्यासोबत मूत्राशयाच्या कार्यप्रणालीमध्ये बदल होतात. ब्लॅडर कमी वेळ लघवी रोखून धरू शकते आणि लघवी नियंत्रित करणाऱ्या स्नायूंची ताकद पूर्वीसारखी मजबूत राहत नाही. हीच गोष्ट लक्षात घेऊन यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबादचे सीनियर युरोलॉजिस्ट डॉक्टर एम. गोपीचंद यांनी एनडीटीव्हीशी (NDTV) बातचित करताना सांगितले की, वय वाढण्यासोबत ब्लॅडरमध्ये कमी लघवी जमा होऊ शकते, ज्यामुळे वारंवार लघवीला जाण्याची गरज भासू शकते, विशेषतः रात्रीच्या वेळेस.

युरोलॉजी अँड रीनल ट्रान्सप्लांटचे डायरेक्टर डॉ. देवेंद्र के. शर्मा यांचे काय म्हणणे आहे?

सीके बिरला हॉस्पिटल्स, जयपूर येथील युरोलॉजी अँड रीनल ट्रान्सप्लांटचे डायरेक्टर डॉ. देवेंद्र के. शर्मा यांनी एनडीटीव्हीशी (NDTV) बोलताना सांगितले की, अनेक लोकांना वाटते की वय वाढल्यावर वारंवार लघवीला येणे सामान्य आहे, पण असा विचार करणे चुकीचे आहे. वयानुसार ब्लॅडरमध्ये थोडे बदल होतात, त्यामुळे जास्त वेळा लघवी होऊ शकते. तरीही याला केवळ म्हातारपणामुळे होणारी गोष्ट मानू नये. अनेकदा वारंवार लघवीला येणे हे एखाद्या आजाराचे लक्षण असू शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांकडून तपासणी करून उपचार घेणे आवश्यक आहे.

वारंवार लघवीला होण्यामागील कारणे 

1. प्रोस्टेट वाढणे: 
वयोवृद्ध पुरुषांमध्ये हा त्रास अनेकदा पाहायला मिळतो. या समस्येमध्ये प्रोस्टेट ग्रंथी मोठी होते आणि लघवीच्या नलिकेवर दाब पडतो. यामुळे वारंवार लघवीला होणे, जोरात लघवीला येत असल्याचे जाणवणे, लघवीची धार कमकुवत होणे आणि लघवी पूर्ण न झाल्यासारखे वाटणे अशी लक्षणे दिसतात.

2. ओव्हरॲक्टिव्ह ब्लॅडर: 
हा त्रास पुरुष आणि महिला दोघांनाही होऊ शकतो. यामध्ये अचानक जोरात लघवीला येत असल्याचे जाणवते, वारंवार वॉशरूमला जावे लागते आणि काही वेळा लघवी नियंत्रित करणे कठीणे होते.  

3. डायबिटीज (मधुमेह):
जर रक्तातील साखर (शुगर) नियंत्रणात नसेल, तर वारंवार लघवी येणे हे याचे पहिले लक्षण असू शकते. जेव्हा रक्तातील साखर वाढते, तेव्हा किडनी ती बाहेर टाकण्यासाठी जास्त काम करते, ज्यामुळे लघवी जास्त प्रमाणात तयार होते.

4. युरिन इन्फेक्शन आणि मूतखडे:
युटीआय (UTI) किंवा ब्लॅडरमध्ये खडे असल्यामुळे ब्लॅडरमध्ये जळजळ होते. या कारणामुळे वारंवार लघवी येते, लघवी करताना जळजळ होते आणि सारखे टॉयलेटला जावेसे वाटते.

5. किडनी आणि मेंदूशी संबंधित आजार:
किडनी निकामी होणे, स्ट्रोक, पार्किन्सन्स, मल्टिपल स्क्लेरोसिस यासारखे आजार देखील ब्लॅडरच्या कार्यपद्धतीवर विपरित परिणाम करतात.

डॉ. एम. गोपीचंद, सीनियर कन्सल्टंट युरोलॉजिस्ट, यशोदा हॉस्पिटल्स, हैदराबाद
डॉ. देवेंद्र के. शर्मा, डायरेक्टर - युरोलॉजी अँड रीनल ट्रान्सप्लांट, सीके बिर्ला हॉस्पिटल्स, जयपूर

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com