Rusted Knife Health Risks: सावधान! गंजलेल्या चाकूने फळं-भाज्या कापताय? FSSAIने दिला कडक इशारा

FSSAI New Guidelines: हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि ढाब्यांमध्ये गंजलेल्या किंवा तुटलेल्या सुऱ्यांचा वापर केल्यास आता कडक कारवाई होणार आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins
"Rusted Knife Health Risks: गंजलेला चाकू वापरताय? सावधान"
NDTV

Rusted Knife Health Risks: किचनमध्ये सुरी (चाकू) हे सर्वात महत्त्वाचे आणि जास्त वापरले जाणारे साधन आहे. फळ कापायचे असो, भाज्या चिरायच्या असो किंवा जेवणाची कोणतीही तयारी करायची असो, सुरीचा वापर दररोज होतो. पण ज्या सुरीने तुम्ही खाण्याचे पदार्थ कापत आहात, ती स्वच्छ आणि सुरक्षित आहे की नाही, याकडे तुम्ही कधी लक्ष दिले आहे का? नुकतेच FSSAIने हॉटेल्स, ढाबे आणि खाद्यपदार्थांशी संबंधित व्यवसायाशी (फुड बिझनेस) संबंधित लोकांसाठी नवीन नियम लागू केले आहेत. या नियमांनुसार आता सर्वांना स्वच्छ आणि फुड-ग्रेड सुऱ्या (चाकू), ब्लेड आणि इतर कटिंग साधनांचाच वापर करणे बंधनकारक असणार आहे.

याशिवाय कापणी, प्रोसेसिंग, पॅकेजिंग आणि साठवणुकीसाठी वापरली जाणारी सर्व साधने फुड-ग्रेड, नॉन-टॉक्सिक आणि गंजरोधक असावी. हे अत्यंत आवश्यक आहे कारण गलिच्छ किंवा गंजलेल्या सुरीने तयार केलेले अन्न दूषित होऊ शकते, ज्यामुळे लोकांच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो.

Advertisement

FSSAIने नवीन मार्गदर्शक तत्त्वे का जारी केली? | FSSAI Food Safety Guidelines

FSSAIच्या निदर्शनास आले की काही हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, ढाबे आणि इतर खाद्यपदार्थांच्या ठिकाणी गंजलेल्या, तुटलेल्या किंवा खराब सुऱ्या आणि ब्लेडचा वापर केला जात आहे. अशा घाणेरड्या आणि खराब उपकरणांमुळे अन्नात कचरा, हानिकारक रसायने आणि जंतू मिसळू शकतात, ज्यामुळे लोकांचे आरोग्य बिघडू शकते. याच कारणामुळे FSSAI ने स्पष्टपणे सांगितले आहे की, अन्न शिजवताना केवळ फुड-ग्रेड आणि चांगल्या स्थितीत असलेल्या सुऱ्या आणि इतर कटिंग साधनांचाच वापर केला जावा, जेणेकरून अन्न सुरक्षित आणि आरोग्यदायी राहील.

(नक्की वाचा : Fatty Liver: सावधान! जे तुम्ही हेल्थ ड्रिंक समजून पिताय तोच ज्युस लिव्हर खराब करतोय? तज्ज्ञांचा गंभीर इशारा)

गंजलेली सुरी आरोग्याला कशी इजा पोहोचवू शकते?

1. अन्नात गंज मिसळू शकतो: जेव्हा तुम्ही गंजलेल्या सुरीने फळे किंवा भाज्या कापता, तेव्हा गंजलेले लहान कण अन्नात मिसळतात. असे अन्न वारंवार खाणे शरीरासाठी चांगले नसते.
2. बॅक्टेरियाचा धोका वाढतो: गंजलेल्या पृष्ठभागावर घाण आणि जंतू सहजपणे जमा होतात. जर सुरी नीट स्वच्छ केली नाही, तर हे जंतू थेट अन्नात जाऊ शकतात.
3. पोटाच्या समस्या: गंजलेल्या सुरीने कापलेले खाद्यपदार्थ खाल्ल्यास पोटदुखी, गॅस, उलट्या, जुलाब आणि फुड पॉयझनिंग यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.
4. संसर्गाचा (इन्फेक्शन) धोका: गंजलेल्या किंवा तुटलेल्या सुरीमध्ये बारीक भेगा असतात, ज्यामध्ये घाण लपून राहते. यामुळे संसर्ग पसरण्याचा धोका वाढतो.
5. अन्नाची चव आणि दर्जा खराब होतो: गंजलेल्या सुरीने कापलेल्या फळांची आणि भाज्यांची चव बदलू शकते, अन्नाचा दर्जाही खराब होतो. अनेकदा अन्नाला एक वेगळीच विचित्र चव येते.

(नक्की वाचा: गोड रसाळ फळात लपलंय 'हे' धोकादायक रसायन, कसं आणि कोणत्या वेळेस खाल्ल्यास बनते विष? तज्ज्ञांचा धक्कादायक खुलासा)

नियम मोडल्यास होणार कारवाई

FSSAI ने स्पष्ट केले आहे की, जर तपासणी दरम्यान कोणत्याही Food establishmentsमध्ये खराब किंवा गंजलेली कटिंग इक्विपमेंट्स आढळली तर अन्न सुरक्षा आणि मानके कायदा 2006 (Food Safety and Standards Act, 2006) अंतर्गत कडक कारवाई केली जाऊ शकते.

Advertisement

घरात सुरी वापरताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी?

  • सुरीवर गंज दिसल्यास ती ताबडतोब बदला.
  • सुरी वापरल्यानंतर लगेच धुवून कोरडी करा.
  • ओली सुरी जास्त वेळ तशीच ठेवून देऊ नका.
  • स्टेनलेस स्टील किंवा चांगल्या दर्जाच्या सुऱ्या खरेदी करा.
  • वेळोवेळी सुरीची धार आणि तिची स्थिती तपासात राहा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)