Mangoes Alert: सावधान! आंब्यांवर मारताय ताव? FSSAIनं दिला इशारा

Mangoes Alert: भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI)ने अलीकडेच व्यापाऱ्यांना आंबा कृत्रिमरित्या पिकवणाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. नेमके काय आहेत हे नियम? 

Advertisement
Read Time: 2 mins

FSSAI Mangoes Alert : उन्हाळा ऋतू नकोनकोसा वाटत असला तरी केवळ कैरी-आंबे खायला मिळणार म्हणून सर्वजण या हंगामाची आतुरतेने वाट पाहतात. आंबे खायला आवडत नाहीत, अशी मंडळी फारच क्वचित असतील. आंब्याच्या वेगवेगळ्या रेसिपी तयार करून खवय्ये जीभेचे चोचले पुरवतात. मँगो शेक, आंब्याचे आईस्क्रीम, आमरस-पुरी, कैरीचे पन्हे, आंब्याचे लोणचे इत्यादी अशा विविध पाककृतींचा आस्वाद घेतात. तरीही आरोग्य निरोगी राहावे, यासाठी आंबा योग्य पद्धतीने खाणे अतिशय गरजेचे आहे.   

(नक्की वाचा: नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक, ICMR सांगितले मोठे कारण)

नियमांचे पालन करण्याचे निर्देश

अलिकडेच भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने फळांचे व्यापारी, फळे हाताळणारे, अन्नपदार्थांचे व्यावसायिक (FBOs) तसेच फळे पिकवणाऱ्या केंद्रांच्या चालकांना फळे कृत्रिमरित्या पिकवण्याच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करण्यास सांगितले आहे. तसेच आंबा पिकवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कॅल्शिअम कार्बाइडच्या पावडरच्या  (Calcium Carbide)  वापराबाबतही इशारा जारी केला आहे.

(नक्की वाचा: तिशीनंतरही दिसला तरुण, सुरकुत्याही होतील कमी; या खाद्यपदार्थांमुळे वाढेल कोलेजन)

FSSAIने दिला इशारा 

FSSAIच्या मते, वर्ष 2011पासून आंबा पिकवण्यासाठी कॅल्शिअम कार्बाइड पावडरच्या वापरावर बंदी घालण्यात आली आहे. पण अनेक फळ व्यापारी आजही आंबा पिकवण्यासाठी आरोग्यास हानिकारक असलेले हे रसायन वापरत आहेत. ज्यामुळे लोकांच्या आरोग्यास गंभीर स्वरुपात अपाय होऊ शकतात. 

(नक्की वाचा: सावधान! या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे तुम्हाला येतेय जास्त झोप, डाएटमध्ये या पदार्थांचा करा समावेश)

कॅल्शिअम कार्बाइडने पिकवलेले आंबे खाल्ल्यास कोणत्या समस्या निर्माण होऊ शकतात? (Disadvantages Of Eating Carbide Mango)

आंब्यासह काही अन्य फळेही कॅल्शिअम कार्बाइड पावडरचा वापर करून पिकवली जातात. याामुळे वातावरणात अ‍ॅसिटिलीन गॅस उत्सर्जित होते. तसेच यामध्ये आरोग्यास हानिकारक असणारे तत्त्व आर्सेनिक आणि फॉस्फरसचाही समावेश असतो. यामुळे चक्कर येणे, चिडचिड होणे, वारंवार तहान लागणे, अशक्तपणा जाणवणे, खाद्यपदार्थ गिळताना त्रास होणे, उलट्यांचा त्रास, त्वचेवर पुरळ येणे यासारख्या गंभीर समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  

Advertisement

कार्बाइडयुक्त आंबा कसा ओळखावा? (How To Identify Carbide Mango)

  • तज्ज्ञांच्या मते, नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांच्या तुलनेत कॅल्शिअम कार्बाइड पावडरचा वापर करून पिकवलेल्या आंब्यांवर काळे डाग जास्त प्रमाणात असतात आणि फळाचा सुगंध अधिक गडद स्वरुपात असतो.
  • जर आंब्याचा रंग गडद पिवळा असेल तर असे आंबे खरेदी करणे टाळा.
  • खरेदी केल्यानंतर काही दिवसांतच आंबे खराब होत असतील, तर फळ पिकवण्यासाठी रसायनाचा वापर केल्याचा हा संकेत आहे.  

आंब्याचे सेवन कसे करावे?

रसायनांचा वापर करून पिकवलेल्या आंब्यांचे सेवन केल्यानंतर आरोग्याशी संबंधित समस्या निर्माण झाल्यास तातडीने डॉक्टरांना संपर्क साधावा. 
विकत आणलेले आंबे केवळ पाण्याने धुऊन खाण्याऐवजी दोन ते तीन तासांकरिता पाण्यात भिजत ठेवा आणि त्यानंतर सेवन करा. 

Advertisement

VIDEO: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, दोन दिवस 'या' भागांमध्ये पाणीकपात

Topics mentioned in this article