जाहिरात
This Article is From May 16, 2024

नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक, ICMR सांगितले मोठे कारण

Non Stick Utensils Side Effects: भारतीयांसाठी आहारविषयक नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रीसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ न्युट्रिशन (NIN) यांच्या तर्फे नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवू नये, असा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे.

नॉन-स्टिक भांड्यांमध्ये अन्न शिजवणे आरोग्यासाठी धोकादायक, ICMR सांगितले मोठे कारण

Non-Stick Utensils Side Effects: भारतीयांसाठी आहारविषयक नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रीसर्च (ICMR) आणि नॅशनल इंस्टिट्युट ऑफ न्युट्रिशन (NIN) यांच्या तर्फे नॉन-स्टिक भांड्यांमध्ये स्वयंपाक तयार करू नये, असा सल्ला नागरिकांना देण्यात आला आहे. इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रीसर्च (ICMR) आणि नॅशनल इन्स्टिट्युट ऑफ न्यूट्रिशन (NIN) ने  भारतीयांसाठी सुधारित आहार मार्गदर्शक तत्त्वे (DGI) जारी केली आहेत. याद्वारे त्यांनी स्वयंपाकासाठी नॉन-स्टिक पॅनचा वापर करण्याऱ्या नागरिकांना इशारा देत अशा पद्धतीचे भाडे न वापरण्याचा सल्ला दिला आहे. यासह पर्यावरणपूरक कुकवेअर वापरण्याचे आवाहन केले आहे. यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांमुळे गंभीर स्वरुपात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.  

(नक्की वाचा: 13 वर्षांनंतर ICMR कडून भारतीयांसाठी नवी नियमावली, चुकीच्या आहारामुळे 56% आजार; काय टाळाल?)

नॉन-स्टिक कुकवेअर वापरणं का टाळावे? (Why Should Avoid Non-Stick Cookware)

नॉन-स्टिक पृष्ठभागामुळे नॉन-स्टिक कुकवेअर हे स्वयंपाकासाठीचा सोयीस्कर पर्याय म्हणून ओळखले जाते. या भांड्याची स्वच्छता करणे सोपे असते आणि स्वयंपाकासाठी तेलाचा वापरही कमी प्रमाणात होतो. याद्वारे अलिकडील संशोधनातील माहितीनुसार आणि आरोग्यतज्ज्ञांनी व्यक्त केलेल्या चिंतेनुसार नॉन-स्टिक कुकवेअरमुळे निर्माण होणाऱ्या समस्यांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. तसेच दैनंदिन स्वयंपाकामध्ये नॉन स्टिक कुकवेअरचा वापर करण्यासंदर्भात पुनर्विचार करण्याचे आवाहनही केले गेले आहे. 

(नक्की वाचा: रिक्षाचे भाडे अनेकदा विमान तिकिटापेक्षा जास्त असते! उच्च न्यायालयाचे उद्गार)

विषारी धूर होतो उत्सर्जित

नॉन-स्टिक कुकवेअर वापरासंदर्भात व्यक्त करण्यात आलेल्या चिंतेमागील प्रमुख कारण म्हणजे पेरफ्लुरूक्टेनोइक अ‍ॅसिड (PFO) आणि पेरफ्लुरूक्टेनसल्फोनिक अ‍ॅसिड (PFOS), जे टेफ्लॉनसारख्या नॉन- स्टिक कोटिंग्सच्या उत्पादनामध्ये वापरली जाणारी रसायने आहेत. जेव्हा नॉन स्टिक कुकवेअर उच्च तापमानामध्ये गरम केले जाते, तेव्हा या भांड्यांमधून विषारी धूर बाहेर फेकला जाऊ शकतो. या धुराच्या संपर्कामध्ये येणाऱ्या लोकांच्या आरोग्यास धोका निर्माण होऊ शकतो. या धुरामुळे श्वसनाशी संबंधित समस्या निर्माण होऊ शकतात, उदाहरणार्थ श्वासोच्छवासाशी संबंधित समस्या, थायरॉइड आणि काही प्रकारच्या कर्करोगांचाही समावेश आहे.  

(नक्की वाचा: ग्राहक संरक्षण कायद्याच्या कक्षेत वकिलांचा धरले जाऊ शकत नाही : सर्वोच्च न्यायालय)

नॉन-स्टिक कोटिंग खराब होऊ शकते

याशिवाय, सातत्याने होणाऱ्या वापरामुळे कुकवेअरवरील नॉन स्टिक कोटिंग खराब होऊ शकते. विशेषतः उच्च तापमानामध्ये स्वयंपाक केल्याने ही समस्या निर्माण होते. जसजसे कोटिंग खराब होत जाते, तसतसे नॉन स्टिक कुकवेअरमधील रसायने स्वयंपाकामध्ये मिसळ्याचा धोका असतो. यामुळे तुम्ही हानिकारक रसायनांच्या संपर्कामध्ये येत आहात, हे लक्षात घ्या. आम्लयुक्त खाद्यपदार्थ शिजवताना किंवा धातुच्या भांड्यांचा वापर करताना निर्माण होणारी ही समस्या अतिशय चिंतेची बाब आहे. यामुळे नॉन-स्टिक कोटिंग खराब होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो..  

VIDEO: घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतलं बचावकार्य संपलं, BMC Comissioner गगराणींनी दिली माहिती 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com