Ganesh Chaturthi 2024: उजव्या सोंडेचा गणपती खरंच कडक असतो? धर्मशास्त्रात काय म्हटलंय?

Siddhivinayak : उजव्या सोडेंच्या गणपतीबाबत तुम्हालाही शंका आहे का? पंचांगकर्ते,खगोलअभ्यासक दा.कृ.सोमण यांनी नेमके काय सांगितलं.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

हिंदू धर्मानुसार कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात गणेशाच्या पुजनाने केली जाते. गणेशाच्या (Ganesh Chaturthi) पुजनाने घरात सुख-समृद्धी येते. विघ्न दूर होतात. अनंत चतुर्थीला घरात गणेशाची स्थापना केली जाते. प्रत्येक जण आपआपल्या आवडीनुसार मुर्तीची निवड करतात.

मात्र अनेकदा उजव्या सोंडेचा गणपती अधिक कडक असल्याचं म्हटलं जात. सिद्धिविनायक हा उजव्या सोंडेचा आहे. कडक आचार न पाळल्यास उजव्या सोंडेचा गणपती सर्वनाश करतो, सिद्धिविनायक घरात ठेवू नये असंही म्हटलं जातं. मात्र या गैरसमजुती आहे. उजव्या सोंडेचा गणपती कडक असल्याचं कुठल्याही धर्मशास्त्रात म्हटलेलं नाही.

देव कडक नसतोच. देव क्षमाशील, कनवाळू असतो. गणपती मूर्ती पाहिली तर डाव्या हातात मोदक किंवा लाडू असतो. त्यासाठी गणपतीची सोंड डाव्या बाजूला कललेली असते. गणपती बाप्पाची सोंड डावीकडे मोदकाकडे वळलेली असते. गणपती हा मूळात सुखकर्ता असतो तो कधीच कडक नसतो असं पंचांगकर्ते,खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.   

Advertisement

हे ही वाचा - Ganesh Chaturthi 2024 : गणपतीला मोदकांचाच नैवेद्य का अर्पण करतात?

गणेश चतुर्थीची तिथी | Ganesh Chaturthi Date 

पंचांगानुसार, भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर म्हणजे शुक्रवारी दुपारी 12:08 वाजता सुरू होईल ते दुसऱ्या दिवशी म्हणजेच 7 सप्टेंबरला तिथी समाप्त होईल. उदया तिथीनुसार 7 सप्टेंबरला गणेश चतुर्थीचे व्रत (Ganesh Chaturthi Vrat) करणे शुभ ठरेल. 

7 सप्टेंबर रोजी सकाळी 11:03 वाजेपासून ते दुपारी 1:34 वाजेपर्यंत गणेश चतुर्थीचा शुभ मुहूर्त आहे. या मुहूर्तादरम्यान पूजा करणे फलदायी ठरेल. 

Advertisement

गणेश चतुर्थीची पूजा 

मान्यतेनुसार गणपती बाप्पाला विघ्नहर्ता म्हणतात. हिंदू धर्मानुसार कोणत्याही महत्त्वपूर्ण कार्याचा शुभारंभ करताना सर्वप्रथम गणपती बाप्पाची पूजा करणे शुभ मानले जाते. कारण बाप्पाला अग्रपूजेचा मान मिळाला आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते आणि बाप्पाची विधीवत पूजा केली जाते. 

गणेश चतुर्थीच्या पूजनामध्ये मातीची गणेश मूर्ती, चौरंग, केळीचे खांब, लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र, नवीन वस्त्र, धूप-अगरबत्ती, कापूर, मोदक, केळी, हळद-कुंकू, कलश, फळ, फुले, अक्षता, आंब्याच्या डहाळ्या, पंचामृत, सुपारी इत्यादी गोष्टींचा पूजेच्या सामग्रीमध्ये समावेश केला जातो. 

Advertisement