जाहिरात

Ganesh Chaturthi 2025 :बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गुरुजी भेटत नाहीये? घरच्या घरीच करा पूजा, पाहा हे 3 Video

बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी आणि विधीवत पूजेसाठी गुरुजी भेटत नसेल तरीही चिंता करू नका. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही घरच्या घरी पूजा करू शकता.

Ganesh Chaturthi 2025 :बाप्पाच्या प्राणप्रतिष्ठेसाठी गुरुजी भेटत नाहीये? घरच्या घरीच करा पूजा, पाहा हे 3 Video

Ganesh Chaturthi Puja Vidhi : गणपती बाप्पाला यायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे घरात धावपळ सुरू आहे. काहीजणांची सजावट अजूनही झालेली नाही. त्याशिवाय पूजा-विधीचे साहित्य, प्रसाद, नैवेद्य अशा बऱ्याच गोष्टींचा पसारा आहे. महाराष्ट्रात घरोघरी गणपतीची प्राणप्रतिष्ठा होत असल्याने गुरुजी मिळणं कठीण होतं. (Ganesh Pran Pratishta Puja)

27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थीला बाप्पाचं आगमन होईल. यादिवशी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी गुरुजी मिळणं कठीण होतं. अनेक घरांमध्ये महिनाभरापूर्वीच गुरुजींची (Guruji for ganesh pran pratishta puja) वेळ घेऊन ठेवतात. त्यामुळे या कालावधीत गुरुजींना मोठी मागणी असते. मात्र गुरुंजींची वेळ मिळाली नाही तरी चिंता करण्याचं कारण नाही. आम्ही तुम्हाला अत्यंत सोप्या पद्धतीने पूजा कशी करता येईल हे सांगणार आहोत.  यासाठी तुम्ही यूट्यूबची मदत घेऊ (Ganesh online Pran Pratishta Puja) शकता. युट्यूबवर व्हिडिओ लावून तुम्ही घरात त्यामध्ये दिलेल्या सूचनेनुसार पूजा करू शकता. यातून विधीवत प्राणप्रतिष्ठा केली जाईल. 

गणपतीच्या पूजेचे साहित्य
हळदकुंकू, गुलाल, रांगोळी, फुले, दुर्वा, तुळशी, बेल, विड्याची पाने 15, गूळ, खोबरे, पंचामृत (दूध, दही, तूप,मध, साखर, शेंदूर, गंध, जानवे, कापसाची वस्त्रे (गणरायासाठी लाल रंगाची), कापूर, उदबत्ती, श्रीफळ, खारीक, बदाम, फळे, सुटी नाणी पाच रुपयांची दक्षिणा

गणेश मूर्ती स्थापनेचा मुहूर्त (Ganesh Murti Sthapana Shubh Muhurat)
पंचागानुसार गणेश मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी 27 ऑगस्ट रोजीचे शुभ मुहूर्त 

सकाळी 6.30 वाजेपासून ते 9.30 वाजेपर्यंत 
सकाळी 11.10 वाजेपासून ते दुपारी 12.30 वाजेपर्यंत 
दुपारी 4 वाजेपासून ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत 

ब्राह्मणपूजा कशी करावी?
गणेश चतुर्थीच्या दिवशी तुम्हीच तुमच्या गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली असली तरीही ब्राह्मणाच्या नावाने विडा, श्रीफळ, महादक्षिणा काढून ठेवावी. त्यावर गंध, अक्षता, पुष्प वाहावे. नंतर ते गुरुजींना नेऊन द्यावे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com