Ganesh Chaturthi 2025: गणेशभक्तीचा उत्साह! गणेश आरती, गणेश अथर्वशीर्ष, गणपतिस्त्रोत्र, श्लोक मिळवा एका क्लिकवर

Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाची आरती, श्लोकसह स्त्रोत्र सर्व काही येथे मिळेल एका क्लिकवर

जाहिरात
Read Time: 10 mins
"Ganesh Chaturthi 2025 : गणपती आरती संग्रह"

Ganesh Chaturthi 2025: गणेशोत्सवास 27 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पा वाजतगाजत घराघरांत, सार्वजनिक मंडळांमध्ये विराजमान होतील. यानंतर पुढील 10 बाप्पाची मनोभावे सेवा, आरती पूजा केली जाईल. बाप्पाची आरती करताना भाविक त्याच्या भक्तिमध्ये तल्लीन होऊन जातात. बाप्पाची आरती करताना लहानांपासून ते थोरामोठ्यांपर्यंत सर्वांचे देहभान हरपते. बाप्पाच्या सर्व आरती, श्लोक, गणपतिस्त्रोत्र, श्री गणपति अथर्वशीर्ष आणि मंत्रपुष्पांजलिः तुम्हाला या लेखामध्ये सर्व काही एका क्लिकवर मिळेल.  

गणपती आरती संग्रह | Ganpati Aarti In Marathi

1. सुखकर्ता दुःखहर्ता आरती | Sukhkarta Dhukhharta Aarti In Marathi

सुखकर्ता दुखहर्ता, वार्ता विघ्नांची|
नुरवी पुरवी प्रेम, कृपा जयाची |
सर्वांगी सुंदर, उटि शेंदुराची|
कंठी झळके माळ मुक्ताफळांची॥1॥
जय देव, जय देव जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मन कामना पुरती ॥धृ॥

रत्नखचित फरा, तुज गौरीकुमरा|
चंदनाची उटी , कुमकुम केशरा|
हिरेजडित मुकुट, शोभतो बरा |
रुणझुणती नूपुरे, चरणी घागरिया|
जय देव जय देव जय मंगलमूर्ती ॥2॥

लंबोदर पीतांबर, फणिवरबंधना |
सरळ सोंड, वक्रतुंड त्रिनयना|
दास रामाचा, वाट पाहे सदना|
संकटी पावावे, निर्वाणी रक्षावे, सुरवरवंदना|
जय देव जय देव, जय मंगलमूर्ती|
दर्शनमात्रे मनकामना पुरती ॥3॥

Advertisement

2. शेंदुर लाल चढायो आरती | Shedur Laal Chadhayo Aarti In Marathi

शेंदुर लाल चढ़ायो अच्छा गजमुख को
दोंदिल लाल बिराजे सुत गौरिहर को
हाथ लिए गुडलद्दु सांई सुरवर को
महिमा कहे न जाय लागत हूं पद को
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता
धन्य तुम्हारो दर्शन मेरा मन रमता
जय देव जय देव

अष्टौ सिद्धि दासी संकटको बैरि।
विघ्नविनाशन मंगल मूरत अधिकारी।
कोटीसूरजप्रकाश ऐबी छबि तेरी।
गंडस्थलमदमस्तक झूले शशिबिहारि ॥2॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥ जय देव ।। धृ० ।।

Advertisement

भावभगत से कोई शरणागत आवे।
संतत संपत सबही भरपूर पावे।
ऐसे तुम महाराज मोको अति भावे।
गोसावीनंदन निशिदिन गुन गावे ॥3॥
जय जय श्री गणराज विद्या सुखदाता।
धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ॥

3. गजानना श्रीगणराया | Gajanana Shri Ganraya Aarti In Marathi 

गजानना श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया ! मंगलमूर्ती श्री गणराया, आधी वंदू तुज मोरया !
सिंदुरचर्चित धवळे अंग, चंदनउटी खुलवी रंग बघता मानस होते दंग, जीव जडला चरणी तुझिया
गौरीतनया भालचंद्रा, देवा कृपेच्या तू समुद्रा वरदविनायक करुणागारा, अवघी विघ्ने नेसी विलया

Advertisement

4. तू सुखकर्ता तू दु:खहर्ता आरती | Tu Sukhkarta Tu Dukhharta Aarti In Marathi 

तू सुखकर्ता तू दु:खहर्ता । विघ्नविनाशक मोरया संकटी रक्षी शरण तुला मी । गणपती बाप्पा मोरया ॥ धृ ॥ 1॥
तू सकलांचा भाग्य विधाता । तूं विद्येचा स्वामीदाता । ज्ञानदीप उजळुनी आमुच्या निववी नैराश्याला ॥ 2 ॥
तू माता तू पिता जगी या । ज्ञाता तू सर्वस्व जगी या ॥ पामर मी स्वर उणे भासती । तुझी आरती गाया ॥ 3 ॥
मंगलमूर्ति तूं गणनायक । वक्रतुंड तूं सिद्धि विनायक । तुझीया द्वारे आज पातली । ये इच्छित मज द्याया ॥ 4 ॥

5. नाना परिमळ दूर्वा शेंदुर | Nana Parimal Durva Shendur Aarti

नाना परिमळ दूर्वा शेंदुर शमिपत्रं ।
लाडू मोदक अन्ने परिपूरित पात्रं ।।
ऐसें पूजन केल्या बेएजाक्षर मंत्रं ।
अष्तहि सिद्धि नवनिन्धि देसी क्षणमा || १ || जय देव जय देव जय मंगलमूर्ती ।।
तूझे गुण वर्णाया मज कैंची स्फूर्ती ।। धृ।।
तुझें ध्यान निरंतर जे कोणी करिती |
त्यांची सकलहि पापें विघ्नेंही हरति ।।
वाजी वारण शिबिका सेवक सुत युवती ।
सर्वहि पावुनि अंतीं भवसागर तरती ।। जय देव || २।। शरणागत सर्वस्वें भजती तव चरणीं ।
कीर्ति तयांची राहे जोंवरि शशि-तरणी ।। त्रैलोक्यीं ते विजयी अद्भुत हे करणी । गोसावीनंदन रत नामस्मरणर्णी।। जय देव || ३ ||

महागणपतिस्त्रोत्र: | Sankat Nashan Ganesha Stotram 

श्री गणेशाय नमः ।
नारद उवाच । 
प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम् । भक्तावासं स्मरेन्नित्यमायुः कामार्थसिद्धये ।। प्रथमं वक्रतुंडं च एकदंतं द्वितीयकम् । 
तृतीयं कृष्णपि‌ङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकम् ।। 
लंबोदरं पंचमं च षष्ठं विकटमेव च । 
सप्तमं विघ्नराजेंद्र धूम्रवर्णं तथाष्टमम् ।। 
नवमं भालचंद्रं च दशमं तु विनायकम् । 
एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननम् ।। 
द्वादशैतानि नामानि त्रिसंध्यं यः पठेन्नरः । 
न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो ॥ 
विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनम् । 
पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम् ।। 
जपेद्गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् । 
संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः ॥ 
अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् ।
तस्य विद्या भवेत्सर्वा गणेशस्य प्रसादतः ।। 
इति श्रीनारदपुराणे संकष्टनाशनं महागणपतिस्तोत्रं संपूर्णम् ॥

श्री गणपति अथर्वशीर्ष | Shri Ganapati Atharvashirsha 

॥ श्री गणेशाय नमः ।।
ॐ भद्रं कर्णेभिः शृणुयाम देवाः ।
भद्रं पश्येमाक्षभिर्यजत्राः । स्थिरैरंगस्तुष्टुवांसस्तनूभिः । 
व्यशेम देवहितं यदायुः ॥१॥
ॐ स्वस्ति न इन्द्रो वृद्धश्रवाः । 
स्वस्ति नः पूषा विश्ववेदाः । 
स्वस्तिनस्तार्थ्यो अरिष्टनेमिः । स्वस्ति नो बृहस्पतिर्दधातु ॥२॥ 
ॐ शांतिः!शांतिः !! शांति !!!

ॐ नमस्ते गणपतये 
त्वमेव प्रत्यक्षं तत्वमसि ।। 
त्वमेव केवलं कर्ताऽसि ।। 
त्वमेव केवलं धर्ताऽसि ।। 
त्वमेव केवलं हर्ताऽसि ।। 
त्वमेव सर्वं खल्विदं ब्रह्मासि ।। 
त्वं साक्षादात्माऽसि नित्यम् ॥१॥

ऋतं वच्मि । सत्यं वच्मि ॥२॥ 
अव त्वं मां । अव वक्तारं ॥ 
अव श्रोतारं । अव दातारं ॥ 
अव धातारं । अवानूचानमव शिष्यं ।॥

अव पश्चात्तात् । अव पुरस्तात् ।। 
अवोत्तरात्तात् । अव दक्षिणात्तात् ।। 
अवचोर्ध्वात्तात् ।। अवाधरात्तात् ॥ 
सर्वतो मां पाहि पाहि समंतात् ॥३॥

त्वं वाङ्मयस्त्वं चिन्मयः ।। 
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ।। 
त्वं सच्चिदानंदाद्वितीयोऽसि ।। त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ॥ 
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोऽसि ॥४॥

सर्वं जगदिदं त्वत्तो जायते ॥ 
सर्वं जगदिदं तत्वस्तिष्ठति ॥ 
सर्वं जगदिदं त्वयि लयमेष्यति ।। 
सर्वं जगदिदं त्वयि प्रत्येति ॥
 त्वं भूमिरापोऽनलोऽनिलो नभः ॥ 
त्वं चत्वारि वाक्पदानि ॥५॥

त्वं गुणत्रयातीतः । त्वमवस्थात्रियातीतः ॥ 
त्वं देहत्रयातीतः । त्वं कालत्रयातीतः ।। 
त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं ॥ 
त्वं शक्तित्रयात्मकः ॥ 
त्वां योगिनो ध्यायंति नित्यं । 
त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं 
रुद्रस्त्वं इंद्रस्त्वं अग्निस्त्वं वायुस्त्वं 
सूर्यस्त्वं चंद्रमास्त्वं ब्रह्मभूर्भुवः स्वरोम् ॥६॥
गणादिं पूर्वमुच्चार्य वर्णादिं तदनंतरं ॥ 
अनुस्वारः परतरः । अर्धेन्दुलसितं ।। तारण रुद्धं । 
एतत्तव मनुस्वरूपं ।। गकारः पूर्वरूपं । 
अकारो मध्यरूपं ॥ अनुस्वारश्चान्त्यरूपं । बिन्दुरुत्तररूपं ।॥ 
नादः संधानं । स हिता संधिः ॥ सैषा गणेशविद्या । गणकऋषिः ।। 
निवृद्‌गायत्रीछंदः । गणपतिर्देवता ॥ 
ॐ गं गणपतये नमः ॥७ ॥

एकदंताय विद्महे । वक्रतुण्डाय धीमहि ।। तन्नो दंती प्रचोदयात् ॥८॥

एकदतं चतुर्हस्तं पाशमंकुशधारिणम् ।।
रदं च वरदं हस्तैर्बिभ्राणं मूषकध्वजम् ।। 
रक्तं लंबोदरं शूर्पकर्णकं रक्तवाससम् ।। 
रक्तगंधानुलिप्तांगं रक्तपुष्पैः सुपूजितम् ॥ 
भक्तानुकंपिनं देवं जगत्कारणमच्युतम् ।। 
आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृतेः पुरुषात्परम् ।।
एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः ॥९॥

नमो व्रातपतये । नमो गणपतये ॥ 
नमः प्रथमपतये ॥ 
नमस्तेऽस्तु लंबोदरायैकदंताय ॥ 
विघ्ननाशिने शिवसुताय ॥ 
श्रीवरदमूर्तये नमो नमः ॥१०॥

एतदथर्वशीर्ष योऽधीते । स ब्रह्मभूयाय कल्पते ।। 
स सर्वतः सुखमेधते । स सर्वविघ्नैर्न बाध्यते ।। स पन्चमहापापत्प्रमुच्यते ।
साय मधीयानो दिवसकृतं पापं नाशयति ।। 
प्रातरधीयानो रात्रिकृतं पापं नाशयति ।। सायंप्रातः प्रत्युजानो अपापो भवति ।।

सर्वत्रधियानोऽ पविघ्नो भवति । धर्मार्थ काममोक्षं च विदति ।। 
इदमथर्वशीर्षमशिष्याय न देयम् । यो यदि मोहादद्रसति स पापीयान भवति ।। 
सहस्त्रावर्तनात् ययंकाममधीते तं तमनेने साधयेत ।।११।।

अनेन गणपतिमाभिषिचती ।। स वाग्मी भवती ।। 
चतुर्थ्यामनश्रन जपती स विद्यावान भवती ।। इत्यथर्वणवाक्यं ।। 
ब्रह्माद्यावरणं विद्यात् ।। न विभेति कदाचनेति ।।१२।।

यो दुर्वांकुरैर्यजति ।। स वैश्रवणोपमो भवति ।। यो लाजैर्यजति सयशोवान भवतीस मेधावान भवती ।। 
यो मोदकसहस्त्रेण यजति स वाच्छित फलमवाप्नोति ।। यः साज्यसमिभ्दिर्यजति स सर्वं लभते व सर्व लभते ।।१३।।

अष्टौ ब्राह्मणान सम्यग्गाहयित्वा सूर्यवर्चस्वी भवति ।। सूर्यग्रहे महानद्यां प्रतिमासंनिधौ वा जरत्वा सिद्धमंत्रो भवती ।। 
महाविघ्नात्प्रमुच्यते ।। महादोषात्प्रमुच्यते ।। महापापात प्रमुच्यते ।। स सर्वाविभ्दर्ति स सर्वविभ्दवति ।। य एवं वेद इत्युपनिषद ।।१४।।

ओम सह नाववतु ।। सह नौ भुनक्तु ।। 
सह वीर्य करवावहै । तेजस्विनावधी नमस्तु मा विद्धीषावहै ।।

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: श्री गणेशाची 108 नावं उच्चारुन दुर्वा अर्पण करा, गणरायाकडून मिळतील मोठे लाभ)

मराठी गणपती अथर्वशिर्ष | Shri Ganapati Atharvashirsha In Marathi

नमन तुजला गणपतये । प्रत्यक्ष तत्त्व तूच अससि । 
जगत कर्ता तूज अससि । जगत धर्ता तूच अससि । 
आदि ब्रम्ह तूच अससि । नित्य अविनाशी आत्मा तुज अससि ।।१ ।।

निती तत्त्वाचे हे वचन । अखंड सत्य हे वचन ।।२ ।।

मजला रक्षी स्तवितांना । मजला रक्षी ऐकतांना । 
मजला रक्षी भक्ती कतांना । मजला रक्षी तुला पुजतांना । 
पश्चिम संकटे तारी । पूर्व संकटे तारी उत्तर संकटे तारी । 
दक्षिण संकटे तारी । उर्ध्व संकटे तारी । 
अधर संकटे तारी । सर्व संकटे तारी ।।५।।

तू वाणीस्वरूप चिन्मयरूप । तू आनंदरूप ब्रह्मरूप । 
तू सत्चित् अद्वितय आनंदरूप । तू साक्षात ब्रह्ममयी । 
तू साक्षात्कारी ज्ञानमयी ।।४।।

कृपेने तुझ्या जगाची उत्पत्ती । कृपेने तुझ्या जगाची उन्नती । 
कृपेने तुझ्या जग एकरूप । कृपेने तुझ्या जग मोक्षरूप ।
रूपे तुझी भूमि आप तेज वायू आकाश । 
कृपेने तुझ्या चार वाणींचा प्रकाश तू तिन्ही गुणांच्या अतीत । 
तू तिन्ही अवस्थांच्या अतीत । तू तिन्ही देहांच्या अतीत । 
तू तिन्ही काळांच्या अतीत । मुलाधर चक्रात नित्य तुझा निवास । 
तिन्ही विश्वशक्ती हाच तुझा श्वास। योगी जन नित्य धरिती तुझा ध्यास। 
तू ब्रह्मा, तू विष्णु, तू रूद्र, तू अग्नी, तू वायू, तू सूर्य, तू चंद्र, 
तू ब्रह्म, भू आणि भवः । तू स्वः आणिक तुज ॐकार ।।६।।
प्रथमोच्चार गण नंतर आदिवर्ण। तद्नंतर अर्धचंद्र, अनुस्वाराचे स्मरण। 
गणनायका हेच तुझ्या मंत्राचे स्वरूप जाण ।।७।।

पूर्वरूपांत गकार । मध्यरूपांत अकार । 
अन्त्यरूपात अनुस्वार । उत्तररूपात बिंदुकार । 
नाद सर्वाचा एक, उच्चार सर्वाचा एक। अशी ही गणेश विद्या पावन। 
ऋषी ज्याचा असे गणक । निवृद गायत्री छंद एक। 
ॐ स्वरूपी या गणपतीला वंदन असो त्रिवार ।।८ ।।

ज्ञान प्राप्त करितो गणपतीचे । ध्यान करितो वक्रतुंडाचे । 
मागतो एकदंताजवळ प्रेरणारूप हे भक्तीचे । स्वरूप ज्याचे एकदंत । 
शोभती त्यास चार हात। पाश अंकुश आयुधे त्यांत । 
वरदान देत नित्य अनंत । मूषकध्वज तो लंबोदर । 
शुर्पकर्ण रक्त वस्त्र सुंदर । रक्त चंदन भाळी अंगी ज्याच्या शेंदूर । 
कृपा करितो निरंतर भक्तांवर। विश्वाचे जो आदिस्थान ।
 तो तया स्थानी स्थिर । सृष्टी निर्मिती आधी जो मुर्तिमंत । 
ज्याचे स्थान प्रकृति व पुरूष यांत। ध्यान त्याचे करी जो भक्त । 
तो समजावा श्रेष्ठ अत्यंत ।।९ ।।

सर्वजनांच्या रक्षकास नमस्कार। शिवगणांच्या रक्षकास नमस्कार । 
प्रमथादी गणांच्या रक्षकास नमस्कार । लम्बोदर एकदंता तुज

नमस्कार ।

संकटनाशका तुज नमस्कार । शिवसुता तुज नमस्कार । 
सर्व भक्तांना वर देणाऱ्या। वरदमुर्तये तुज नमस्कार ।

।। ॐ गं गणपतये नमः ।।

(नक्की वाचा: Ganesh Chaturthi 2025: गणपती बाप्पाला तुळस का अर्पण केली जात नाही?)

गणपती बाप्पाचे श्लोक | Shri Ganpati Shlok In Marathi

1. प्रारंभी विनंती करू गणपती, विद्या दया सागरा
अज्ञानत्व हरोनि बुद्धि मज दे, आराध्य मोरेश्वरा
चिंता क्लेश दरिद्र दुःख अवघे देशांतरा पाठवी
हेरंबा, गणनायका गजमुखा, भक्तां बहु तोषवी

2. मोरया मोरया, मी बाळ तान्हे
सेवा तुझी ती करू काय जाणे?
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी

3.नेत्री दोन हिरो प्रकाश पसरे, अत्यंत ते साजिरे 
माथा शेंदूर पाझरे, वरी बरे दुर्वांकुरांचे तुरे
माझे चित्त नुरे, मनोरथ पुरे, देखोनि चिंता हरे
गोसावी सुत वासुदेव कवि रे, या मोरयाला स्मरे

हेचि दान देगा देवा ।। तुझा विसर न व्हावा ।।1।।
गुण गाईन आवडी ।। हेचि माझी सर्व जोडी ।।2।। 
न लगे मुक्ती धनसंपदा ।। संतसंग देई सदा । ।3 ।।
तुका म्हणे गर्भवासीं ।। सुखें घालावें आम्हांसी ।।4 ।।

जाहले भजन आम्ही नमितों तव चरणां ।। वारुनिया विघ्नें देवा रक्षावें दीनां ।। धृ० ।। 
दास तुझे आम्ही देवा तुलाचि ध्यातों ।। प्रेमें करुनि देवा गुण तुझे गातो ।।1।। 
तरी न्यावी सिद्धि देवा हेचि वासना ।। रक्षुनियां सर्वां द्यावी आम्हासी आज्ञा ।। 2 ।। 
मागणें तें देवा आता एकचि आहे ।। तारुनिया सकळां आम्हा कृपादृष्टी पाहें ।। 3 । । 
जेव्हां आम्ही मिळू ऐशा या ठाया ।। प्रेमानंदे लागू तुझी कीर्ति वर्णाया ।।4 ।। 
सदा ऐसी भक्ती राहो आमुच्या मनीं ।। हेचि देवा तुम्हां असे नित्य विनवणी ।।5।। 
निर्दाळूनी अरिष्टें आता आमुचीं सारी ।। कृपेची साउली देवा दीनांवरी करीं ।। 6 ।। 
निरंतर आमुची चिंता तुम्हां असावी ।। आम्हां सर्वांची लज्जा देवा तुम्हीं रक्षावी ।। 7 ।। 
निरोप घेतों आतां आम्हां आज्ञा असावी ।। चुकलें आमचें काहीं त्याची क्षमा असावी ।।8 ।।

घालीन लोटांगण | Ghalin Lotangan In Marathi

घालीन लोटांगण वंदीन चरण ।
डोळ्यांनी पाहिन रूप तुझे ।
प्रेमें आलिंगीन आनंद पूजन ।
भावे ओवाळिन म्हणे नामा ।।

त्वमेव माता पिता त्वमेव ।
त्वमेव बन्धु: सखा त्वमेव ।
त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव ।
त्वमेव सर्वं मम देवदेव ।।

कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा ।
बुध्यात्मना वा प्रकृति स्वभावात् ।
करमि यद्यत् सकलं परस्मै ।
नारायणायेती समर्पयामि ।।

अच्युतं केशवं राम नारायणम्
कृष्णदामोदरं वासुदेवं भजे।
श्रीधरं माधवं गोपिकावल्लभम्
जानकीनायकं रामचंद्र भजे ।।

हरे राम हरे राम राम राम हरे हरे
हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ।।

।। मंगलमुर्ती मोरया ।।
।। गणपतिबाप्पा मोरया ।।

मंत्रपुष्पांजलिः । Mantra Pushpanjali In Marathi

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तानि धर्माणि प्रथमान्यासन्। 
ते ह नाकं महिमानः सचंत। यत्र पूर्वे साध्याः संति देवाः ।
ॐ राजाधिराजाय प्रसह्यसाहिने नमो वयं वैश्रवणाय कुर्महे। स मे कामान् कामकामाय मह्यं कामेश्वरो वैश्रवणो ददातु । 
कुबेराय वैश्रवणाय महाराजाय नमः । ॐ स्वस्ति साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं माहाराज्यमाधिपत्यमयं समंतपर्या ईस्यात् सार्वभौमः सार्वायुष आंतादापरार्धात्।
 पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकराळिती। 
तदप्येषश्लोकोऽभिगीतो मरुतः परिवेष्टारो मरुत्तस्या-वसन् गृहे। 
अविक्षितस्य कामप्रेर्विश्वेदेवाः सभासद इति ।
एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि । तन्नो दंतिः प्रचोदयात् ।।

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)