जाहिरात

Kalawant Dhol Tasha Pathak Pune: गणेशोत्सवासाठी पुण्यातील ढोल पथकामध्ये सहभागी कसे सहभागी व्हायचं? वाचा माहिती

Kalawant Dhol Tasha Pathak Pune: पुण्यातील ढोल ताशा पथकामध्ये सहभागी व्हायचंय? नियमांपासून ते प्रवेश फीपर्यंत जाणून घ्या सर्व माहिती...

Kalawant Dhol Tasha Pathak Pune: गणेशोत्सवासाठी पुण्यातील ढोल पथकामध्ये सहभागी कसे सहभागी व्हायचं? वाचा माहिती
Kalawant Dhol Tasha Pathak Pune: पुण्यातील ढोल ताशा पथकांमध्ये कसे सहभागी व्हायचं?

रेवती हिंगवे, पुणे

Kalawant Dhol Tasha Pathak Pune: पारंपरिक संगीत आणि सांस्कृतिक उत्सव यांचा अविभाज्य भाग असलेल्या ढोलताशा पथकांची परंपरा महाराष्ट्रात विशेषतः पुण्यात अतिशय लोकप्रिय आहे. गणेशोत्सव, गुढी पाडवा, शिवजयंती आणि अशा अनेक सणांमध्ये ढोलताशा पथकांचा गजर वातावरण भारावून टाकतो. वादन, शिस्त, एकत्रित काम आणि उत्सवातील उर्जा या सर्व गोष्टींचे प्रतीक म्हणजे ढोलताशा पथक. हे दृश्य पाहिल्यानंतर आपणही अशाच एखाद्या ढोलताशा पथकाचा भाग होऊया अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात निर्माण होते. तुम्हाला देखील ढोलताशा पथकामध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे का? काय आहेत नियम, कशी असते प्रवेश प्रक्रिया? किती फी भरावी लागते? या सर्वांची उत्तरं कलावंत ढोल पथकाचा सदस्य आणि अभिनेता सौरभ गोखलेने दिलीय. जाणून घेऊया माहिती...  

ढोल ताशा पथकांमध्ये सहभागी कसे व्हावे | How To Join Dhol Tasha Pathak In Pune

प्रश्न 1: ढोल ताशा पथकात सहभागी होण्यासाठी काय करावे लागते

उत्तर : ढोल ताशा पथकात सहभागी होण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आवड असावी लागते. वादनाची आवड नसेल तर तुम्ही ते करण्यात काही अर्थ नाहीये. थोडा तालाचा अभ्यास पाहिजे. 

प्रश्न 2: पुण्यातील टॉप 5 ढोल ताशा पथके कोणती ?

उत्तर : अशी कुठली नावे घेता येणार नाही. कारण पुण्यात अशी बरेच ढोल पथक आहेत. त्यांच्या सामाजिक कामामुळे आणि वादनामुळे चाहत्यांची संख्या मोठी आहे. तसे सांगायचे झालं तर रमणबाग ढोल पथक, विमलाबाई गरवारे ढोल पथक, अतुल्य ढोल पथक, शिवगर्जना ढोल पथक, नादब्रह्म ढोल पथक, श्री राम ढोल पथक आणि आमच कलावंत ढोल पथक आहेच. 

प्रश्न 3: पुण्यातील टॉप 5 ढोल ताशा पथकात सहभागी होण्यासाठी काय नियम आहे ?

उत्तर : शारीरिकदृष्ट्या तंदुरस्त असणं आवश्यक आहे. 
- मानसिक आरोग्य मजबूत असणं आवश्यक आहे. 
- शिस्त : प्रत्येक ढोल पथकाचे नियम असतात.
- वेळेचे पालन करणे आवश्यक. 

प्रश्न 4: सेलिब्रिटी ढोलताशा पथकामध्ये सहभागी होण्यासाठी काय नियम आहेत?

उत्तर : सेलिब्रिटी ढोल ताशा पथक म्हणजे आमचे कलावंत पथक, यामध्ये सहभागी होण्यासाठी कलाक्षेत्राशी सबंधित असले पाहिजे. यामध्ये पडद्यामागे किंवा पडद्यासमोर सक्रिय असणे गरजेचे आहे.   

प्रश्न 5: कलावंत ढोलताशा पथकाचे नियम काय आहेत? 

उत्तर : आम्ही वयवर्षे 18 खालील मुलांना सहभागी करून घेत नाही कारण त्यांना सांभाळण्याच्या दृष्टीने हे नियम आहे. इतर नियम म्हणजे कलावंत ढोल पथक हे फक्त गणपतीत 10 दिवस वाजवतात बाकी इतर दिवस नाही. वर्षभर तरी उपस्थिती दीड महिन्यात काटेकोरपणे पाळली जाते.

(नक्की वाचा: Pune News: भक्तीला तंत्रज्ञानाची जोड! 3D स्कॅनिंग करत साकारला 54 वर्षांपूर्वीचा हुबेहूब बाप्पा)

प्रश्न 6: कोणाला प्रवेश दिला जात नाही?

उत्तर : आम्ही प्रवेश दिल्यानंतर एक गोष्ट पाळतो की त्या सभासदाला ध्वज ढोल आणि ताशा तीनही गोष्टी यायला हव्या. 

प्रश्न 7: कलावंत ढोलताशा पथकासाठी फी भरावी लागते का?

उत्तर : छोट्या स्वरुपातील प्रवेशी फी असते. ज्या सभासदाला प्रवेश दिलाय त्याची वागणूक, इतरांसोबतची वागणूक आणि अन्य काही गोष्ट पडताळून पाहिल्यानंतरच त्यांना पुढील वर्षी प्रवेश दिला जातो. 

प्रश्न 8: किती दिवस सराव चालतो, सरावाला दांडी मारल्यास दंडात्मक कारवाई होते का?

उत्तर : दीड महिने सराव करतो. जे लोक सरावासाठी नियमित येतात त्यांना 10 दिवसांमध्ये संधी दिली जाते. दंड म्हणजे हेच गणेशोत्सवादरम्यान वादन करू दिले जात नाही. 

प्रश्न 9: ढोल ताशा पथकामध्ये वेगवेगळे विभाग असतात का?  

उत्तर : हो प्रत्येक वादनाचे विभाग असतात. ढोल, ताशा, झांज, ध्वज आणि एक मॅनेजमेंट टीम 

प्रश्न 10: प्रत्येक विभागात किती माणसे असतात ?

उत्तर : प्रत्येक ढोल पथकाच्या वेगवेगळ्या क्षमतेनुसार माणसे असतात. 

प्रश्न 11: प्रत्येक विभागासाठी माणसांची निवड कशी केली जाते?

उत्तर : प्रत्येक विभागासाठी माणसांची निवड त्यांच्या त्यांच्या वादनावर असलेल्या प्रभुत्वानुसार केली जाते. जेवढे वादन चांगलं जमते त्या-त्या विभागासाठी संबंधित माणसाची निवड केली जाते.  

प्रश्न 12: मिरवणुकीमध्ये किती तास ढोल ताशा पथक वाद्यं वाजवतात ? 

उत्तर : साधारण प्रत्येक पथक किमान दोन-तीन तास ते पाच तास वाद्य वाजवतात. 

प्रश्न 13: एक माणूस किती वेळ वादन करू शकतो, त्याला रिप्लेसमेंट असते का ?

उत्तर : वादनाची वेळ प्रत्येकाच्या क्षमतेवर अवलंबून असते. एखाद्याची क्षमता जास्त असेल तर संबंधित व्यक्ती संपूर्ण मिरवणुकीमध्येही वादन करू शकतो. जर कोणी रिप्लेसमेंट मागितली तर तो पर्याय उपलब्ध असतो. जर वादक जास्त असतील ठराविक वेळेनुसार वादकांचे नियोजन केले जाते. दोन तासांची मिरवणूक असेल तर प्रत्येक वादकाला अर्धा-अर्धा तास वादन करायला दिले जाते, म्हणजे सर्वांना संधी मिळते. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com