
Best Ganesha Idol For Homes: विघ्नहर्त्या गणपती बाप्पाच्या आगमनाचे सर्वांनाच वेध लागले आहेत. रवर्षी भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीपासून सुरू होऊन अनंत चतुर्दशीपर्यंत 10 दिवस गणेशोत्सवाची धूम असते. गणेभक्त वर्षभर या उत्सवाची वाट पाहात असतात. तुम्हीही या वर्षी तुमच्या घरी गणपती बसवण्याची तयारी करत असाल, तर गणपतीची मूर्ती घरी आणण्याआधी आणि स्थापन करण्याआधी काही महत्त्वाच्या नियमांबद्दल नक्की जाणून घ्यायला हवे.
बाजारातून गणपतीची मूर्ती कशी खरेदी करावी? (Lord Ganesh Idol Vastu Rules)
हिंदू मान्यतेनुसार, प्रत्येक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार गणपतीची पूजा करतो. उदाहरणार्थ, ज्यांना मानसिक शांतता हवी असते, ते ध्यानस्थ गणपतीच्या मूर्तीची पूजा करतात. ज्यांना कला क्षेत्रात प्रगती करायची आहे, ते वाद्य वाजवणाऱ्या गणपतीच्या मूर्तीची पूजा करतात. तुम्ही पारंपारिक मूर्ती निवडत असाल, तर मूर्तीच्या बनवटीसोबतच तिच्या रंगाची विशेष काळजी घ्यायला हवी. चला तर मग जाणून घेऊया गणपती पूजेसाठी कोणती मूर्ती सर्वात शुभ मानली जाते.
( नक्की वाचा : तुमच्या गणेश मंडळाला मिळणार स्वस्त वीज! Adani Electricity चा मोठा निर्णय, 48 तासांत मिळेल कनेक्शन )
गणपतीची मूर्ती कशी असावी?
हिंदू धर्मात घरात डाव्या सोंडेच्या गणपतीची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्याचप्रमाणे, घरात पूजा करण्यासाठी बसलेल्या मूर्तीची निवड करा. तसेच, मूर्तीसोबत त्यांची सवारी असलेला उंदीर (मूषक) देखील असावा, याची काळजी घ्या. प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या ऐवजी नेहमी मातीची मूर्ती खरेदी करा. जेणेकरून नंतर तुम्ही ती तुमच्या घरात एका बादलीत विसर्जित करू शकाल आणि त्या मातीचा उपयोग कुंडीत करू शकाल. या प्रकारच्या मूर्ती पर्यावरणासाठी अनुकूल असतात. तुम्ही घरात गणपतीची पूजा करत असाल, तर शास्त्रानुसार तुम्ही नेहमी लहान मूर्तीची पूजा करावी. यामुळे ती मूर्ती देवघरात ठेवण्यापासून ते पूजा-अर्चा करण्यापर्यंत सोयीस्कर असते.
कोणत्या रंगाची मूर्ती खरेदी करावी? (Ganesh Murti Color)
तुम्ही तुमच्या आवडीनुसार पांढऱ्या, लाल, पिवळ्या, शेंदरी, हिरव्या, सोनेरी इत्यादी रंगांच्या मूर्ती खरेदी करू शकता, तुम्ही लाल, पिवळ्या आणि शेंदरी रंगांच्या मिश्रणाची मूर्ती निवडली, तर ती अत्यंत शुभ मानली जाते. काळ्या किंवा निळ्या रंगाची जास्त मूर्ती खरेदी करू नका.
घरात गणपतीच्या किती मूर्ती असाव्यात? (Ghar Mein Kitne Ganesh Ji Hone Chahiye)
वास्तुशास्त्रानुसार, घरात गणपतीच्या मूर्तींची संख्या विषम नसावी. हिंदू मान्यतेनुसार, घरात तीन गणपतीच्या मूर्ती शुभ मानल्या जात नाहीत. शक्य असल्यास, नेहमी गणपतीची एकच मूर्ती ठेवा आणि तिची योग्य पद्धतीने पूजा करा.
गणपती कोणत्या दिशेला बसवावा? (Ganesh Murti Vastu Direction)
सनातन परंपरेत केवळ पूजा-अर्चासाठीच नाही, तर सामान्य जीवनातील कामांसाठीही वास्तुशास्त्राची मदत घेतली जाते. वास्तुनुसार गणपतीला घरात बसवायचे झाल्यास, गणपतीची मूर्ती नेहमी उत्तर, पूर्व किंवा उत्तर-पूर्व म्हणजे ईशान्य कोनात ठेवावी. या दिशेला तोंड करून केलेली गणपतीची साधना लवकर यशस्वी होते.
( स्पष्टीकरण : ही बातमी सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क याची जबाबदारी घेत नाही. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world