Garlic Benefits: लसणाच्या फोडणीमुळे जेवणाची चवही वाढते आणि आरोग्यासही फायदे मिळतात. आरोग्यतज्ज्ञ देखील रोज सकाळी रिकाम्या पोटी लसूण खाण्याचा सल्ला देतात. प्रसिद्ध डॉक्टर एरिक बर्ग यांनी यू-ट्युब चॅनेलवर लसूण खाण्याचे फायदे सांगणारा व्हिडीओ शेअर केलाय. व्हिडीओमध्ये डॉ. बर्ग यांनी सांगितले की, प्राचीन काळामध्ये संधिवात, सर्दी-मलेरिया यासारख्या आजारांवर उपचार म्हणून लसणाचा वापर केला जात असे. दुसऱ्या महायुद्धादरम्यान रशियामध्ये औषधं संपलं होती त्यावेळेस संसर्गापासून बचाव करण्यासाठी लसणाचा वापर केला होता. म्हणून लसणाला 'रशियन पेनिसिलिन' (Russian Penicillin) असंही म्हटलं जातं.
लसूण खाण्याचे फायदे | Garlic Eating Benefits
रोगप्रतिकारकशक्ती
डॉक्टर बर्ग यांनी सांगितले की, लसणामध्ये अॅलिसिन नावाचे एक सल्फर कम्पाउंड असते, हे कम्पाउंड शरीराचे संसर्गापासून संरक्षण करते. हिवाळ्यामध्ये रोज एक लसूण खाल्ल्यास वारंवार होणाऱ्या आजारांपासून बचाव होऊ शकतात. विशेषतः सर्दी-खोकल्यासारखे आजार उद्भवत नाहीत.
रक्तदाब
हाय ब्लड प्रेशरमुळे त्रस्त असाल तर लसणाचे सेवन करणं फायदेशीर ठरू शकते. अॅलिसिन कम्पाउंडमुळे रक्त पातळ राहते, तसेच रक्तपेशींनाही आराम मिळतो आणि रक्ताभिसरण प्रक्रियेमध्येही सुधारणा होण्यास मदत मिळते, ज्यामुळे ब्लड प्रेशरची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत मिळते.
शरीर डिटॉक्स होईल
लसणामुळे शरीरातील विषारी घटक शरीराबाहेर फेकले जाण्यास मदत मिळते. यामुळे शरीराची रोगप्रतिकारकशक्ती मजबूत होते.
(नक्की वाचा: Methi Dana Benefits: 14 दिवस मेथी दाणे खाल्ल्यास शरीरात काय होईल? कोणते आजार दूर होतील, वेटलॉस कसा होईल?)
त्वचा
लसणामध्ये अँटी-बॅक्टेरिअल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आहेत, जे पिंपल्सच्या बॅक्टेरियांचा खात्मा करण्यास मदत करतात. त्वचेचे आरोग्यही निरोगी राहते.
(नक्की वाचा: Health News: केसगळती, डोकेदुखी, नैराश्य, मूत्रमार्गातील संसर्गाचा सामना करताय? शरीरात होतेय या गोष्टीची कमतरता)
कोणते लसूण खाणे चांगले ठरेल?डॉक्टर बर्ग यांनी सल्ला दिलाय की, केवळ लसूण खाणे कठीण वाटत असल्यास तुम्ही फर्मेंटेड (Black Garlic) किंवा मधासह लसूण खाऊ शकता. यामुळे अँटी-ऑक्सिडंट्स आणि पोषणतत्त्वांचे प्रमाण वाढते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )