जाहिरात

Health News: केसगळती, डोकेदुखी, नैराश्य, मूत्रमार्गातील संसर्गाचा सामना करताय? शरीरात होतेय या गोष्टीची कमतरता

Health News: तुम्ही देखील केसगळती, डोकेदुखी यासह अन्य गोष्टींचा सामना करताय तर मग तुमच्या शरीरामध्ये महत्त्वपूर्ण गोष्टीची कमतरता निर्माण झालीय.

Health News: केसगळती, डोकेदुखी, नैराश्य, मूत्रमार्गातील संसर्गाचा सामना करताय? शरीरात होतेय या गोष्टीची कमतरता
"Dehydration Symptoms And Causes: पाणी कमी प्यायल्यास काय होईल?"
Canva

Health News: ऑक्सिजनप्रमाणेच पाणी देखील आपल्या शरीरासाठी अतिशय आवश्यक आहे. कित्येक शारीरिक कार्यप्रणाली योग्य पद्धतीने पार पाडण्यामध्येही पाणी महत्त्वाची भूमिका बजावते. पण काही लोक दिवसभरात पुरेशा प्रमाणात पाणी पित नाहीत. काही लोकांना तर त्यांनी किती प्रमाणात पाणी प्यायलंय, हे सुद्धा कळत नाही. शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास असंख्य समस्यांचा सामना करावा लागू शकतो.  

तज्ज्ञांचं काय म्हणणंय?

न्युट्रिशनिस्ट हीरव मेहताने इन्स्टाग्राम हँडलवर शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये म्हटलंय की, बहुतांश लोकांना शरीराच्या आवश्यकतेनुसार किती प्रमाणात पाणी प्यावे, हे कळत नाही. शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झालीय, याचे संकतेही शरीर देत असते. 

कमी प्रमाणात पाणी प्यायल्यास काय होते?

केसगळती (Hair fall)

पाणी कमी प्यायल्यास स्कॅल्पचा भाग कोरडा होतो, ज्यामुळे केस कमकुवत होऊन तुटतात. ही समस्या टाळण्यासाठी जास्तीत जास्त पाणी प्यावे.

रक्ताची पातळी कमी होणे (Anemia)

न्युट्रिशनिस्टच्या मते, शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झाल्यास रक्तप्रवाह प्रभावित होतो. यामळे हिमोग्लोबिनची पातळी कमी होते आणि अशक्तपणा जाणतो.  

तोंडाला वास येणे (Bad breath)

दात घासल्यानंतरही तोंडाला दुर्गंध येत असेल तर कमी पाणी पिणे हे या समस्येमागील कारण असू शकते. पाणी कमी प्यायल्याने तोंड कोरडे होते, तोंडात लाळ तयार झाल्यानंतर बॅक्टेरियांची निर्मिती होते आणि तोंडाला वास येऊ लागतो. 

चिंता आणि तणाव (Anxiety or stress)

शरीर डिहायड्रेट झाल्यास मेंदूवरही याचा परिणाम होतो, यामुळे वारंवार मूड बदलणे, चिडचिड होणे आणि ताण वाढू शकतो. 

डोकेदुखी (Headache)

डिहायड्रेशनमुळे रक्तप्रवाहामध्ये अडथळे निर्माण होतात, ज्यामुळे डोकेदुखीची समस्या निर्माण होऊ शकते. 

युरिन इंफेक्शन (UTI)

कमी पाणी प्यायल्यास लघवीशी संबंधित समस्या निर्माण होतात. मूत्रमार्गामध्ये संसर्ग वाढण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.

Winter Health News: बीट ज्युसमध्ये लिंबू पिळल्यास काय होईल? 15 दिवस हा उपाय केल्यास शरीरात होतील मोठे बदल

(नक्की वाचा: Winter Health News: बीट ज्युसमध्ये लिंबू पिळल्यास काय होईल? 15 दिवस हा उपाय केल्यास शरीरात होतील मोठे बदल)

थकवा आणि अशक्तपणा
  • शरीरातील ऊर्जा टिकून राहण्यासाठी पाणी पिणे आवश्यक आहे. कमी प्रमाणात पाणी प्यायल्यास थकवा, आळश आणि अशक्तपणा जाणवतो.   
  • लघवीचा रंग बदलला असेल, डोकेदुखी, त्वचा कोरडी होत असेल तर शरीरामध्ये पाण्याची कमतरता निर्माण झालीय, हे लक्षात घ्या.  

थंडीत 30 दिवस लाल ज्युस पिण्याचे अद्भुत फायदे, चेहऱ्यावर इतका ग्लो येईल की ब्युटी पार्लरमध्ये जाणं कराल बंद

(नक्की वाचा: थंडीत 30 दिवस लाल ज्युस पिण्याचे अद्भुत फायदे, चेहऱ्यावर इतका ग्लो येईल की ब्युटी पार्लरमध्ये जाणं कराल बंद)

दिवसभरात किती पाणी प्यावे?

दिवसभरात किती पाणी प्यावे हे तुमचे वजन, हवामानावर अवलंबून असते. दिवसभरात कमीत कमी अडीच ते तीन लिटर पाणी प्यावे. 
तसेच डाएटमध्येही पाणीयुक्त खाद्यपदार्थांचा समावेश करावा. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com