What Is Acidity: बदलती जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयींमुळे आजकाल 'अॅसिडिटी' किंवा पित्ताचा त्रास अत्यंत सामान्य झाला आहे. आपल्या पोटात अन्न पचवण्यासाठी हायड्रोक्लोरिक अॅसिड तयार होते, पण याचे प्रमाण प्रमाणाबाहेर वाढल्यास छातीत जळजळ, अॅसिड रिफ्लक्स आणि गॅस्ट्रायटिस यासारख्या समस्या उद्भवतात. वेळेवर न जेवणे, घाईघाईत खाणे आणि जेवल्यानंतर लगेच झोपणे या सवयी या त्रासाला आमंत्रण देतात. यावर वेळीच नियंत्रण मिळवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय आणि दिनचर्येत योग्य बदल करणे अत्यंत गरजेचे आहे. डॉ. रुचा पै यांनी दिलेल्या माहितीनुसार अॅसिडिटी आणि त्यावरील उपाय याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊया...
अॅसिडिटी म्हणजे काय?| What Is Acidity?
पोटात हायड्रोक्लोरिक अॅसिड (Hydrochloric Acid) तयार होतो – जो अन्न पचवतो, एन्झाइम सक्रिय करतात (Enzymes Activate) करतो आणि जीवाणू (Bacteria) मारतो. पण हे अॅसिड (Acid) जास्त झालं तर छातीत जळजळ, अॅसिड रिफ्लक्स (Acid Reflux), पेप्टिक अल्सर्स (Peptic Ulcers), गॅस्ट्रायटिस (Gastritis) होऊ शकतो.
अॅसिडिटीमुळे त्रस्त आहात? या 7 सवयी बंद करा
1.जेवण न करणे: रोज वेगवेगळ्या वेळी जेवणे, यामुळे पोटाचे टाइमटेबल बिघडते परिणामी अॅसिड वाढतो.
2.घाईघाईत जेवणे: एकदम भरपूर खाणे किंवा नीट न चावता गिळणे यामुळे पचन कमकुवत होते.
3. जेवल्यावर लगेच झोपणे: खाल्ल्यानंतर लगेच आडवं पडणे, या सवयीमुळे अॅसिड वर येतो, छातीत जळजळ होते.
4. रात्री उशीरा खाणे (Late night snacking): झोपेपूर्वी पोट भरलेले असते, यामुळे अॅसिड रिफ्लक्स (acid reflux) वाढतो.
5.सतत ताणतणाव: क्रोनिक स्ट्रेसमुळे (Chronic Stress) पोटात अॅसिड (acid) जास्त तयार होतो आणि पचन बिघडते.
6. दारू आणि तंबाखू पोटाच्या अस्तरचे (lining) नुकसान करते आणि अॅसिडचे प्रमाण वाढवतात.
7. तिखट, तेलकट, प्रक्रिया केलेले खाद्यपदार्थ, मसालेदार, तळलेले पदार्थ पोटातला अॅसिड (acid) भडकवतात.
(नक्की वाचा : Sleeping Habits Psychology: उन्हाळा असो वा हिवाळा, तुम्हाला झोपताना चादर लागतेच का? जाणून घ्या यामागील कारण)
अॅसिडिटीसाठी घरगुती उपाय
- गरम पाण्यात / दुधात एक चमचा गाईचं तूप पोटाला आतून शांत करतं
- अॅसिडिटी वाढली / डोकं दुखत असल्यास गुळाचा खडा खा लगेच आराम मिळतो
- सकाळी मऊ भात + गाईच्या तुपाचे सेवन केल्यास पोटाला आराम मिळतो, अॅसिड कमी होतो
- जेवल्यानंतर थोडीशी बडीशेप खा पचन सुधारतं, पोटातील गॅस कमी होतो
(नक्की वाचा: Symptoms of UTI: उन्हाळ्यात लघवी करताना जळजळ होतेय? उष्णता समजून दुर्लक्ष करू नका, असू शकतो हा गंभीर आजार)
हे सुद्धा लक्षात ठेवा
- आले, लसूण, गरम मसाला, शेंगदाणा, मेथी पूर्णतः वर्ज्य करा हे पदार्थ पित्त वाढवतात
- उन्हात जाताना स्कार्फ / कॅप वापरा कारण उन्हामुळे पित्ताचा त्रास होतो
- स्नॅक्स म्हणून मखाना खाऊ शकता. मखाणे हलके आणि पचायला सोपे असतात.
- दुपारी 3 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेदरम्यान - अंजीर, काळ्या मनुका खाव्या. यातील घटक पित्त शांत करतात, पोटाला थंडावा मिळतो.
डॉ. रुचा पै यांनी शेअर केलेली पोस्ट वाचा
अॅसिडिटी फ्री दिनचर्या
1. रोज ठराविक वेळी जेवण करा आणि पोटाचं टाइमटेबल सांभाळा.
2. हळूहळू चावून खा एकदम भरपूर खाऊ नका.
3. जेवल्यानंतर 15 मिनिटे चाला लगेच झोपू नका.
4. रात्रीचे जेवण रात्री 8 वाजेपूर्वी करा. रात्री उशीरा काहीही खाणे बंद करा.
5. नियमित प्राणायम आणि मेडिटेशन करा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )