Gen-Z Jobs: Gen-Z पिढीला आवडतेय अशा पद्धतीची नोकरी, दोन IMP गोष्टींना प्राधान्य; रिपोर्टमध्ये मोठा खुलासा

Gen-Z Jobs: रिपोर्टमधील माहितीनुसार जेन झी पिढी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स खूप वापर करत आहे,दरम्यान काही लोकांना AIपासून धोकाही जाणवत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Gen-Z पिढी कोणत्या प्रकारच्या नोकऱ्या आवडत आहेत"
Canva AI

Gen-Z Jobs: भारतातील आताची तरुण पिढी केवळ पगार पाहून करिअरशी संबंधित निर्णय घेत नाहीयेत, तर कामातील फ्लेक्सिबिलिटी, काम आणि खासगी जीवनातील संतुलन यासारख्या घटकांचा विचार करून नोकरीचे निर्णय घेतले जात आहेत. एका रिपोर्टच्या माध्यमातून ही माहिती समोर आलीय. रँडस्टॅड इंडियाच्या "द जेन-झी वर्कप्लेस ब्लूप्रिंट" या अहवालात म्हटलं गेलंय की, "वर्ष 1997 ते 2012 दरम्यान जन्मलेल्या तरुणांना म्हणजेच जेन-झीना शिफ्ट असलेली पारंपरिक पद्धतीची नोकरी करण्यात आवड नाहीय आणि त्यांच्या वैयक्तिक मूल्यांशी मिळत्याजुळत्या कामाच्या संधींना ही मंडळी प्राधान्य देत आहेत. रिपोर्टनुसार, चांगला पगार, कामाचे फ्लेक्सिबल तास, नोकरी आणि वैयक्तिक जीवनातील संतुलन या गोष्टी तरुण पिढीसाठी प्राधान्यक्रम आहेत. शिवाय जास्तीच्या सुट्या किंवा पारंपरिक सोयीसुविधांच्या तुलनेत परदेशात काम करणं आणि प्रवासाच्या संधी त्यांना अधिक आकर्षित करतात. 

कंपन्यांनाही स्पष्ट मेसेज

रँडस्टॅड इंडिया कंपनीचे सीईओ विश्वनाथ पीएस यांनी म्हटलंय की, ज्या कंपन्या आयुष्यभर शिक्षण, समावेशक संस्कृती आणि लवचिक धोरणे स्वीकारतात त्या केवळ जेन झी तरुणांना आकर्षित करणार नाहीत तर भविष्यासाठी मजबूत व्यवसाय देखील निर्माण करतील. अहवालानुसार, भारतातील जेन झी पिढीचा एक मोठा भाग "कायमस्वरूपी नोकरीसोबत आणखी काही तरी काम करणे" पसंत करतो. रँडस्टॅड डिजिटल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मिलिंद शाह म्हणाले की, या ट्रेंडशी जुळवून घेणाऱ्या टेक कंपन्याच या नवीन पिढीच्या प्रतिभेला आकर्षित करू शकतील.

AI बाबत तरुणांचे काय आहेत विचार?

आर्टिफिशियल इंटेलिजेंसशी संबंधित आलेल्या रिपोर्टमधील माहितीनुसार, 82 टक्के जेन झी व्यावसायिक मंडळी एआयबाबत उत्साही आहेत आणि 83 टक्के लोक समस्या सोडवण्यासाठी याचा वापरही करत आहेत. तर AIमुळे नोकऱ्या प्रभावित होऊ शकतात,  44 टक्के तरुणांना अशी काळजी वाटतेय. पण जेन झी AI टुलचा सर्वात जास्त वापर करत आहेत.

Advertisement

(नक्की वाचा: 30 लाख पगार,5 बंगल्यांचा मालक..पत्नीनं पतीला सोडलं ! CA च्या डोळ्यात अश्रूंचा महापूर, कारण वाचून हादरून जाल)

रिपोर्टनुसार, जेन झीसाठी नोकरीचे वर्ष नाही तर त्याद्वारे मिळणारे वेतनवाढ आणि आदर जास्त महत्त्वाचा आहे. हे बदल म्हणजे कंपन्यांना कामाच्या ठिकाणी संस्कृती आणि अन्य पैलूंशी जुळवून घेण्याची संधी आहे.