Ghee Benefits: तुपाचे 7 जबरदस्त फायदे, आयुर्वेदानुसार तुपाचा वापर कसा करावा? वाचा सविस्तर माहिती

How To Use Ghee In Ayurveda: आयुर्वेदामध्ये तुपाचा वापर करण्याच्या कित्येक पद्धती आहेत, या लेखाद्वारे आपण सात पद्धती आणि त्याचे फायदे जाणून घेऊया...

जाहिरात
Read Time: 2 mins
Benefits of ghee: तुपाचे 7 आश्चर्यकारक फायदे
Canva

How To Use Ghee In Ayurveda: भारतीय पाककृतींमध्ये तुपाचा वापर फार पूर्वीपासून केला जातोय. तुपामुळे खाद्यपदार्थांची चव वाढतेच शिवाय आरोग्यही निरोगी राहण्यास मदत मिळते. तुपापासून फायदे मिळवण्यासाठी बहुतांश लोक याचे सेवन करण्यावर भर देतात. पण तुम्ही तुपाचा वेगवेगळ्या पद्धतीने वापर करू शकता. आयुर्वेदामध्ये तुपाचा वापर करण्याच्या अनेक पद्धती आहेत, या लेखाद्वारे आपण सात पद्धतींची माहिती जाणून घेऊया...

तुपाचा कसा करावा वापर? 

सकाळी रिकाम्या पोटी तूप खाणे 

आयुर्वेदानुसार दिवसाची सुरुवात तूप खाऊन केल्यास आरोग्यास असंख्य फायदे मिळतील. ग्लासभर कोमट पाण्यात एक चमचा तूप मिक्स करा, यामुळे पचनप्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. आतड्यांसाठी तूप वंगणाप्रमाणे काम करते, यामुळे बद्धकोष्ठतेच्या समस्येपासून आराम मिळतो आणि शरीरातील वात दोष संतुलित राहते. जी मंडळी पोट स्वच्छ न होणे, गॅस, त्वचा कोरडी होणे यासारख्या समस्यांपासून त्रस्त असतात; त्यांच्यासाठी तूप खाणे फायदेशीर ठरू शकते. 

रात्रीच्या वेळेस दुधामध्ये तूप मिक्स करुन पिणे 

झोपण्यापूर्वी अर्धा किंवा एक चमचा तूप गरम दुधामध्ये मिक्स करुन प्यावे. यामुळे झोप चांगली येण्यास मदत मिळू शकते. यामुळे मेंदू शांत राहण्यास आणि शरीराला आराम मिळण्यास मदत मिळू शकते. 

तुपाने ऑइल पुलिंग करणे

तूप हलकेसे गरम करुन थंड करा. रोज सकाळी काही मिनिटे तुपाच्या मदतीने गुळण्या करा, आयुर्वेदामध्ये या पद्धतीस ऑइल पुलिंग असे म्हणतात. ऑइल पुलिंगमुळे दात आणि हिरड्या मजबूत होतात, तोंडाचा कोरडेपणा, दातांचा पिवळेपणा आणि तोंडाला येणारा दुर्गंध कमी होतो. 

Advertisement

नस्य थेरपी (नाकामध्ये तुपाचे थेंब सोडणे)

आयुर्वेदामध्ये तुपाच्या मदतीने नस्य थेरपी करण्याचा सल्ला दिला जोता. दोन ते तीन थेंब नाकामध्ये सोडले जातात. यामुळे नाकाशी संबंधित समस्या दूर होण्यास मदत मिळते. 

(नक्की वाचा: Skin Care Tips: सकाळी उठल्यानंतर चमचाभर खा ही गोष्ट, 12 महिने चेहऱ्यावर राहील चमक आणि तेज)

नाभीमध्ये तूप सोडणे 

नाभीशी आपल्या शरीराच्या कित्येक नाड्या जोडलेल्या असतात, असे म्हणतात. नाभीवर तूप लावून हलक्या हाताने मसाज केल्यास शरीरातील अग्नी संतुलित होण्यास मदत मिळते. यामुळे गॅस, बद्धकोष्ठता आणि पोट फुगणे यासारख्या समस्यांपासून आराम मिळतो.  

Advertisement

सांध्यांचा मसाज करणे

गरम तुपाच्या मदतीने सांध्यांचा मसाज केल्यास सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते. तुपाच्या मदतीमुळे सांध्यांवरील सूज कमी होण्यास आणि सांधे लवचिक होण्यास मदत मिळेल. 

(नक्की वाचा: Ghee Health Benefits: पोळीवर तूप लावून खाल्ल्यास शुगर लेव्हल वाढते का? डाएटिशनिस्टने सांगितली मोठी माहिती)
 
त्वचेची होणारी जळजळ आणि जखम

Advertisement

त्वचेवर एखादी जखम झाली असल्यास, ओठ फाटले असतील तर तुपाचा वापर करावा. पण त्वचेसाठी वापरले जाणारे तूप वेगळे असते, हे लक्षात ठेवा.   
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)