
Skin Care Tips In Marathi: योगगुरू बाबा रामदेव अनेकदा आरोग्य, त्वचा आणि केसांशी संबंधित फायदेशीर टिप्स शेअर करत असतात. बाबा रामदेव (Baba Ramdev) यांच्या मते, जर आहार चांगला असेल तर त्याचा परिणाम त्वचेवरही दिसून येतो. बाबा रामदेव यांनी सकाळच्या वेळेस अशाच एका फायदेशीर गोष्टीचे सेवन करण्याचा सल्ला दिलाय. सकाळची सुरुवात पौष्टिक पदार्थांच्या सेवनाने केली तर त्याचा आरोग्याला सर्वाधिक फायदा होतो. विशेषतः पचनप्रक्रिया निरोगी राहते आणि शरीर डिटॉक्स होण्यास मदत मिळते. शरीरातील विषारी घटक बाहेर फेकले गेल्यास आरोग्य निरोगी राहते शिवाय त्वचा डागविरहित आणि चमकदार दिसते. बाबा रामदेव यांनी सकाळी उठल्यानंतर कोणत्या गोष्टीचे सेवन करण्याचा सल्ला दिलाय, ते जाणून घेऊया...
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बाबा रामदेव यांच्या मते ही गोष्ट त्वचेसाठी आहे फायदेशीर
बाबा रामदेव यांनी दिलेल्या सल्ल्यानुसार एका गोष्टीचे नियमित सेवन केले तर त्वचेवर तेज येण्यास मदत मिळू शकते. सकाळी उठल्यानंतर त्यांनी तुपाचे सेवन करण्याचा सल्ला दिलाय. सकाळच्या वेळेस एक चमचा गायीचे तूप किंवा नारळाच्या तेलाचे सेवन केल्यास त्वचा 12 महिने चमकदार राहील.
(नक्की वाचा: Oiling Belly Button: झोपण्यापूर्वी नाभीवर लावा हे तेल, त्वचेसह पोटावर काय होतील परिणाम? न्युट्रिशनिस्टने सांगितले अद्भुत फायदे)
तुपाव्यतिरिक्त बाबा रामदेव यांनी घृतपान आणि कोरफडीचा रस पिण्याचेही फायदे सांगितले आहेत. बाबा रामदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, एक चमचा घृतपान आणि त्यासह दोन ते चार चमचे कोरफडीचा रस पिणे देखील त्वचेसाठी फायदेशीर ठरू शकते. तूप, तिळाचे तेल त्वचेवर लावल्यासही अद्भुत फायदे मिळतील, यामुळे त्वचा तरुण राहण्यास मदत मिळेल. तीळ आणि गाजराच्या सेवनामुळे देखील शरीरामध्ये कोलेजनचे उत्पादन वाढते, असेही बाबा रामदेव यांनी सांगितले. गाजर ज्युस आणि आवळ्याचा रस प्यायल्यास डोळ्यांचे आरोग्य 100 वर्षांपर्यंत निरोगी राहू शकते, असेही ते म्हणाले.
(नक्की वाचा: Clove Benefits: महिनाभर रिकाम्या पोटी लवंग चावून खा, कल्पनाही केली नसेल इतके मिळतील चमत्कारिक लाभ)
सकाळी तुपाचे सेवन करण्याचे फायदे
- बाबा रामदेव यांनी दिलेल्या माहितीनुसार, तूप आरोग्य आणि त्वचेसाठी अतिशय फायदेशीर असते.
- तुपाचे सेवन करुन दिवसाची सुरुवात केल्यास संपूर्ण आरोग्यास मोठे लाभ मिळतील.
- तुपामध्ये हेल्दी फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सिडंट्सचे गुणधर्म आहेत.
- तुपाचे सेवन केल्यास पचनप्रक्रिया सुधारते आणि संपूर्ण शरीराला पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो.
- तुपामध्ये आयुर्वेदिक गुणधर्म मुबलक प्रमाणात आहेत.
- तुपाचे योग्य प्रमाणात सेवन केल्यास वजन कमी होण्यास मदत मिळू शकते, कारण पोषणतत्त्वांमुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारते.
- शरीर डिटॉक्स करण्यासाठी तुपाचे सेवन करणे फायदेशीर ठरू शकते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world