Google Maps चे 6 नवीन भन्नाट फीचर्स, आता प्रवास होणार सुखकर

लोकांच्या अनेकदा तक्रारी असतात की, गूगल मॅप अनेकदा अशा रस्त्यांवर घेऊन जाते तिथे नेव्हिगेट करणे कठीण होऊन जाते. अनेक वेळा लोकांनी तक्रार केली आहे की गुगल मॅपमुळे ते त्यांची गाडी घेऊन अतिशय अरुंद वाटेवर पोहोचले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Google Maps में AI फीचर्स का सपोर्ट मिलेगा।

गुगलने भारतात Google Maps साठी 6 नवीन फीचर्सची घोषणा केली आहे. यूजर एक्सपिरियन्स सुधारण्यासाठी आणि प्रवासात अधिक देण्यासाठी नवीन फीचर्स आर्टिफिशियल इंटेलिजेन्सवर तयार करण्यात आल्याचा कंपनीचा दावा आहे. या आठवड्यात सुरू होणारे अपडेट भारतीय यूजर्सना येणाऱ्या अडचणींवर उपाय असेल. Google Maps च्या 6 फीचर्सबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

AI-पॉवर्ड नॅरो रोड अॅडव्हाईज

लोकांच्या अनेकदा तक्रारी असतात की, गूगल मॅप अनेकदा अशा रस्त्यांवर घेऊन जाते तिथे नेव्हिगेट करणे कठीण होऊन जाते. अनेक वेळा लोकांनी तक्रार केली आहे की गुगल मॅपमुळे ते त्यांची गाडी घेऊन अतिशय अरुंद वाटेवर पोहोचले. जिथून पुढे जाणे अवघड होते. यावर उपाय म्हणून Google आता AI चा वापर करत आहे. ज्यामुळे विशेषत: कार चालवणाऱ्यांसाठी अरुंद रस्ते टाळण्यास मदत करते होईल. यामध्ये सॅटलाईट इमेजरी, स्ट्रीट व्ह्यू  आणि इतर डेटा वापरून रस्त्याच्या रुंदीचा अंदाज लावला जाईल. हे फीचर सुरुवातीला हैदराबाद, बंगळुरू आणि चेन्नईसह 8 शहरांमध्ये उपलब्ध असेल.

Advertisement

नक्की वाचा - तुमच्या मुलांमध्ये हे '5' गुण आहेत? असतील तर तुमचे मूल भविष्यात प्रचंड यशस्वी होईल

फ्लायओव्हर नेव्हिगेशन

गुगल मॅपवरून उड्डाणपूल घ्यायचा की नाही यासंबंधी प्रवासादरम्यान लोकांना अनेकदा समस्यांना सामोरे जावे लागते. ही समस्या सोडवण्यासाठी गुगल मॅप आता 40 भारतीय शहरांमधील शिफारस केलेल्या मार्गांवर फ्लायओव्हर हायलाइट करेल. याचा फायदा चालकांना प्रवासादरम्यान उड्डानपुलाचा वापर करायचा की नाही याबाबत निर्णय घेण्यास मदत होईल.

Advertisement

ईव्ही चार्जिंग स्टेशन इंटिग्रेशन

Google ने 8 हजाराहून अधिक चार्जिंग स्टेशनची माहिती मॅप आणि सर्चमध्ये एकत्रित करण्यासाठी EV चार्जिंग प्रोव्हायडर्ससोबत भागीदारी केली आहे. त्यामुळे यूजर्स आता रिअल-टाइम उपलब्धता आणि चार्जर प्रकारानुसार फिल्टर्सचा वापर करु शकतात. टू-व्हीलर ईव्ही चार्जिंग स्टेशनची माहिती गुगल मॅप्सवर उपलब्ध होणार भारत हा पहिला देश आहे.

Advertisement

10 प्रमुख शहरे आणि पर्यटन स्थळांमधील शिफारस केलेल्या ठिकाणांची यादी तयार करण्यासाठी Google स्थानिक तज्ञांसोबत भागीदारी करत आहे. ज्यामुळे यूजर्सना प्रवास करणे सोपे होईल.

नक्की वाचा - 'Meta AI' देणार 'Gemini AI' ला टक्कर; फेसबुक, व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टाचा वापर होणार सोपा

मेट्रो तिकीट बुकिंग

कोची आणि चेन्नईमधील नागरिकांना ONDC आणि Namma Yatri वर नवीन मेट्रो तिकीट बुकिंग सुविधेचा फायदा होईल. Google Maps द्वारे थेट तिकीट खरेदीस मदत होईल. 

रस्ते अपघाताची तक्रार

नवीन अपडेटमध्ये यूजर्सना रस्ते आपघातांची तक्रार करणे आणि माहिती शेअर करणे सोपे होते. हे फीजर Android, iOS, Android Auto आणि Apple CarPlay वर उपलब्ध असेल. भारतातील अँड्रॉइड आणि आयओएस उपकरणांवर ही फीचर्स हळूहळू लागू केली जातील.