जाहिरात

Grapes Benefits: रोज एक वाटी द्राक्षे खाण्याचे 'हे' आहेत फायदे, तुम्ही कधी विचारही केला नसले

त्यामुळेच रोज एक वाटी द्राक्ष नक्की खाण्याचा सल्ला दिला जातो.

Grapes Benefits: रोज एक वाटी द्राक्षे खाण्याचे 'हे' आहेत फायदे, तुम्ही कधी विचारही केला नसले
  • द्राक्षे जीवनसत्त्वांनी समृद्ध असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी विटामिन C मुबलक प्रमाणात असते
  • द्राक्षांमध्ये मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी आवश्यक विटामिन B6 तसेच हाडांसाठी विटामिन K आढळते
  • नियमित द्राक्षे सेवन केल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि रक्ताभिसरण सुधारते
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

फळांच्या दुनियेत द्राक्षांना त्यांच्या चवीमुळे आणि गुणधर्मांमुळे विशेष स्थान आहे. द्राक्षे केवळ चविष्टच नसून ती अनेक जीवनसत्वांचा (Vitamins) खजिना आहेत. आरोग्यासाठी द्राक्षे खाणे किती फायदेशीर आहे आणि त्यामध्ये नेमकी कोणती जीवनसत्वे असतात, यावर आरोग्य तज्ज्ञांनी प्रकाश टाकला आहे. द्राक्ष खाणे हे आरोग्यासाठी चांगले असते. रोज द्राक्ष खाण्याचे अनेक फायदे ही आहेत. त्यामुळे रोज एक वाटी द्राक्ष नक्की खाण्याचा सल्ला दिला जातो. 

नक्की वाचा - Beer Bottle: बिअर बाटलीच्या झाकणाला 21 कडा असल्याचं कारण काय? 133 वर्षांपूर्वीचं रहस्य माहित आहे का?

द्राक्षांमध्ये मुख्यत्वे विटामिन C मुबलक प्रमाणात असते. जे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. याशिवाय यात विटामिन B6 असते. जे मेंदू आणि मज्जासंस्थेसाठी (Nervous System) उपयुक्त ठरते. हाडांच्या आरोग्यासाठी आवश्यक असलेले विटामिन K आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी विटामिन A देखील यात अल्प प्रमाणात आढळते. नियमित द्राक्षे खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. शिवाय रक्ताभिसरण सुधारते. पचनसंस्थेच्या तक्रारी असणाऱ्यांसाठी द्राक्षातील फायबर अत्यंत गुणकारी मानले जाते.

नक्की वाचा - Expert Advice: दारूच्या एका पेगवर किती पाणी प्यावे? मद्यपानाचा हा नियम 99 टक्के मद्यपींना माहितच नाही

द्राक्षांमधील प्रमुख जीवनसत्वे:

  • विटामिन C: रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आणि संसर्गाशी लढण्यासाठी उपयुक्त.
  • विटामिन B6: मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी आणि मानसिक आरोग्यासाठी आवश्यक.
  • विटामिन K: हाडांच्या बळकटीसाठी आणि रक्ताच्या गुठळ्या होण्यापासून रोखण्यासाठी.
  • विटामिन A: डोळ्यांची दृष्टी चांगली ठेवण्यासाठी उपयुक्त.

नियमित सेवनाचे फायदे:

  • हृदय आरोग्य: रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास आणि हृदयविकारांचा धोका कमी करण्यास मदत.
  • पचन: फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते.
  • त्वचा: अँटी-ऑक्सिडंट्समुळे त्वचा दीर्घकाळ तरुण आणि चमकदार राहते.

नक्की वाचा - पत्नीला आनंदी कसे ठेवावे? 99 टक्के जोडप्यांना माहितच नाही, प्रेमानंद महाराजांनी सांगितला सुखाचा मंत्र

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com