जाहिरात

मेंदीमुळे केस दिसतात नारिंगी? लोखंडाच्या कढईत तयार करा डाय, केस होतील काळेभोर

Mehendi For White Hair: नारिंगी नव्हे तर केसांना नैसर्गिक काळा रंग येईल. कसे तयार करावे नैसर्गिक डाय, जाणून घ्या सविस्तर माहिती...

मेंदीमुळे केस दिसतात नारिंगी? लोखंडाच्या कढईत तयार करा डाय, केस होतील काळेभोर
White hair Home Remedies: पांढऱ्या केसांसाठी रामबाण उपाय

Hair Care Tips: वाढत्या वयोमानानुसार किंवा काही लोकांचे कमी वयामध्येही केस पांढरे होतात. ऊन, प्रदूषण आणि केमिकलयुक्त प्रोडक्ट्सच्या वापरामुळेही केसांचे नुकसान होते. पांढरे केस लपवण्यासाठी काही लोक मेंदीचा वापर करतात. पण मेंदीमुळे केसांचा रंग नारिंगी किंवा लाल होतो. चहा पावडर किंवा कॉफी पावडर मेंदीमध्ये मिक्स करुन पांढऱ्या केसांवर लावल्यास केसांना चांगला रंग मिळणार नाही. केसांना नैसर्गिक काळा रंग मिळावा यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये मेंदीचे डाय तयार करू शकता. किचनमध्ये उपलब्ध असणाऱ्या सामग्रींचा यामध्ये समावेश करावा, जाणून घेऊया सविस्तर माहिती....

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पांढऱ्या केसांसाठी मेंदीचे डाय

केसांसाठी मेंदी तयार करण्यासाठी लोखंडाच्या कढईमध्ये एक ग्लास बिटाचा रस मिक्स करावा. त्यामध्ये थोडी मेंदी, बिटाचे डाय पावडर, दोन चमचे कलौंजी पावडर, दोन चमचे मेथीच्या दाण्यांची पावडर आणि दोन चमचे चहा पावडर मिक्स करावी. सर्व सामग्री व्यवस्थित गॅसवर शिजू द्यावी. मिश्रण तयार झाल्यानंतर गॅस बंद करावा. लोखंडाच्याच कढईमध्ये हे मिश्रण 24 तासांसाठी झाकून ठेवावे.

दुसऱ्या दिवशी या पावडरमध्ये पाणी मिक्स करा आणि डाय तयार झाल्यानंतर केसांवर लावा. अर्ध्या तासाने केस सौम्य शॅम्पू आणि थंड पाण्याने स्वच्छ धुवावे. या मिश्रणामुळे केसांचा रंग नारिंगी होणार नाही तर केसांना नैसर्गिक काळा रंग मिळेल.  

(नक्की वाचा:Hair Transplant: हँडसम दिसण्याच्या नादात तरुणाचा जीव गेला! हेअर ट्रान्सप्लांट करण्याआधी 'हे' वाचा)

केसांसाठी हे उपाय देखील ठरतील फायदेशीर

- आवळा आणि मेथीच्या दाण्यांपासूनही हेअरमास्क तयार करू शकता. या हेअरमास्कमुळे केसांना काळा रंग मिळू शकतो. हेअरमास्क तयार करण्यासाठी सहा ते सात आवळ्यांचे तुकडे, तीन चमचे नारळाचे तेल, एक चमचा मेथी पावडर एका भांड्यामध्ये उकळत ठेवा. मिश्रण थंड झाल्यानंतर हेअरमास्क लावा आणि शक्य असल्यास रात्रभर ठेवावे. दुसऱ्या दिवशी सकाळी केस स्वच्छ धुऊन घ्या.   

(नक्की वाचा: Beauty Tips: ओल्या केसांमध्ये कंगवा का फिरवू नये?)

- चहा पावडरच्या पाण्याने आठवड्यातून दोन ते तीन वेळा केस धुतल्यास पांढऱ्या केसांचा रंग काळा होऊ शकतो. पाण्यामध्ये चहा पावडर उकळा आणि त्या पाण्याने केस धुवावे. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com