Gulkand Eating Benefits In Summer: उन्हाळ्याच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी लोक आहारामध्ये नैसर्गिक तसेच पारंपरिक पदार्थांचा आहारामध्ये समावेश करू लागले आहेत. यापैकीच एक गोष्ट म्हणजे ताज्या गुलाबाच्या पाकळ्यांपासून तयार केलेला गुलकंद, जो केवळ चविष्टच नाही तर शरीराला थंडावा देण्याचं काम करतो. गुलाबाच्या ताज्या पाकळ्या, साखर किंवा गूळ एकत्र करून गुलकंद तयार केला जातो. बहुतांश भारतीय घरांमध्ये तुम्हाला गुलकंद नक्कीच आढळेल. उन्हाळ्यात थंडावा देणारा हा नैसर्गिक पदार्थ लोकप्रिय आहे. जुन्या काळी आजी-पणजी घरीच गुलकंद तयार करायच्या आणि मुलांना चमचाभर गुलकंद खायला द्यायच्या.
गुलकंदाचे सेवन कसे करावे? (How To Eat Gulkand)
गुलकंदाचे सेवन अनेक प्रकारे केले जाऊ शकते. तुम्ही थेट चमचाभर गुलकंद खाऊ शकता. तसेच दूध किंवा दह्यासोबत मिक्स करूनही गुलकंद खाऊ शकता. गुलकंदाचा सरबत तयार करू शकता किंवा हलवा, लाडू आणि आईस्क्रीममध्येही मिक्स करून गुलकंद खाल्ला जाऊ शकतो. उन्हाळ्यात गुलकंद घातलेले थंड दूध किंवा सरबत पिणे हे अनेकांना आवडते.
गुलकंद खाण्याचे फायदे (Gulkand Khane Ke Fayde)
1. शरीर थंड राहते
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, गुलकंदामध्ये गुलाबाच्या पाकळ्यांचे नैसर्गिक गुणधर्म असतात, जे शरीराला थंडावा देतात. यामुळे उष्णतेमुळे येणारा थकवा, चिडचिडेपणा आणि ताण कमी होण्यास मदत होते.
(नक्की वाचा: Best Times To Consume Sweets: गोड पदार्थाचे सेवन कधी करावे, जेवणानंतर की जेवणापूर्वी? आयुर्वेदातील मोठी माहिती)
2. पचनशक्ती सुधारते
गुलकंदातील घटक पचनसंस्था मजबूत करण्यास आणि अन्नाचे पचन करण्यास मदत करते. उन्हाळ्यात अनेकदा पोटाच्या समस्या वाढतात, अशा वेळी दररोज थोड्या प्रमाणात गुलकंदाचे सेवन केल्यास पचन सुधारते आणि ॲसिडिटीच्या समस्येतून आराम मिळतो.
3. रोगप्रतिकारशक्ती (Immunity)
गुलकंदामध्ये अँटी-ऑक्सिडंट्सचे प्रमाण चांगले असते, जे शरीराची रोगप्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करते.
4. त्वचेसाठी फायदेशीर
उन्हाळ्यात त्वचेच्या समस्या सामान्य आहेत, त्वचा लवकर निस्तेज दिसू लागते. अशा परिस्थितीत त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी गुलकंद प्रभावी ठरतो.
(नक्की वाचा: Chia Seeds: चिया सीड्समध्ये आरोग्याचा मोठा खजिना! 14 दिवसांत वजन, पचन, हृदयाच्या आरोग्यात होतील जबरदस्त बदल)
5. शरीराचे तापमान
गुलकंद नैसर्गिकरित्या शरीराचे तापमान संतुलित राखण्यास मदत करतो.
Note: उन्हाळ्यामध्ये कृत्रिम आणि पाकिटातील कोल्ड ड्रिंक्स पिण्याऐवजी घरच्या घरी तयार केलेला गुलकंद शरीरासाठी अधिक फायदेशीर ठरू शकतो. पण मधुमेहाच्या (Diabetes) रुग्णांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच याचे सेवन करावे, कारण यात साखरेचे प्रमाण असते.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
(ही बातमी एनडीटीव्ही टीमने संपादित केलेली नाही. ही बातमी सिंडीकेट फीडद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे. )