Chia Seeds Health Benefits: खरंच इवल्याशा बिया अवघ्या 14 दिवसांत आपल्या शरीरात बदल घडवून आणू शकता का? तर या प्रश्नाचे उत्तर हो असे आहे. चिया सीड्स आकाराने लहान असल्या तरी यामध्ये पोषकतत्त्वांचा खजिना आहे. या बियांमध्ये फायबर, ओमेगा 3 फॅटी अॅसिड, प्रोटीन आणि अँटी-ऑक्सिडंट्स जास्त प्रमाणात असतात. गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. सौरभ सेठी यांच्या मते, जर तुम्ही रोज एक ते दोन चमचे चिया सीड्सचे सेवन केले, तर केवळ दोन आठवड्यांत शरीराची पचनशक्ती सुधारेल, शरीराच्या ऊर्जेची पातळी वाढेल आणि हृदयाचे आरोग्य अधिक चांगले होईल. या बिया पाण्यात भिजवल्यानंतर फुगून जेलसारख्या होतात, ज्यामुळे पोट बराच वेळ भरलेले राहते आणि रक्तातील शर्करेची पातळी (Blood Sugar) नियंत्रित राहण्यास मदत होते.
चिया सीड्स खाण्याचे फायदे काय? | What Happens When You Eat Chia Seeds?
1. पचनसंस्था मजबूत होईल
पचनसंस्थेच्या आरोग्यासाठी चिया सीड्स अत्यंत फायदेशीर आहेत. यामध्ये सोल्युबल (Soluble) फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. फायबरमुळे आतड्यांची स्वच्छता होते आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर करण्यास मदत करते. तसेच हे गुड बॅक्टेरिया वाढवण्यास मदत करते, ज्यामुळे गट हेल्थ (Gut Health) सुधारते.
2. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर
हृदयाच्या आरोग्यासाठी चिया सीड्स एखाद्या वरदानापेक्षा कमी नाहीत. यातील ओमेगा-3 फॅटी ॲसिड शरीरातील खराब कोलेस्टेरॉलची पातळी (LDL) कमी करण्यास मदत करते. याशिवाय त्यातील अँटी-ऑक्सिडंट्स शरीरातील सूज (Inflammation) कमी करतात. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो आणि हृदय मजबूत होते.
(नक्की वाचा: Happy Hormones: तणावमुक्त व्हायचंय? मोबाइल सोडा, हे 4 हार्मोन्स वाढवा; फॉलो करा डॉ. रुचा पै यांच्या टिप्स)
3. रक्तशर्करा नियंत्रित ठेवण्यासाठी फायदेशीर
रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवायची असेल तर चिया सीड्सचे सेवन करणं खूप उपयुक्त ठरू शकते. या बियांचे धीम्या गतीने पचन होते, ज्यामुळे ग्लुकोज रक्तामध्ये हळूहळू मिसळते. या बियांचा ग्लायसेमिक इंडेक्स देखील कमी असतो. त्यामुळे मधुमेह नियंत्रणात ठेवण्यासाठी चिया सीड्स अत्यंत प्रभावी आहेत.
चिया सीड्सचे सेवन कसे करावे?
- एक ते दोन चमचे चिया सीड्स रात्रभर पाणी किंवा दुधामध्ये भिजवून ठेवा.
- सकाळी रिकाम्या पोटी किंवा नाश्त्यामध्ये बियांचे सेवन करा.
- चिया सीड्स स्मूदी, ओट्स किंवा दह्यामध्ये मिक्स करून खाऊ शकता.
सुरुवातीला कमी प्रमाणात सेवन करण्यास सुरुवात करा.
- अतिसेवनामुळे पोटात गॅस किंवा ब्लोटिंगची समस्या होऊ शकते.
- चिया सीड्स कायम भिजवूनच खाव्या, कोरड्या बिया खाणे टाळावे.
केवळ 14 दिवसांतच तुम्हाला तुमच्या पचनशक्तीत, हृदयाच्या आरोग्यात आणि रक्तातील साखरेच्या पातळीत मोठा बदल जाणवू शकेल. जर तुम्हाला सोप्या आणि नैसर्गिक पद्धतीने फिट राहायचे असेल, तर चिया सीड्सचा तुमच्या आहारात नक्की समावेश करा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world