Astro Tips: गुरुचा कर्क राशीत प्रवेश; या राशींचे भाग्य उजळणार की वाढणार चिंता?ज्योतिषी देशपांडेंचा मोठा खुलासा

Guru Gochar 2026: देवगुरु बृहस्पती 1 जून 2026 रोजी स्वतःच्या उच्च 'कर्क' राशीत प्रवेश करत आहेत. 12 राशींवर काय प्रभाव पडेल, त्याचे अचूक फळ आणि विशेष सूत्र याबाबत पंचांगकर्ते पं गौरव देशपांडे यांनी दिलेली माहिती जाणून घेऊया..

जाहिरात
Read Time: 4 mins
"Guru Gochar 2026: गुरुचा कर्क राशीत प्रवेश, काय होणार फेरबदल?"
Canva

- पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे

Guru Gochar 2026: देवगुरु बृहस्पती आज (1 जून 2026) रोजी मिथुन राशीतून स्वतःच्या उच्च अशा 'कर्क' राशीत प्रवेश करत आहेत. पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांच्या सूर्यसिद्धांतीय देशपांडे पंचांगानुसार, गुरु महाराजांचे हे उच्च राशीतील गोचर 30 ऑक्टोबर 2026 पर्यंत असणार आहे. संपूर्ण ब्रह्मांडात आणि मानवी जीवनात मोठे फेरबदल घडवून आणणारा हा काळ ठरेल. या संक्रमणाचा मेष ते मीन अशा सर्व 12 राशींवर काय परिणाम होणार, याचे अचूक व सविस्तर फळ सूत्रासह खालीलप्रमाणे आहे. जाणून घेऊया पंचांगकर्ते पं. गौरव देशपांडे यांनी दिलेली माहिती... 

1. मेष जन्मराशी -गुरु चतुर्थस्थानी
- चतुर्थे ऽर्थविलयम्
- घर, वाहन, जमीन, आई, कुटुंब, गुहसुख या विषयांवर लक्ष.
- खर्च, दुरुस्ती, घरातील जबाबदारी, मालमत्ता विषयातील आर्थिक दडपण येऊ शकते.
- गुरु उच्च असल्याने घरात धार्मिक कार्य, कुटुंबातील चांगले निर्णय, गृहसुखाचा विस्तार होऊ शकतो.
- सूत्रः घर मिळेल, पण खर्चासह. सुख येईल, पण जबाबदारी घेऊन.

Advertisement

2. वृषभ जन्मराशी -गुरु तृतीयस्थानी
तृतीयेऽङ्ग‌कलेशम्
- पराक्रम, भावंडे, लेखन, प्रवास, प्रयत्न आणि धावपळ वाढेल.
- शरीरावर थकवा, हात-खांदे, गळा, श्वास, प्रवासातील त्रास होऊ शकतो.
- उच्च गुरु असल्याने धार्मिक प्रवास, लेखन, ज्ञानवृद्धी आणि धाकट्या भावंडांसाठी शुभ कार्य शक्य.
- सूत्रः प्रयत्न वाढतील, शरीर थकेल; पण ज्ञान, लेखन आणि धैर्याच्या मार्गाने लाभ मिळू शकतो.

3. मिथुन जन्मराशी -गुरु द्वितीयस्थानी
धनस्थोऽथीमतुलम्
- धन, कुटुंब, वाणी, संचय, अन्न, संस्कार या विषयांवर गुरु कृपा.
- कुटुंबात मंगलकार्य, बँक-बॅलन्स, आर्थिक स्थैर्य वाढू शकते.
- योग्य सल्ला, योग्य गुंतवणूक आणि कुटुंबाचा आधार लाभू शकतो.
- सूत्रः धनवृद्धी, कुटुंबवृद्धी आणि वाणीला मान - हा गुरु तुमच्यासाठी अत्यंत फलदायी.

4. कर्क जन्मराशी -गुरु जन्मस्थानी
जन्मनि भयम्
- मन, शरीर, निर्णय आणि व्यक्तिमत्त्वात मोठे बळ येऊ शकते.
- आतून अनामिक चिंता किंवा "आता पुढे काय?" असा प्रश्न उभा राहू शकतो.
- उच्च गुरु असल्याने धर्म, ज्ञान, प्रतिष्ठा, व्यक्तिमत्त्व, संतती, विवाह, शिक्षण या विषयांत वाढ.
- सूत्रः अनामिक भीती किंवा टेन्शन येईल, पण तीच भीती तुम्हाला मोठ्या जीवननिर्णयाकडे नेईल.

5.  सिंह जन्मराशी -गुरु द्वादशस्थानी
द्वादशग; तनु-मानसपीडाम्
- खर्च, परदेश, निद्रा, रुग्णालय, तपस्या, दान, एकांत हे विषय सक्रिय होतील.
- मानसिक ताण आणि शरीरातील थकवा वाढू शकतो.
- उच्च गुरु असल्याने धार्मिक कार्य, तीर्थयात्रा, साधना, शिक्षण किंवा परदेशासाठी अर्धपूर्ण खर्च संभवतो.
- सूत्रः खर्च आणि मानसिक ताण वाढेल; पण तोच काळ साधना, दान आणि अंतर्मुखतेचा होऊ शकतो.

Advertisement

(नक्की वाचा : Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी! जूनच्या पहिल्या आठवड्यात 'या' राशींना लागणार जॅकपॉट, त्या राशी कोणत्या?)

6. कन्या जन्मराशी -गुरु एकादशस्थानी
स्थानधनानि ददाति स चाये
- लाभ, धनप्राप्ती, मोठे संपर्क, समाजात स्थान, व्यवसाय-विस्तार आणि इच्छापूर्ती यांसाठी चांगला काळ.
- senior लोकांचा आधार, network मधून लाभ, संस्थात्मक संधी मिळू शकते.
- विद्यार्थ्यांना यश, व्यापान्यांना विस्तार, अविवाहितांसाठी विवाहयोग संभवतो.
- सूत्रः इच्छापूर्ती, धनलाभ आणि समाजात स्थान - हा गुरु तुमच्या लाभस्थानाला जागवतो.

7. तुला जन्मराशी -गुरु दशमस्थानी
दशमे वित्तहरः
- कर्म, पद, व्यवसाय, अधिकार, प्रतिष्ठा या क्षेत्रांत काम व जबाबदारी वाढेल.
- आर्थिक गणितावर दबाव, खर्च किंवा गुंतवणूक वाढू शकते.
- करिअर बदल, विभाग बदल, वरिक्तांचा ताण किंवा व्यवसायात मोठी गुंतवणूक संभवते.
- सूत्रः कर्मक्षेत्रात मोठे बळण; प्रतिष्ठा येईल, पण पैशाचे नियोजन करा.

Advertisement

8.वृश्चिक जन्मराशी-गुरु नवमस्थानी 
धर्मगतो धनवृद्धिकरः
- भाग्य, धर्म, गुरु-कृपा, उच्च शिक्षण, तीर्थयात्रा, सन्मान आणि विद्या यांत वाढ.
- धनवृद्धी, वडिलांचे आशीर्वाद, पुण्यकर्म, संततीसंबंधी शुभ वार्ता संभवते.
- योग्य गुरु मिळणे आणि जीवनदृष्टी बदलणे शक्य.
- सूत्रः भाग्य जागेल, गुरु-कृपा मिळेल, धर्म आणि धन -दोन्ही वाढतील.

9. धनु जन्मराशी -गुरु अष्टमस्थानी
निधने धननिचयनाशम्
- धनसंचयावर दबाव, विमा, कर, कर्ज, वारसा आणि कुटुंबातील गुप्त प्रश्न सक्रिय होऊ शकतात.
- आरोग्यकाळजी, मानसिक उलथापालथ आणि अचानक घटना अनुभवास येऊ शकतात.
- हा काळ आध्यात्मिक परिवर्तनाचा, गूढशास्त्र अभ्यासाचा आणि जुनी मानसिकता सोडण्याचा आहे.
- सूत्रः धनसंचय सांभाळा, आरोग्य सांभाळा; पण हा काळ अंतर्मुख परिवर्तनाचा आहे.

10. मकर जन्मराशी -गुरु सप्तमस्थानी
+ दयुने पूजाम् +
- विवाह, भागीदारी, समाज, व्यापार आणि सार्वजनिक व्यबहार यांत मान व सुधारणा.
- विवाहयोग, दांपत्यसौख्य, लोकसंपर्क आणि business partnership यांत लाभ.
- ताणलेले संबंध संवादाने सुधारु शकतात.
सूत्रः मान वाढेल, संबंध सुधारतील, विवाह/भागीदारीत नवा अध्याय सुरू होईल.

11. कुंभ जन्मराशी -गुरु षष्ठस्थानी
अरिगृहे रुजम्
- रोग, ऋण, शत्रू, कोर्ट-कचेन्या, सेवा, स्पर्धा आणि नोकरीतील संघर्ष या विषयांत सावधगिरी.
- आरोग्य, वजन, पचन, साखर, चरबी, यकृत, जडपणा, कर्ज किंवा कामाचा ताण वाढू शकतो.
- शिस्त ठेवली तर शत्रुवर विजय, न्यायालयीन प्रक्रियेत मार्ग आणि नोकरीत स्थिरता मिळू शकते.
- सूत्रः आरोग्य आणि कर्जाकडे दुर्लक्ष नको; शिस्त ठेवली तर संघर्षातून विजय मिळेल.

12.मीन जन्मराशी -गुरु पंचमस्थानी
पुत्रस्थाने सुखम्
- विद्या, संतती, बुद्धी, प्रेम, मंत्र, पूर्वपुण्य, सर्जनशीलता, शिक्षण यांत वृद्धी.
-विद्यार्थ्यांना चांगले परिणाम, संतानसुख, अध्यापन, लेखन, ज्योतिष, वेदाध्ययन यांसाठी उत्तम.
- भक्ति आणि आध्यात्मिक अभ्यास वृद्धिंगत होऊ शकतो.
- सूत्रः विद्या, संतती, प्रेम आणि साधना -या सर्व क्षेत्रांत गुरु तुमचा हात धरतो.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)