जाहिरात

Guru Pradosh Vrat 2026 Shubh Muhurat: गुरू प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, कशी करावी पूजा, महाउपायही जाणून घ्या

Guru Pradosh Vrat 2026 Shubh Muhurat: सनातन परंपरेनुसार कोणत्याही महिन्यातील त्रयोदशी तिथीला पाळले जाणारे प्रदोष व्रत अतिशय महत्त्वाचे मानले जाते. हे व्रत गुरुवारच्या दिवशी आल्यास त्याचे महत्त्व अधिक वाढते.

Guru Pradosh Vrat 2026 Shubh Muhurat: गुरू प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त, कशी करावी पूजा, महाउपायही जाणून घ्या
"Guru Pradosh Vrat 2026 : नववर्षाच्या पहिल्याच दिवशी जुळून आलाय शुभ योग"
NDTV

Guru Pradosh 2026 Vrat Puja Vidhi: हिंदू मान्यतेनुसार सूर्यास्त आणि रात्रीच्या संधिकालास प्रदोष काळ (Pradosh Kal) असे म्हणतात. हा प्रदोष काळ भगवान शिव यांच्या पूजेसाठी अत्यंत शुभ आणि फलदायी मानला जातो. पंचांगानुसार प्रत्येक महिन्यातील कृष्णपक्ष आणि शुक्लपक्षातील त्रयोदशी तिथीला प्रदोष व्रताचे पालन केले जाते. या दिवशी भगवान महादेव तसेच संपूर्ण शिव परिवाराची पूजा केल्यास भाविकांच्या मनातील इच्छा पूर्ण होतात, असे म्हणतात. हे व्रत जर गुरुवारी आले तर त्याचे पुण्यफळ अधिक वाढते. जाणून घेऊया गुरू प्रदोष व्रताचा शुभ प्रदोष काळ शुभ मुहूर्त, पूजा विधी आणि उपाय...  

गुरु प्रदोष काळ तिथी | Guru Pradosh Kaal 2026 Tithi

पंचांगानुसार पौष महिन्यातील शुक्लपक्षाची त्रयोदशी तिथी गुरुवारी म्हणजे 1 जानेवारी 2026 रोजी उत्तररात्री 01:47 (AM) वाजता सुरू होणार असून त्याच तारखेला रात्री 10.22 वाजता तिथी समाप्त होणार आहे. 

गुरु प्रदोष व्रताचा शुभ मुहूर्त | Guru Pradosh Kaal 2025 Vrat Shubh Muhurat 

1 जानेवारी रोजी महादेवाची विधीवत पूजा करण्यासाठी प्रदोष काळ संध्याकाळी 05:35 वाजेपासून ते रात्री 08:19 वाजेपर्यंत आहे. म्हणजे शिवभक्तांना वर्षाच्या पहिल्याच दिवशी शिवपूजेसाठी एकूण 2 तास 44 मिनिटांचा शुभ वेळ मिळणार आहे. 

Latest and Breaking News on NDTV
गुरु प्रदोष व्रताची पूजा विधी | Guru Pradosh 2026 Vrat Puja Vidhi
  • गुरु प्रदोष व्रत करण्यासाठी सर्वप्रथम पहाटे उठून स्नान करावे.
  • शिव–पार्वतीचे ध्यान करत व्रताचा संकल्प करावा आणि सकाळी भगवान शंकराच्या पिंडीवर जल अर्पण करावे. 
  • त्यानंतर दिवसभर व्रत करून शिवाचे स्मरण करत आपली दैनंदिन कामे करावीत.
  • संध्याकाळी प्रदोष काळात पुन्हा एकदा स्वच्छ होऊन भगवान शिवांना चंदन, भस्म, बेलपत्र, शमीपत्र, गंगाजल, फळे आणि फुले अर्पण करून पूजा करावी. 
  • त्यानंतर प्रदोष व्रताच्या कथेचं पठण करावे किंवा कथा ऐकावी.
  • रुद्राक्षाच्या माळेने शक्य तितके शिवमंत्राचा जप करावा. 
  • पूजा पूर्ण झाल्यानंतर भगवान शिवांची आरती करणे विसरू नये.

New Year 2026 Horoscope In Marathi: गुरू कोणाचं वाढवणार गुडलक, शनीमुळे कोण होणार त्रस्त; 12 राशींचे 12 महिन्यांचे भविष्य

(नक्की वाचा: New Year 2026 Horoscope In Marathi: गुरू कोणाचं वाढवणार गुडलक, शनीमुळे कोण होणार त्रस्त; 12 राशींचे 12 महिन्यांचे भविष्य)

गुरु प्रदोष व्रताचा महाउपाय | Guru Pradosh 2026 Upay
  • गुरु प्रदोष व्रताच्या दिवशी सौभाग्य प्राप्तीसाठी स्नान करण्याच्या पाण्यात चिमूटभर हळद घालून स्नान करावे. 
  • भगवान शिवांची पूजा पिवळ्या रंगाच्या आसनावर बसून करा. 
  • भगवान शंकराला विशेष स्वरुपात पिवळ्या रंगाची फुले अर्पण करा. 
  • तसेच या दिवशी पिवळ्या रंगाची फळे, पिवळ्या रंगाचे वस्त्र, गूळ आणि हरभरा डाळ यांचे दान करावे.

New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय

(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com