जाहिरात

New Year 2026 Horoscope In Marathi: गुरू कोणाचं वाढवणार गुडलक,शनीमुळे कोण होणार त्रस्त, 12 राशींचे भविष्य वाचा

New Year Horoscope 2026 For 12 Zodiac Sign: कसे असेल तुमचे येणारे नववर्ष 2026? कोणती काळजी घ्यावी लागेल? काय उपाय करावे? जाणून घ्या तज्ज्ञांनी दिलेली माहिती.

New Year 2026 Horoscope In Marathi: गुरू कोणाचं वाढवणार गुडलक,शनीमुळे कोण होणार त्रस्त, 12 राशींचे भविष्य वाचा
"New Year 2026 Horoscope In Marathi: कसे असेल तुमचे वर्ष 2026?"
Canva

New Year 2026 Horoscope In Marathi:  नवीन वर्षातील जानेवारी महिन्यातील पहिला दिवस प्रत्येकासाठीच आशेच किरण असते, नव्या पहाटेच्या नव्या प्रकाशामुळे जीवनात आनंद आणि समृद्धीचा वर्षाव होवो, अशीच सर्वजण प्रार्थना करतात. प्रत्येकालाच नवीन वर्ष मागील वर्षापेक्षा अधिक आनंद, यश आणि समाधान घेऊन यावे असे वाटते. प्रसिद्ध ज्योतिषाचार्य डॉ. आर. पी. जोशी यांच्याकडून जाणून घेऊया की वर्ष 2026 मध्ये ग्रह-नक्षत्र कोणत्या राशींसाठी सुख-सौभाग्य आणि यशाचा वर्षाव करण्याचे संकेत देत आहे, तसेच कोणत्या राशींना अधिक सावध राहण्याची आवश्यकता आहे? 12 राशींचे राशीभविष्य (Yearly Horoscope 2026) एका क्लिकवर वाचा...

1. मेष वार्षिक राशीभविष्य 2026 | Aries Horoscope 2026 | New Year 2026

Latest and Breaking News on NDTV

मेष राशीसाठी वर्ष 2026चा पहिला जानेवारी महिना शुभ ठरेल. सर्व प्रकारचे सुख आणि शांती मिळेल. कौटुंबिक आनंद देखील मिळेल आणि या महिन्यात त्यांच्या मनाला चांगली वाटणारी सर्व कामे पूर्ण करता येतील. वरिष्ठांकडून सहकार्य मिळेल आणि तुमची सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. तुमचे सध्याचे काम विस्तारेल. फेब्रुवारी महिना देखील आनंद, शांती आणि लाभ घेऊन येईल. व्यावसायिक प्रगती होईल आणि सर्व प्रलंबित कामे पूर्ण होतील. जीवनाशी संबंधित अडचणींपासून तुमची सुटका होईल.

मार्च महिना थोडा तणावपूर्ण असेल आणि मनामध्ये विविध प्रकारच्या शंका तसेच संशय निर्माण होतील. आरोग्य कमकुवत राहील, ज्यामुळे इतर कामांवरही परिणाम होईल. 26 मार्चपासून सुरू होणारी परिस्थिती संपूर्ण एप्रिलमध्ये अशीच राहील. या काळात भांडणं टाळा. कुटुंबातील सदस्यांशी वैर वाढेल. काही किरकोळ अडथळ्यांनंतर महत्त्वाची कामे यशस्वी होतील. जून महिना मध्यम स्वरुपात फलदायी ठरू शकतो. या महिन्यात डोळ्यांच्या समस्या आणि पोटाशी संबंधित वेदना होऊ शकतात. कामांमध्ये निष्काळजीपणा आणि आळस देखील वाढू शकतो.

जुलै महिन्यामध्ये कठोर परिश्रम आणि नशिबाच्या जोरावर प्रगती प्राप्त होऊ शकेल. शेअर्स किंवा इतर बचतीशी संबंधित गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 
ऑगस्ट महिन्याची सुरुवात चांगली होईल, पण महिन्याचा उत्तरार्ध अधिक प्रयत्न आणि संघर्ष करावा शकतो. सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिना थोडा आव्हानात्मक असेल. अनावश्यक वाद, कौटुंबिक समस्या आणि अनावश्यक खर्चांमुळ त्रस्त असाल. नोकरीतही असमाधानी असल्याची जाणीव होऊ शकते. या महिन्यात विश्वासू लोकही विश्वासघात करू शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत तणाव वाढू शकतो . दुखापत होण्याचा धोका आहे. उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल.

ऑक्टोबर महिन्याचा उत्तरार्ध सप्टेंबर महिन्यासारखेच परिणाम दिसतील,  पण 14 ऑक्टोबर 2026 नंतर काही प्रमाणात दिलासा मिळण्यास सुरुवात होईल. या काळात कामात यश मिळेल आणि आरोग्यही सुधारेल. वर्ष 2026चे शेवटचे महिने नोव्हेंबर आणि डिसेंबर हे मेष राशीच्या लोकांसाठी खूप अनुकूल परिस्थिती आणणारे ठरतील. 

2. वृषभ वार्षिक राशीभविष्य 2026 | Taurus Horoscope 2026 | New Year 2026

Latest and Breaking News on NDTV

वृषभ राशीसाठी वर्ष 2026 अत्यंत शुभ ठरणार आहे. दोन महिने वगळता वर्षभर तुमच्यासाठी परिस्थिती अनुकूल राहील. वर्षाचे पहिले तीन महिने जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च अनुकूल ठरू शकतात. या काळात तुमची महत्त्वाची कामे पूर्ण होतील. लांब पल्ल्याच्या प्रवासाची शक्यता आहे.  शेती, व्यवसाय किंवा नोकरी असो तुम्हाला अपेक्षित यश तसेच नफा मिळेल. तुमची कीर्ती आणि प्रतिष्ठा वाढेल. मार्च महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या संवाद कौशल्य आणि चातुर्याने मोठे काम पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल. तुम्ही तुमच्या शत्रूंवर विजय मिळवाल. एप्रिल महिन्यामध्ये वृषभ राशीच्या लोकांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवले तर कुटुंबात प्रेम आणि सुसंवाद निर्माण होईल.

मे महिन्यात तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात जुने आजार पुन्हा उद्भवू शकतात. कुटुंबातील सदस्यांशी मतभेदांमुळे मानसिक ताण येऊ शकतो किंवा संघर्ष होऊ शकतो. या काळात दुर्गा देवीची पूजा साधना करणे शुभ ठरेल. जून महिन्यामध्ये गोष्टी पुन्हा एकदा तुमच्यासाठी अनुकूल होतील. मागील महिन्यातील नकारात्मकता नाहीशी होईल आणि तुम्हाला आनंद-सौभाग्य प्राप्त होईल. तुमचे प्रभावशाली लोकांशी संबंध निर्माण होतील, ज्यामुळे नफा होईल. तुमच्या सुखसोयी वाढतील. तुम्हाला चांगली बातमी मिळेल. प्रगतीच्या नवीन संधी निर्माण होतील.

जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर हे महिने तुमच्यासाठी अत्यंत शुभ ठरतील. ऑगस्ट महिन्यामध्ये तुम्हाला सामाजिक प्रतिष्ठा राखण्यासाठी थोडासा संघर्ष करावा लागेल. या काळात कुटुंबाशी संबंधित एखादी समस्या तुम्हाला त्रास देऊ शकते. दुसरीकडे ऑक्टोबर महिना हा नवीन रणनीती विकसित करण्याचा काळ असेल. या काळात तुम्हाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही, पण तुम्ही तुमची बचत एखाद्या विशिष्ट कामावर खर्च करू शकाल. वृषभ राशीच्या लोकांसाठी नोव्हेंबर आणि डिसेंबर हे दोन महिने खूप चांगला ठरतील. प्रलंबित प्रकल्प पूर्ण होतील, ज्यामुळे तुम्हाला महत्त्वपूर्ण फायदे मिळतील. जर तुम्ही राजकीय क्षेत्रात असाल तर तुमचा दर्जा आणि तुमचे पद वाढेल.

3. मिथुन वार्षिक राशीभविष्य 2026 | Gemini Horoscope 2026 | New Year 2026

Latest and Breaking News on NDTV

मिथुन राशीसाठी वर्ष 2026मध्ये ग्रहांचे संक्रमण शुभ परिणाम देणारे ठरेल. तुम्ही शैक्षणिक प्रगती, नैतिक आचरणात रस आणि महत्त्वाची कामे कुशलतेने हाताळताना दिसाल. परिणामी तुम्हाला हवे असलेले यश मिळेल. फेब्रुवारी महिन्यामध्ये व्यावसायिक क्षेत्रात जुन्या मित्रांचा पाठिंबा मिळेल.  कुटुंबातील सदस्याकडूनही चांगली बातमी मिळेल. तणाव कमी होईल आणि मानसिक शांती मिळेल. मार्च महिन्यामध्ये अधिक शांती मिळेलआणि तुम्ही तुमचे काम अधिक चांगल्या प्रकारे कराल.

एप्रिल महिना काहीसा प्रतिकूल मानला जाईल. या काळात तुम्हाला तुमच्या विरोधकांपासून सावध राहावे लागेल. शत्रू वाढतील आणि सरकारी कामात अडथळा येऊ शकतो. या काळात तुम्हाला निरोगी दिनचर्या आणि पौष्टिक आहाराचे सेवन करावे लागेल. एप्रिल महिन्याच्या उत्तरार्धात भगवान गणेशाच्या आशीर्वादाने तुम्ही पुन्हा एकदा सर्व अडचणींवर मात कराल आणि आनंद तसेच यश मिळवाल. मे महिन्यात तुमचे नशीब आणखी चमकेल. मागील त्रास कमी होतील आणि तुम्हाला महत्त्वाच्या कामांमध्ये यश मिळेल.

जुलैमध्ये महिन्यामध्ये कठोर परिश्रम करावे लागू शकतात. यादरम्यान प्रयत्नांप्रमाणे अपेक्षित परिणाम मिळणार नाहीत, ज्यामुळे मानसिक ताण आणि शारीरिक थकवा येऊ शकतो. या काळात तुमच्या वरिष्ठांशी वाद घालणे टाळा. ऑगस्ट महिन्यात महत्त्वपूर्ण बदल घडवून येऊ शकतात. या काळात तुम्हाला यश मिळेल आणि लोक तुमच्या कामाचे कौतुक करतील. 

(नक्की वाचा: New Year 2026 Good Luck Tips: वर्ष 2026मध्ये आयुष्यात सुखसमृद्धीचा वर्षाव होईल, अडचणी होतील दूर; करा हे 9 उपाय)

सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिने चांगले ठरतील. आरोग्य सामान्य राहील आणि कौटुंबिक वाद दूर होतील. तुम्हाला मित्र आणि कुटुंबाकडून विशेष सहकार्य मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यामध्ये तुम्हाला पुन्हा एकदा काही अडचणींना सामोरे जावे लागू शकते. या काळात तुम्हाला तुमच्या जोडीदाराशी किंवा मुलांशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागू शकते. या काळात तुम्हाला स्वतःच्या आरोग्याची देखील काळजी घ्यावी लागेल.

4. कर्क वार्षिक राशीभविष्य | 2026 Cancer Horoscope 2026 | New Year 2026

Latest and Breaking News on NDTV

कर्क राशीसाठी वर्ष 2026 खूश मोठे यश मिळवून देणार ठरणार आहे. मे आणि जून हे दोन महिने वगळता तुम्हाला वर्षभर आनंद आणि सौभाग्य प्राप्त होणार आहे. वर्षाची सुरुवात एखाद्या नवीन उपक्रमाच्या शुभारंभाने होईल. गेल्या वर्षभरातील समस्या दूर होतील. फेब्रुवारी महिन्या प्रतिष्ठित व्यक्तींशी तुमचे संबंध वाढतील. अनुभवी व्यक्तींकडून सल्ला फायदेशीर ठरेल. तुमचे नशीब चमकणार आहे. तुम्हाला धार्मिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यवसायात लक्षणीय नफा आणि प्रगती दिसून येईल. एप्रिल महिना हा एक सामान्य महिना असेल पण या महिन्यात तुम्हाला एक मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो.

मे आणि जून महिना काहीसे प्रतिकूल असतील. या काळात तुम्ही चिंतेत राहू शकता. तुमच्या करिअर आणि घर इत्या गोष्टींमध्ये बदल होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या अभ्यासात व्यत्यय येऊ शकतो. व्यवसायात नफा मिळवण्यासाठी तुम्हाला कठोर परिश्रम करावे लागतील. या काळात पैसे विचार करून खर्च करा, अन्यथा तुम्हाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागू शकते. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात आनंद देणारे ठरतील. या काळात तुम्हाला आर्थिक लाभ आणि मित्रपरिवाराचा पाठिंबा मिळेल. तुम्ही कुटुंबातील सदस्यांसोबत सुखद वेळ घालवाल. या महिन्यात तुमच्या इच्छित गोष्टी साध्य होऊ शकतात. बौद्धिक आणि शैक्षणिक विकास होईल. तुम्हाला व्यवसायात नफा होईल. तुमचे वैवाहिक जीवन आनंदी राहील.

(नक्की वाचा: Negative Energy Removal Remedies: घरातील नकारात्मक ऊर्जेमुळे नैराश्य येते? 9 उपाय करा पहिल्याच दिवशी दिसेल बदल)

सप्टेंबर महिन्यामध्ये अचानक एक मोठी समस्या उद्भवेल पण तुम्ही तुमच्या विवेकबुद्धीने ती सोडवू शकाल. या काळात तुम्ही गोष्टी सोडवण्याचा प्रयत्न कराल पण यश हळूहळू मिळेल. ऑक्टोबर महिन्यात कर्क राशीच्या लोकांना नवीन काम आणि उपक्रमांसाठी उत्सुकता असेल. या काळात प्रामाणिकपणा आणि समर्पणाने काम केल्याने इच्छित परिणाम मिळतील. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिना उत्तम कामगिरीचा असेल. हे दोन महिने तुम्हाला प्रचंड आनंद आणि यश देतील. व्यवसाय आणि सरकारी नोकरीत प्रगती करू शकाल. मेहनतीचे आणि प्रयत्नांचे कौतुक केले जाईल. डिसेंबर महिन्यात कामात खूप व्यस्त असाल, पण तुम्ही यश मिळवत राहाल आणि यशाचे शिखर गाठत राहाल.

5. सिंह वार्षिक राशीभविष्य 2026 | Leo Horoscope 2026 | New Year 2026

Latest and Breaking News on NDTV

सिंह राशीसाठी वर्ष 2026 हे मिश्र फळ देणारे ठरेल. मात्र शनीची शांती केल्यास, सूर्य ग्रह बलवान करण्यासाठी उपाय करणे आणि हनुमानाची उपासना केल्यास नकारात्मक परिणामांपासून संरक्षण मिळेल तसेच शुभ फळांची प्राप्ती होईल. जानेवारी–फेब्रुवारी महिना चांगला असेल. या काळात पदोन्नतीच्या शक्यता निर्माण होतील. सहकाऱ्यांचे सहकार्य मिळेल; पण  कार्य व्यवहारात सतर्क राहणे आवश्यक आहे आणि सहकाऱ्यांकडून फार अपेक्षा ठेवू नये. परिस्थिती अनुकूल राहतील. व्यवसायात वाढ होण्याचे योग आहेत. फेब्रुवारी महिन्यात थोडाफार पैसा कमी येऊ शकतो.  कुटुंबात थोडी अशांतता जाणवू शकते. या काळात स्थान परिवर्तनाचे योगही संभवतात.

मार्च महिन्यात आपण भवितव्याबाबत चिंताग्रस्त राहाल. या काळात सर्व कामे अत्यंत सावधगिरीने करावी लागतील. एप्रिल, मे आणि जून महिने थोडे प्रतिकूल फळ देणारे ठरतील. या काळात खोटे आरोप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे विरोधकांपासून सावध राहावे तसेच आर्थिक गुंतवणूक आणि खर्च विचारपूर्वक करा. पण मे महिना सुरू होताच परिस्थिती हळूहळू पुन्हा सुधारू लागेल.

जुलै महिना साधारण स्वरूपाचा राहील. या काळात व्यवसायात ना विशेष नफा ना तोटा अशी स्थिती राहील. आरोग्याच्या दृष्टीने काळजी घेणे आवश्यक असून रागावर नियंत्रण ठेवावे. सूर्य उपासना आणि ध्यानधारणा केल्यास ग्रहगोचर अनुकूल ठरू शकते. ऑगस्ट महिन्यात सट्टा, शेअर बाजार यासारख्या जोखमीच्या व्यवहारांपासून दूर राहणे हितावह ठरेल.

ऑक्टोबर महिन्यात सामाजिक आणि राजकीय प्रभावामुळे सिंह राशीची मंडळी आपली कामे यशस्वीरीत्या पूर्ण करू शकतील. यशाच्या दिशेने वाटचाल होईल आणि आर्थिक अडचणींपासूनही मुक्तता मिळेल. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात कामे तपासून-पडताळून करावी लागतील.  या काळात सर्व कार्ये निष्ठा आणि प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करावा.

वर्षाच्या शेवटच्या महिन्यात म्हणजेच डिसेंबरमध्ये विशेष सावधगिरी बाळगावी. जोखमीच्या गुंतवणुकीपासून दूर राहावे आणि मोठे निर्णय अत्यंत विचारपूर्वक घ्या. ज्योतिषशास्त्रातील एक सर्वमान्य नियम असा आहे की शनीच्या ढैय्यामध्ये कोणतेही धोरणात्मक किंवा नीतिगत मोठे निर्णय घेऊ नये; सध्या जे सुरू आहे त्यालाच अधिक चांगल्या पद्धतीने पुढे नेऊन त्यामध्ये वाढ करण्यावर भर द्यावा.

6. कन्या वार्षिक राशीभविष्य 2026 | Virgo Horoscope 2026 | New Year 2026

Latest and Breaking News on NDTV

कन्या राशीसाठी वर्ष २०२६ हे संमिश्र परिणाम देणारे ठरेल. वर्षाच्या सुरुवातीस म्हणजे जानेवारी–फेब्रुवारी या काळात शुभ कार्ये यशस्वीरीत्या पूर्ण करू शकाल. परिश्रम आणि संघर्ष वाढतील तसेच दैनंदिन कामांमध्ये थोडेफार अडथळे येतील; पण शेवटी यश निश्चित मिळेल. आर्थिक लाभाचे पूर्ण योग आहेत. श्रेष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन लाभेल. जीवनातील भौतिक सुख-सुविधांमध्ये वाढ करू शकाल. मार्च महिन्यात आत्मविश्वास प्राप्त करतील. या काळात परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यात यश येईल. पूर्वनियोजित कामे पूर्ण करण्यात यश मिळेल. आर्थिक स्थिती भक्कम करण्यासाठी आवश्यक संसाधनेही उपलब्ध होतील.

एप्रिल, मे आणि जून या तीन महिने अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. या काळात जबाबदाऱ्या वाढतील. जर आपली शेअर बाजारात आवड असेल किंवा त्याच्याशी संबंधित कार्य करत असाल तर या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक संबंधांचा विस्तार होईल. जून महिन्यात एखाद्या मांगलिक कार्याची रूपरेषा तयार होईल, ज्यामुळे आपल्याला विशेष आनंद मिळेल. मात्र या काळात आपल्या दयाळू आणि नम्र स्वभावामुळे अति चतुर व्यक्तींच्या फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता आहे, त्यामुळे सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

जुलै महिन्यापासून हळूहळू प्रगतीच्या मार्गावर वाटचाल करू लागतील. योग्य वर्तन आणि व्यवहारामुळे व्यावसायिक लाभ मिळेल. पती किंवा जीवनसाथीच्या आरोग्याशी संबंधित अडथळे दूर होतील. या काळात सूर्याची उपासना आणि बुध ग्रहाची आराधना केल्यास रखडलेली कामे पूर्ण करता येतील. ऑगस्ट आणि सप्टेंबरमहिने कन्या राशीसाठी अनुकूल ठरतील. या काळात आपली जवळच्या, प्रेमळ व्यक्तींशी भेट होईल. व्यापार आणि व्यवसायात चढ-उतार जाणवतील, पण अखेरीस यश मिळेल.

ऑक्टोबर महिन्यात नैतिक आणि सद्कार्यांबद्दलची आपली रुची वाढेल. शत्रूंवर विजय मिळेल. सुख आणि आनंदाची अनुभूती होईल. नोव्हेंबर महिना थोडी मानसिक अस्वस्थता देणारा ठरू शकतो; तरीही या काळात आपल्या कर्माचे पूर्ण फळ मिळेल. या काळात प्रवास अधिक करावे लागतील, मात्र त्यातून लाभच होईल. डिसेंबर महिन्यात शेती, व्यापार किंवा नोकरी या क्षेत्रांत लक्षणीय सुधारणा साध्य करू शकाल. या महिन्यात पद, प्रतिष्ठा आणि मान-सन्मानात वाढ होईल.

7. तूळ वार्षिक राशीभविष्य 2026 | Libra Horoscope 2026 | New Year 2026

Latest and Breaking News on NDTV

तूळ राशीसाठी वर्ष 2026 प्रमुख ग्रहगोचर सुमारे 75 टक्के अनुकूल तर केवळ 25टक्के प्रतिकूल राहतील. त्यामुळे एकूणच हे वर्ष ग्रहयोगांच्या दृष्टीने चांगले ठरेल. मात्र या वर्षात परिश्रम आणि संघर्षानंतरच अपेक्षित यश प्राप्त होईल.  शनि आणि राहू हे ग्रह 2026 मध्ये सहाव्या भावात गोचर करतील, ज्यामुळे कर्ज, रोग आणि शत्रू यांचा नाश होईल तसेच शत्रुहन्ता योगही निर्माण होईल.

उच्चस्थ गुरु ग्रह 2026 मध्ये अत्यंत शुभ फल देणारे ठरतील. यामुळे आध्यात्मिक कार्यामध्ये वाढ होईल तसेच तीर्थयात्रा किंवा इतर आध्यात्मिक लाभ मिळण्याची शक्यता आहे. आई-वडील आणि गुरूजनांची सेवा करण्याची प्रेरणा मनात निर्माण होईल आणि त्याचा लाभही मिळेल. नैतिक कार्यामधून धनप्राप्तीत वाढ होईल तसेच अभ्यास-अध्यापन आणि आध्यात्मिक उन्नतीकडे मन अधिक झुकलेले राहील.

जीवनातील प्रतिकूल बाजूचा विचार केला तर 2026च्या पूर्वार्धात केतू बाराव्या भावात असेल, जो खर्च वाढवणारा मानला जातो. त्यामुळे मानसिक शांती आणि आर्थिक अडचणी जाणवू शकतात. यासाठी काही सोपे उपाय केल्यास लाभ मिळू शकतो. केतूच्या गोचरजन्य प्रतिकूलतेपासून मुक्ती मिळवण्यासाठी कुत्र्याला भाकरी खाऊ घालणे हा उपाय उपयुक्त ठरेल. तसेच दुर्गा देवीची उपासना केल्यास विशेष लाभ होईल.

वर्ष 2026च्या उत्तरार्धाबाबत बोलायचे झाले तर या काळात शनी आणि राहू राशीपरिवर्तन करून वक्री गतीने पुन्हा कुंभ राशीत प्रवेश करतील, तर केतू सिंह राशीतून कर्क राशीत येईल. या काळात गुरू ग्रहासोबत शनी-राहू युती होईल तसेच गुरू-केतू युतीही निर्माण होईल. ही स्थिती तूळ राशीसाठी तुलनात्मक दृष्ट्या अनुकूल ठरेल. एकूणच वर्ष 2026 चा उत्तरार्ध तूळ राशीसाठी अधिक लाभदायक फळे देणारा ठरेल.

8. वृश्चिक वार्षिक राशीभविष्य 2026 | Scorpio Horoscope 2026 | New Year 2026

Latest and Breaking News on NDTV

वृश्चिक राशीसाठी 2026ची सुरुवातीचे सहा महिने संमिश्र फळ देणारे ठरतील. म्हणजेच या सहा महिन्यांत तुम्हाला अधिक संघर्ष आणि परिश्रम करावे लागू शकतात. जरी तुमची कामे पूर्ण होतील, तरी मेहनतीच्या तुलनेत अपेक्षेपेक्षा कमी परिणाम मिळू शकतात. शनी आणि राहू यांच्या प्रभावामुळे सुख-सुविधांमध्ये काहीशी घट जाणवेल. या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना निरर्थक प्रवासही करावा लागू शकतो. अशा विविध अडचणींचा सामना करताना हनुमानजींची आराधना करून या प्रतिकूल काळाला अनुकूल बनवण्याचा प्रयत्न करावा.

जून 2026 नंतर परिस्थिती अत्यंत अनुकूल होणार आहे. 2026 मध्ये होणाऱ्या चार महत्त्वाच्या ग्रहगोचरांचा विचार करता, गुरू ग्रह पहिल्या सहा महिन्यांमध्ये नवम भावात आणि नंतरच्या सहा महिन्यांत दशम भावात प्रवेश करेल. गुरूचे हे दोन्ही गोचर शुभ फळ देणारे ठरतील. एकीकडे भाग्यवृद्धी होईल, तर दुसरीकडे आजीविका व्यवसाय आणि नोकरीमध्ये अनपेक्षित प्रगतीचे योग निर्माण होतील.

गृह परिषदेत न्यायाधीश मानला जाणारा शनी ग्रहाचा गोचरही चांगले फल देणारा ठरेल. वर्ष 2026 मध्ये शनी रजत पदातून गोचर करत असल्यामुळे बहुतेक प्रयत्न यशस्वी होतील. उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील आणि ओळखीच्या क्षेत्रातील व्यक्तींकडून सहकार्य मिळेल. परिणामी तुमच्या उपजीविकेच्या साधनांत लक्षणीय वाढ होईल. त्याच प्रमाणे केतू ग्रहही दशम भावात असल्यामुळे अतिशय शुभ फल देईल. स्वतःच्या विवेकबुद्धी, कौशल्य आणि चातुर्याच्या बळावर तुम्ही सर्व कामे यशस्वीरीत्या पूर्ण करू शकाल आणि जीवनातील नकारात्मकता कमी होऊन सकारात्मकतेकडे वाटचाल होईल.

मानसिक तणावापासून दूर राहण्यासाठी हनुमानजींची पूजा करावी. विशेष म्हणजे 2026 च्या उत्तरार्धात ग्रह वक्री होऊन राशीपरिवर्तन करतील. ज्या व्यक्तींच्या जन्मकुंडलीत ग्रह वक्री अवस्थेत होते, त्यांना तुलनेने अधिक प्रतिकूल परिस्थितीचा सामना करावा लागू शकतो. मात्र मंगळवारी हनुमान चालीसाचे पठण करणे, दररोज हनुमान चालीसाचे वाचन करणे आणि नियमितपणे हनुमानजींचे दर्शन घेतल्यास नक्कीच लाभ होईल.

9. धनु वार्षिक राशीभविष्य 2026 | Sagittarius Horoscope 2026 | New Year 2026
Latest and Breaking News on NDTV

वर्ष 2026मध्ये गुरू, शनी, राहू आणि केतू या चार प्रमुख ग्रहांचा तसेच ग्रहांच्या वक्री स्थितीचा विचार केला तर या नव्या वर्षात धनु राशीच्या मंडळींना कठीण परीक्षेला सामोरे जावे लागू शकते. सध्या सिंह आणि धनु या दोन्ही राशींवर शनीची ढैय्या सुरू आहे. शनी आणि राहू प्रतिकूल असतानाच गुरू ग्रहही प्रतिकूल ठरतो, कारण गोचरात तो धनु राशीसाठी अष्टम भावात जातो. याचबरोबर शनी आणि राहू चतुर्थ भावात येतात. चौथा आणि आठवा भाव असल्यामुळे हे ग्रह आपली पूर्ण प्रतिकूलता दर्शवतात तसेच व्यक्तींना विविध प्रकारचे कष्ट देतात. या काळात केवळ केतूचा गोचर धनु राशीसाठी अनुकूल ठरतो. त्यामुळे आध्यात्मिक व्यक्तींच्या सहवासातून आणि त्यांच्या मार्गदर्शनामुळे धनु राशीच्या जातकांची कामे सिद्ध होतील.

ही प्रतिकूलता वर्ष 2026च्या पहिल्या सहा महिन्यांत अधिक जाणवेल. त्यानंतरचे सहा महिने म्हणजे वर्षाचा उत्तरार्ध तुलनेने अधिक आरामदायक राहील. गुरू आणि केतू यांच्या अनुकूल परिणामामुळे पहिल्या सहा महिन्यांत झालेल्या सर्व प्रकारच्या नुकसानीची भरपाई व्यक्तीच्या साहस, पराक्रमात झालेली वाढ तसेच विविध संपर्क आणि प्रयत्नांमुळे होऊ शकेल. वाईट काळ चांगल्या काळात रूपांतरित करता येईल. हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की धनु राशीचा स्वामी गुरू आहे आणि तोही वर्षाच्या उत्तरार्धात अनुकूल स्थितीत येईल.

बृहस्पतीदेव अनुकूल झाल्यामुळे सर्व प्रकारची कामे सहजपणे पूर्ण होऊ लागतील. जरी पहिल्या सहा महिन्यांत गुरू धनु राशीसाठी अष्टम स्थानावर असला तरी तो केंद्रात असून उच्च स्थितीत आहे. त्यामुळे प्राचीन ज्योतिषातील हा नियम लक्षात घ्यावा लागतो की ज्या कुंडलीत केंद्रस्थानी उच्च गुरू असतो, तेथे इतर सर्व ग्रह एकत्र येऊनही फारसे नुकसान करू शकत नाहीत. जसे हत्तींचा कळप एकत्र आला तरी तो सिंहाचे काहीही बिघडवू शकत नाही.

आध्यात्मिक आणि वैदिक कार्यांमध्ये सहभागी राहावे, शक्य तितके आपले आचरण पवित्र ठेवावे. तसेच दररोज भगवान विष्णू यांची पूजा करावी. श्री विष्णु सहस्रनामाचे पठण केल्यास उत्तम फळांची प्राप्ती होईल.

10. मकर वार्षिक राशीभविष्य 202 | Capricorn Horoscope 2026 | New Year 2026
Latest and Breaking News on NDTV

मकर राशीचा स्वामी शनी आहे, तो मकर राशीच्या लोकांसाठी अतिशय लाभदायक, म्हणजेच द्वितीय भावात स्थित असून विद्या, बुद्धी आणि वाणी यांच्या माध्यमातून सर्व प्रकारची कामे यशस्वीरीत्या पूर्ण करून देणारा आहे. वर्षाच्या पहिल्या सहा महिन्यांमध्ये शनी तृतीय भावात राहील. तृतीय भावात असल्यामुळे शौर्य, पराक्रम आणि साहसात वाढ होईल. आपल्या शत्रूंवर प्रभावीपणे विजय मिळवू शकतील. यासोबतच गुरू ग्रहही सप्तम भावात असल्यामुळे केंद्रस्थ गुरूचे शुभ फल देईल आणि त्यांचा पराक्रम आणि यश सदैव दृश्यमान राहील. त्यांनी हाती घेतलेली सर्व कामे पूर्णत्वाला जातील. एवढेच नव्हे तर सप्तम भावातील गुरूसोबत नवव्या भावातील केतू मोक्षदायक ठरेल आणि अत्यंत उत्तम फळे देणारा सिद्ध होईल.

अशा परिस्थितीत या ग्रहांमुळे आपल्याला कोणतीही प्रतिकूलता येईल, अशी भीती मनात ठेवण्याचे कारण नाही. वर्ष 2026 हे पूर्णतः शुभ फल देणारे ठरेल. मकर राशीत जन्मलेल्या व्यक्तींना वर्ष 2026मध्ये जमिनीखालून मिळणाऱ्या पदार्थांच्या व्यापारातूनही लाभ होईल. सर्व प्रकारच्या कार्यांमध्ये स्थिरता येईल. वारंवार काम बदलण्याची प्रवृत्ती ठेवू नये, कारण एकदा विचारपूर्वक आणि गांभीर्याने घेतलेला निर्णय त्यांच्यासाठी वरदान ठरेल. पण निर्णय सतत बदलल्यास नुकसान होऊ शकते. त्यामुळे मकर राशीच्या लोकांनी आपल्या पूर्ण समजून आणि क्षमतेच्या आधारावर एखादा उपजीविकेचा मार्ग निवडला तर तो शेवटपर्यंत यशस्वीरीत्या पूर्ण करावा.

जर एखाद्या ग्रहाची महादशा किंवा अंतर्दशा अत्यंत क्लेशकारक योग निर्माण करत असेल तर विशिष्ट उपायांची आवश्यकता भासते. त्यामध्ये विशेषतः शनिवारचे व्रत, मंत्र आणि स्तोत्रपठण तसेच शनिवारी पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करणे आणि संध्याकाळी तेलाचा दिवा लावणे लाभदायक ठरेल. यासोबतच हनुमानजींची पूजा करणेही विशेष फलदायी ठरेल.

11. कुंभ वार्षिक राशीभविष्य 2026 | Aquarius Horoscope 2026 | New Year 2026
Latest and Breaking News on NDTV

वर्ष 2026ची सुरुवात होताच कुंभ राशीसाठी यशाचा काळ सुरू होईल. जरी कुंभ राशीसाठी 2026 मध्ये शनीची साडेसाती चालू असेल तरी हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे की हा साडेसातीचा अंतिम टप्पा असेल. म्हणजेच अडीच-अडीच वर्षांच्या तीन टप्प्यांपैकी हा शेवटचा कालखंड असून तो शुभ फल देणारा ठरेल. यामध्ये कुंभ राशीच्या लोकांना पूर्वी झालेल्या नुकसानीची भरपाई परिश्रम, संघर्ष आणि अनुकूल ग्रहयोगांचा लाभ घेऊन करता येईल.

नवे कार्य हाती घेणे लाभदायक ठरेल. तसेच जे लोक व्यवसाय करत आहेत, त्यामध्ये वाढ होईल. विद्यार्थ्यांना शैक्षणिक क्षेत्रात प्रगती मिळेल. जे लोक नोकरीच्या माध्यमातून उपजीविका करतायेत, त्यांनाही वर्ष 2026मध्ये उन्नतीच्या संधी प्राप्त होतील. नव्या आव्हानांचा सामना करावा लागेल, पण ती आव्हाने ते यशस्वीरीत्या पूर्ण करू शकतील. यामुळे त्यांना यश, मान-सन्मान आणि प्रतिष्ठाही मिळेल.

एक विशेष बाब म्हणजे त्यांच्या राशीचा स्वामी स्वतः शनी आहे आणि तोच शनीच्या साडेसातीचा मुख्य कारक मानला जातो. त्यामुळे शनी जेव्हा अडचणी निर्माण करतो, तेव्हाही त्यामागे कुंभ राशीचे हितच दडलेले असते. जसे आई-वडील आपल्या मुलाला किंवा गुरू आपल्या शिष्याला सुधारण्यासाठी कधी दंड देतात, तसेच शनी देखील सुधारण्यासाठीच कष्ट देतो. शिवाय तो दंडाची मर्यादा राखतो, जेणेकरून कोणतीही कायमस्वरूपी हानी होऊ नये. एकूणच शनीची साडेसाती असतानाही नववर्ष आपली हरवलेली यश, मान, प्रतिष्ठा तसेच गमावलेले धन पुन्हा प्राप्त करू शकतील आणि लोकप्रियताही मिळवू शकतील.

दुर्गादेवीची उपासना तसेच शनी ग्रहाची शांती करणे शुभ ठरेल. शनिवारी सकाळी पिंपळाच्या झाडावर पाणी अर्पण करावे आणि संध्याकाळी मोहरीच्या तेलाचा दिवा लावावा. तसेच दुर्गा सप्तशतीतील दुर्गादेवींच्या 108 नावांचे पठण किंवा दुर्गादेवींची 32 नावे तसेच सिद्ध कुंजिका स्तोत्राचे पठण केल्यासही उत्तम लाभ होईल.

12. मीन वार्षिक राशीभविष्य 2026 | Pisces Horoscope 2026 | New Year 2026
Latest and Breaking News on NDTV

ज्योतिषशास्त्रात शनी आणि राहू यांची युती म्हणजेच दोन्ही ग्रहांचा एकाच भावात असणे, याला पितृदोष अथवा पिशाच योग असे संबोधले जाते. हे विशेष लक्षात घेण्यासारखे आहे की वर्ष 206च्या पहिल्या सहा महिन्यांत मीन राशीतच शनी–राहू यांची ही युती तयार होईल, म्हणजेच पिशाच योग निर्माण होईल. याचा काही प्रमाणात फटका मीन राशीच्या लोकांना सहन करावा लागेल, कारण या योगाचे परिणाम प्रामुख्याने नकारात्मकच असतात. विशेष बाब म्हणजे या युतीवर कोणत्याही शुभ ग्रहाची दृष्टी नसल्यामुळे मीन राशीच्या लोकांनी निर्णय घेताना विशेष सावधगिरी बाळगावी. वाहन चालवताना किंवा प्रवास करताना देखील काळजी घेणे आवश्यक ठरेल.

बाराव्या भावातील शनी–राहू अनावश्यक खर्च वाढवतात. याचा परिणाम असा होतो की उत्पन्न कमी आणि खर्च अधिक झाल्यामुळे आर्थिक स्थिती बिघडू लागते. परिणामी मानसिक तणाव आणि कौटुंबिक क्लेश निर्माण होतात. कधी कधी यामुळे काही अशा हानी देखील होतात ज्या कायमस्वरूपी ठरू शकतात. उदाहरणार्थ मीन राशीचे जातक आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांना चांगल्या संस्थेत प्रवेश द्यायचा विचार करत असतील, पण सध्याच्या आर्थिक अडचणींमुळे ते शक्य न झाल्यास ही गोष्ट पुढे कायमस्वरूपी परिणाम घडवू शकते. त्यामुळे सल्ला असा आहे की जितका खर्च पुढे भरून काढता येईल, तितकाच करावा. मीन राशीच्या जातकांनी अतिशय जास्त कर्ज घेणे टाळावे. यासोबतच वर्ष 2026च्या पूर्वार्धात मीन राशीत शनी–राहू आणि सप्तम भावात केतू असतील.

मीन राशीच्या लोकांनी आरोग्याच्या दृष्टीनेही विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. कोणत्याही प्रकारच्या शारीरिक विकाराची संकेत दिसू लागल्यास वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. अशा वेळी प्रार्थना आणि औषध या दोन्हींचा आधार घेतला पाहिजे. वर्ष 2026च्या उत्तरार्धात शनी आणि राहू वक्री होऊन कुंभ राशीत जातील, म्हणजेच आपल्या मागील राशीत प्रवेश करतील. तरीही ते मीन राशीसाठी बाराव्याच भावात राहतील आणि त्यामुळे प्रतिकूल परिणाम देत राहतील. मात्र त्या काळात एक अनुकूल बाब अशी असेल की कर्क राशीतून गुरू ग्रहही वक्री होऊन सिंह राशीत प्रवेश करेल, ज्यामुळे काही प्रमाणात शुभ परिणाम मिळतील. मीन राशीच्या जातकांची साडेसातीतील मधली ढैय्या 2 जून 2027पर्यंत चालू राहील. त्यानंतर येणारी अंतिम ढैय्या अत्यंत शुभ फल देणारी ठरेल. कोणत्याही संकटापासून बचाव करण्यासाठी हनुमानजींची उपासना नक्की करावी तसेच अप्रत्यक्षपणे शनी ग्रहाची शांतीही करून घ्यावी.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com