New Year 2026 Good Luck Remedies: वर्ष 2025ला अलविदा करून आपण वर्ष 2026चं स्वागत करणार आहोत. येणारे नवीन वर्ष सुख, समृद्धी आणि भराभराटीचे ठरो; असे प्रत्येकालाच वाटतं. स्वप्नं पूर्ण व्हावीत, अशी तुमचीही इच्छा आहे का? तर खालील सांगितलेले नऊ उपाय करण्याचा प्रयत्न करा.
सुख-समृद्धी-भरभराटीसाठी नववर्षाचे 9 संकल्प
1. पहिला उपाय - नवीन वर्षाचा पहिला आणि सर्वात महत्त्वाचा उपाय म्हणजे रोज सूर्योदयापूर्वी झोपेतून उठण्यास सुरुवात करावी. जेव्हा तुम्ही पहाटे उठून स्नान करुन शरीर आणि मन शुद्ध कराल, त्यावेळेस ध्येय निश्चित करुन त्यावर काम करण्यासाठी अधिक संधी मिळतील.
2. दुसरा उपाय - सनातन परंपरेमध्ये सूर्य देवतेला सौभाग्य आणि आरोग्याची देवता मानले जाते, म्हणून रोज उगवत्या सूर्याची पूजा आणि दर्शन करावे. हिंदू मान्यतेनुसार सूर्य देवाला रोज अर्घ्य अर्पण केल्याने व्यक्तीचे तेज, आत्मविश्वास आणि सुख-समृद्धीमध्ये भरभराट होण्यास मदत मिळते.
3. तिसरा उपाय - सनातन परंपरेत कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना श्री गणेशाचे पूजन केले जाते. कार्य पूर्ण होण्यासह अडथळे टाळण्यासाठी गणपती बाप्पाची नियमित पूजा करावी. हिंदू मान्यतेनुसार, "श्री गणेशाय नम:" या मंत्राचा जप केल्यास सर्व प्रकारचे दोष आणि अडथळे दूर होण्यास मदत मिळेल.
4. चौथा उपाय - हिंदू मान्यतेनुसार जेथे स्वच्छता असते, तेथे देव आणि धनाची देवी लक्ष्मीमातेचा निवास असतो; असे म्हणतात. तुमचे घर धनधान्याने भरलेले असावे, अशी तुमची इच्छा असेल तर घर नियमित स्वरुपात स्वच्छ ठेवावे. सकाळच्या वेळेस घराच्या मुख्य दरवाजावर हळदीचे पाणी शिंपडावे.
5. पाचवा उपाय - जीवनात कधीही कर्ज किंवा आजारांचा सामना करावा लागू नये, अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण जर तुम्ही एखाद्या आजाराने दीर्घकाळापासून त्रासलेले असाल तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी भगवान धन्वंतरी यांच्या 'ॐ नमो भगवते धन्वंतराय विष्णुरूपाय नमो नमः' या मंत्राचा जप करावा. निरोग शरीर हे सर्वात मोठे सुख मानले जाते. म्हणूनच वर्षभर शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यासाठी योग आणि ध्यान करा.
(नक्की वाचा: Astrology Predictions For 2026: शनी-नेपच्यून युती 3 राशींसाठी ठरणार वाईट, 2026 वर्ष कोणत्या राशींसाठी असेल लाभदायी?)
6. सहावा उपाय - तुमच्या डोक्यावर कर्जाचा डोंगर असेल तर त्यापासून मुक्तता मिळवण्यासाठी प्रत्येक मंगळवारी कर्जाजे हप्ते फेडावे आणि मंगळवारी कर्ज घेणे टाळले पाहिजे. हिंदू मान्यतेनुसार, कर्जातून लवकर मुक्त होण्यासाठी ऋणमोचन मंगल स्तोत्राचे पठण करावे.
7. सातवा उपाय - हिंदू मान्यतेनुसार घरातील नकारात्मक उर्जा दूर करण्यासाठी आणि सकारात्मक उर्जा टिकवून ठेवण्यासाठी प्रत्येक अमावस्या तसेच पौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये हवन करण्याचा प्रयत्न करावा.
8. आठवा उपाय - नवीन वर्षात आयुष्य केवळ सुख-आनंदाने व्यापलेले असावे, अशी इच्छा असेल तर प्रत्येक कामाचे नियोजन करून ते शुभ वेळेस पार पाडण्याचा प्रयत्न करावा. यासाठी तुम्ही पंचांग आणि शुभचिंतकांची मदत घेऊ शकता.
9. नववा उपाय - नवीन वर्षासाठीचा सर्वात मोठा मंत्र म्हणजे गुरू आणि आईवडिलांचा आशीर्वाद मिळत नाही तोवर तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. त्यामुळे नवीन वर्षात त्यांची सेवा आदरपूर्वक करत त्यांना सुखी तसेच समाधानी ठेवण्यासाठी कायम प्रयत्न करत राहा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
