जाहिरात

Man Loses Vision Mid-Workout: बापरे! वर्कआऊट करता करता डोळा गेला... जीममध्ये 'ही' चूक करु नका

Important precautions In Gym: डेडलिफ्ट दरम्यान जड वजन उचलण्याच्या नादात या तरुणाच्या डोळ्यातील रक्तवाहिनी फुटली आणि त्याला एका डोळ्याने दिसणे बंद झाले.

Man Loses Vision Mid-Workout: बापरे! वर्कआऊट करता करता डोळा गेला... जीममध्ये 'ही' चूक करु नका

 27-Year-Old Loses Vision Mid-Workout:  तुम्हीही दररोज जीममध्ये जात असाल तर तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी. दिल्लीतील एका २७ वर्षीय तरुणाला जिममध्ये वर्कआउट करणे महागात पडले आहे. रोजप्रमाणे व्यायाम करत असताना, डेडलिफ्ट दरम्यान जड वजन उचलण्याच्या नादात या तरुणाच्या डोळ्यातील रक्तवाहिनी फुटली आणि त्याला एका डोळ्याने दिसणे बंद झाले, या प्रकाराने सर्वत्र खळबळ उडाली आहे.

या तरुणाने डेडलिफ्ट करताना या तरुणाने खूप जास्त वजन उचलण्याचा प्रयत्न केला. वजन उचलताना त्याने आपला श्वास रोखून धरला  आणि पूर्ण ताकद लावली. काही सेकंदातच त्याला उजव्या डोळ्याने अंधुक दिसू लागले. विशेष म्हणजे यात कोणताही त्रास किंवा वेदना होत नव्हत्या, पण दृष्टी वेगाने कमी होत गेली. तपासणीअंती समोर आले की, त्याला उजव्या डोळ्याने फक्त हाताची बोटे मोजता येत होती.

​डॉक्टरांना तपासणीत काय आढळले? | Gym Deadlifting Vision Loss

​AIIMS दिल्लीतून प्रशिक्षित नेत्रतज्ज्ञ डॉ. आशिष मार्कन यांनी तपासणी केल्यानंतर सांगितले की, तरुणाच्या डोळ्यात Pre-retinal (Subhyaloid) Hemorrhage झाला होता. हा रक्तस्राव रेटिनातील 'मॅक्युला' (Macula) भागावर झाला होता, जो स्पष्ट पाहण्यासाठी जबाबदार असतो. सुदैवाने, रेटिना फाटला नव्हता किंवा निखळला नव्हता. या स्थितीला डॉक्टरांनी 'वल्साल्वा रेटिनोपॅथी' (Valsalva Retinopathy) असे निदान केले.

Expensive Leaves: भारतात पिकणाऱ्या 'या' पानांना सोन्यासारखी किंमत! लाखोंचा मिळतोय भाव; असं काय आहे खास?

​काय आहे वल्साल्वा रेटिनोपॅथी? | What is Valsalva Retinopathy?

​जेव्हा शरीरातील अंतर्गत दाब अचानक वाढतो, तेव्हा डोळ्यातील नाजूक रक्तवाहिन्या फुटतात, यालाच 'वल्साल्वा रेटिनोपॅथी' म्हणतात. जो प्रामुख्याने
​जड वजन उचलताना श्वास रोखून धरणे,  ​अति ताकद लावणे. ​जोरात खोकणे, उलट्या होणे किंवा शौचास बसताना जास्त जोर लावणे या कारणांमुळे होतो. 

जिममध्ये वजन उचलणे डोळ्यांसाठी धोकादायक का?|  Deadlifting eye damage

​डेडलिफ्ट, स्क्वॅट्स आणि बेंच प्रेस सारख्या व्यायामांमध्ये शरीराचा अंतर्गत दाब वेगाने वाढतो. जर श्वास रोखून वजन उचलले तर रक्तदाब (Blood Pressure) अचानक वाढतो. हा दाब डोळ्यांपर्यंत पोहोचतो आणि रेटिनातील अत्यंत पातळ नसांना इजा पोहोचवतो, ज्यामुळे डोळ्यात रक्तस्राव होऊन तात्पुरते अंधत्व येऊ शकते. 


​वर्कआउटनंतर खालील लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांशी संपर्क साधा| Heavy weightlifting side effects

  • ​अचानक अंधुक दिसणे.
  • ​डोळ्यांसमोर काळे डाग किंवा सावली दिसणे.
  • ​विनावेदना दृष्टी कमी होणे.
  • ​डोळ्यांसमोर तरंगणारे कण (Floaters) दिसणे.

​उपचार कसे होतात? | How is Valsalva Retinopathy treated

​जिम जाणाऱ्यांसाठी महत्त्वाच्या टिप्स| Important precautions for gym lovers

  • ​वजन उचलताना कधीही श्वास रोखून धरू नका.
  • ​वजन उचलण्याच्या योग्य पद्धती (Technique) प्रशिक्षकाकडून शिका.
  • ​क्षमतेपेक्षा जास्त वजन उचलण्याची स्पर्धा करू नका.
  • ​डोळ्यांत किंवा डोक्यात अस्वस्थता जाणवल्यास व्यायाम त्वरित थांबवा.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com