Chemical Free Hair Dye: पांढरे केस होतील 2 तासांत गायब, किचनमधील 3 गोष्टींमुळे तुम्हाला मिळतील काळेभोर-मऊ केस

Chemical Free Hair Dye: केमिकलमुक्त हेअर कलर घरीच कसा बनवायचा? बीट, कॉफी आणि मेहंदीचा वापर करून पांढऱ्या केसांपासून नैसर्गिकरित्या सुटका मिळवण्यासाठी वापरा हा खास घरगुती उपाय.

जाहिरात
Read Time: 2 mins
Hair Colour At Home: पांढऱ्या केस काळे करण्यासाठी रामबाण उपाय
(AI Generated Image)

Chemical Free Hair Color: हल्ली लहानांपासून ते मोठ्यापर्यंत सर्वांमध्ये केस अकाली पांढरे होण्याची समस्या दिसून येत आहे. प्रदूषण आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी हे या समस्येचे मुख्य कारण आहे. आरशात एखादा पांढरा केस दिसला तरी सर्वात आधी मनात विचार येतो की आता डाय (Hair Dye) लावावा लागेल. पण बाजारात मिळणाऱ्या डायमध्ये इतके घातक रसायने असतात की यामुळे काळ्या केसांचंही नुकसान होते. शिवाय केस कोरडे आणि निर्जीव होतात. जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने केस काळे करायचे असतील, तर किचनमधील बीट (Beetroot), मेंदी आणि कॉफी वापरून तुम्ही घरच्या घरी हेअर कलर तयार करू शकता.

घरगुती हेअर कलर का आहे खास?

  • बीट (Beetroot): बीटचा गडद लाल रंग केसांना एक आकर्षक छटा (Shade) देतो. यातील जीवनसत्त्वे आणि अँटी-ऑक्सिडंट्समुळे टाळूच्या भागातील (Scalp) रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुधारेल. 
  • मेंदी (Heena): केसांसाठी हा शतकानुशतके वापरला जाणारा उपाय आहे. मेंदीतील घटक केसांचे कंडिशनिंग करतात आणि केसांना मजबूत नैसर्गिक रंग देतील.
  • कॉफी (Coffee): कॉफीचा रंग केसांना गडदपणा देण्यास मदत करतो. तसेच तो मेंदीचा लाल रंग कमी करून केसांना नैसर्गिक डार्क शेड देतो.
     

हेअर कलर तयार करण्याची कृती:

साहित्य

  • बीट (किसलेले)
  • मेंदी पावडर
  • कॉफी पावडर
  • लोखंडी कढई
  • लिंबू
(नक्की वाचा: Stale Dough Side Effects: सावधान! फ्रिजमध्ये ठेवलेल्या पिठाची पोळी खाताय? पोषणतत्त्व नाही, पोटात हे विष जातंय)

1. सर्वप्रथम बीट किसून त्याचा रस काढून घ्या किंवा थोड्या पाण्यात उकळून त्याचा घट्ट लाल द्रावण तयार करा.
2. बिटाच्या पाण्यात दोन चमचे कॉफी पावडर मिसळा आणि मिश्रण चांगले ढवळा.
3. आता एका लोखंडी कढईत मेंदी पावडर घ्या आणि त्यात हळूहळू बीट-कॉफीचे पाणी ओता. गुठळ्या होणार नाहीत याची काळजी घेत हे मिश्रण चांगले मिसळून घ्या.
4. ही पेस्ट किमान पाच ते सहा तास किंवा रात्रभर लोखंडी कढईतच राहू द्यावी. लोखंड कढईतील गुणधर्मानुसार नैसर्गिक प्रक्रिया झाल्यामुळे मेंदीला गडद रंग प्राप्त होतो.
5. सकाळी यामध्ये लिंबाचा रस मिक्स करा. लिंबू केसांवर रंग टिकवून ठेवण्यास मदत करतो.

Advertisement

(नक्की वाचा: Fennel Seeds Water Benefits: गॅस, ॲसिडिटी, फॅटपासून हवीय सुटका? सलग 15 दिवस प्या हे पाणी, संपूर्ण शरीरच बदलेल)

Photo Credit: NDTV Marathi

केसांना हेअर पॅक लावण्याची योग्य पद्धत 

  • केसांचे योग्य विभाजन करून ब्रश किंवा हाताच्या मदतीने मुळापासून ते टोकापर्यंत पेस्ट लावा. 
  • हेअर पॅक दोन ते तीन तास केसांवर लावून ठेवा, त्यानंतर साध्या पाण्याने केस स्वच्छ धुऊन घ्या. 
  • त्याच दिवशी लगेच शॅम्पूने केस स्वच्छ धुऊ नये. 
  • दुसऱ्या दिवशी केसांना तेल लावून मसाज केल्यानंतरच शॅम्पूने हेअरवॉश करावा.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )