Hair Care Tips: खाऱ्या पाण्याने केस गळणं आणि टक्कल पडणं टाळायचंय? फक्त 'या' 2 गोष्टी नक्की करा!

Reduce Hair Fall From Hard water : खाऱ्या पाण्यामुळे केसांची गुणवत्ता तर खराब होतेच, शिवाय कोंड्याची समस्या वाढून केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात

जाहिरात
Read Time: 3 mins
Hair Care Tips: दीर्घकाळ खाऱ्या पाण्याचा वापर केल्यास टक्कल पडण्याची भीती असते. (प्रतिकात्मक फोटो)
मुंबई:

Reduce Hair Fall From Hard water :  खाऱ्या पाण्याची समस्या (hard water problem) आता शहरांपासून गावांपर्यंत सर्वत्र वाढताना दिसत आहे. पिण्यासाठी लोक वॉटर प्युरीफायरचा वापर करतात, पण तुम्हाला माहिती आहे का की या खाऱ्या पाण्याचा सर्वात वाईट परिणाम त्वचा आणि केसांवर होतो. 

खाऱ्या पाण्यामुळे केसांची गुणवत्ता तर खराब होतेच, शिवाय कोंड्याची समस्या वाढून केस मोठ्या प्रमाणावर गळू लागतात. वास्तविक, खाऱ्या पाण्यात सोडियमसह मॅग्नेशियम आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते. यामुळे केस धुतल्यावर टाळूवर (स्कॅल्प) एक थर जमा होतो, ज्यामुळे कोंडा होतो आणि केस गळायला सुरुवात होते. दीर्घकाळ खाऱ्या पाण्याचा वापर केल्यास टक्कल पडण्याची भीती असते.

Advertisement

केसांचे संरक्षण करण्यासाठी 'या' सोप्या टिप्स वापरा

1. पाणी उकळून वापर करा: खाऱ्या पाण्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी केस धुण्यासाठी नेहमी उकळून थंड केलेल्या पाण्याचाच वापर करा. यामुळे केसांची गुणवत्ता सुधारते आणि ते मऊ व चमकदार दिसू लागतात. लक्षात ठेवा, केस धुण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा नाही, तर पाणी उकळल्यानंतर ते पूर्णपणे थंड करून मगच वापरावे.

( नक्की वाचा : Dental Care Tips: महागड्या ट्रीटमेंटची गरज नाही! 'या' सोप्या उपायाने तुमचे पिवळे दात होतील पांढरेशुभ्र )


2. दह्याचा हेअर मास्क वापरा: दह्यामध्ये असलेली पोषक तत्त्वे केसांसाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. ज्यांचे केस खाऱ्या पाण्यामुळे खराब झाले आहेत, त्यांनी आठवड्यातून 1 ते 2 वेळा दह्याचा हेअर मास्क नक्की वापरावा. कोरड्या केसांसाठी ताज्या दह्यात 1 चमचा मध आणि 1 चमचा ऑलिव्ह ऑईल (जैतून तेल) मिसळून मास्क तयार करा. 

हा मास्क केस आणि टाळूवर व्यवस्थित लावून हलक्या हाताने मसाज करा. 45 मिनिटांनंतर केस साध्या पाण्याने किंवा माईल्ड शॅम्पूने धुवून टाका. हा मास्क नैसर्गिक मॉइश्चरायझरसारखे काम करतो.

( नक्की वाचा : Monsoon Home Tips: पावसाळ्यात घरात चिचुंदरीचा सुळसुळाट झालाय? एका घरगुती उपायाने अवघ्या 5 मिनिटांत पळवून लावा! )

3. केसांना नियमित तेल लावा: सतत खाऱ्या पाण्याने केस धुतल्यामुळे ते कोरडे आणि रुक्ष होतात. अशा वेळी केसांना नियमित तेल लावणे अतिशय महत्त्वाचे आहे. आवळा, ब्राह्मी आणि बदाम तेलाने आठवड्यातून किमान 2 वेळा टाळूची मालिश करा. यामुळे कोरड्या टाळूची समस्या दूर होण्यास मदत होते.

Advertisement

4. आहारात सुकामेवा आणि बियांचा समावेश करा: केसांच्या मजबुतीसाठी केवळ बाह्य काळजी पुरेशी नसते, तर योग्य आहारही तितकाच महत्त्वाचा असतो. तुमच्या दैनंदिन आहारात अक्रोड, जवस आणि तीळ यांसारख्या नट्स आणि सीड्सचा नक्की समावेश करा. यामधील प्रोटीन, जीवनसत्त्वे आणि खनिजे केसांना मुळांपासून मजबूत आणि निरोगी बनवतात.

( स्पष्टीकरण: या लेखातील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. याचे अनुकरण करण्यापूर्वी तुमचे डॉक्टर किंवा संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. NDTV नेटवर्क याबाबतच्या परिणामांची जबाबदारी घेत नाही.)
 

Advertisement

Topics mentioned in this article