जाहिरात

Monsoon Home Tips: पावसाळ्यात घरात चिचुंदरीचा सुळसुळाट झालाय? एका घरगुती उपायाने अवघ्या 5 मिनिटांत पळवून लावा!

How To Get Rid Of Shrew: रासायनिक औषधांचा किंवा विषाचा वापर न करता, घरातील साहित्यापासून अवघ्या 5 मिनिटांत चिचुंदरी पळवून लावणारा एक उपाय आहे.

Monsoon Home Tips: पावसाळ्यात घरात चिचुंदरीचा सुळसुळाट झालाय? एका घरगुती उपायाने अवघ्या 5 मिनिटांत पळवून लावा!
Monsoon Home Tips: पावसाळ्यात सभोवताली पाणी साचल्यामुळे घरात साप आणि चिचुंदरी बाहेर येण्याचे प्रमाण वाढते.
मुंबई:

How To Get Rid Of Shrew: पावसाळ्यात सभोवताली पाणी साचल्यामुळे घरात साप आणि चिचुंदरी बाहेर येण्याचे प्रमाण वाढते. चिचुंदरीमुळे घरात पसरणारी उग्र दुर्गंधी, आजारांचा धोका आणि वायर किंवा कपडे कुरतडल्यामुळे होणारे नुकसान यामुळे अनेकजण त्रस्त असतात. लहान मुले तर या प्राण्याला प्रचंड घाबरतात. रासायनिक औषधांचा किंवा विषाचा वापर न करता, घरातील साहित्यापासून अवघ्या 5 मिनिटांत चिचुंदरी पळवून लावणारा एक अत्यंत सोपा आणि नैसर्गिक उपाय आता समोर आला आहे.

पुदिन्याचा उग्र वास ठरणार प्रभावी

चिचुंदरी आणि उंदरांना कोणत्याही धोकादायक रसायनाशिवाय घरातून पळवून लावायचे असेल, तर पुदिन्याची पाने आणि त्याच्या दांड्या अत्यंत उपयोगी पडतात. चिचुंदरीचा वास घेण्याची क्षमता खूप तीक्ष्ण असते. पुदिन्याचा तीव्र आणि उग्र वास चिचुंदरीला अजिबात सहन होत नाही. त्यामुळे पुदिन्याचा वास येताच चिचुंदरी घराच्या आसपासही फिरकत नाही.

( नक्की वाचा : Monsoon Home Care: पावसाळ्यात घराच्या भिंतींना ओल आलीय? खिशातला एकही रुपया खर्च न करता 'अशी' मिळवा सुटका )

अवघ्या 5 मिनिटांत असा तयार करा घरगुती स्प्रे

हा घरगुती उपाय तयार करणे अतिशय सोपे आहे. यासाठी पुदिन्याची ताजी पाने किंवा त्याच्या दांड्या पाण्यात टाकून 5 मिनिटे उकळून घ्याव्या. हे पाणी थंड झाल्यावर एका स्प्रे बाटलीमध्ये भरून ठेवावे. हा स्प्रे घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये, दारांच्या मागे आणि विशेषतः चिचुंदरी शिरण्याची शक्यता असलेल्या जागांवर मारावा. स्प्रेऐवजी पुदिन्याची ताजी पाने थेट कोपऱ्यांमध्ये ठेवूनही चिचुंदरीला पळवून लावता येते.

( नक्की वाचा : शरीराचा सर्वात घाण भाग कोणता? नाव ऐकून बसेल मोठा धक्का; दुर्लक्ष केल्यास उद्भवू शकतात 'या' गंभीर समस्या )

घराच्या सुरक्षेसाठी 'या' विशेष गोष्टींची घ्या काळजी

फक्त उपायांवर अवलंबून न राहता पावसाळ्यात घरातील स्वच्छतेकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. घरातील अन्नपदार्थ नेहमी झाकून ठेवावेत आणि कचरापेटी रोज साफ करून झाकलेली ठेवावी. याशिवाय घराच्या खिडक्या आणि दारांना बारीक जाळ्या बसवून घेतल्यास चिचुंदरी किंवा इतर कीटक घरात शिरण्याचा मार्ग पूर्णपणे बंद होतो.
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com