जाहिरात

Hanuman Jayanti 2026 Date: हनुमान जयंतीची अचूक तारीख, शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेचे महत्त्व वाचा एका क्लिकवर

Hanuman Jayanti 2026 Date: हनुमान जयंती 2026 मध्ये कधी आहे? जाणून घ्या चैत्र पौर्णिमा तिथी, पूजेचा शुभ मुहूर्त आणि ध्रुव योगाचे महत्त्व.

Hanuman Jayanti 2026 Date: हनुमान जयंतीची अचूक तारीख, शुभ मुहूर्त, तिथी आणि पूजेचे महत्त्व वाचा एका क्लिकवर
"Hanuman Jayanti 2026 Date: हनुमान जयंती कधी आहे?"
Canva

Hanuman Jayanti 2026 Date: दरवर्षी चैत्र महिन्याच्या पौर्णिमा तिथीला हनुमान जयंती साजरी केली जाते. चैत्र महिन्यातील पौर्णिमा तिथीला हनुमानचा जन्म झाला होता, असे मानले जाते. हिंदू धर्मामध्ये हनुमानाची भक्ती अत्यंत शक्तिशाली आणि कल्याणकारी मानली जाते, त्यांना 'संकटमोचन' असेही म्हटले जाते. म्हणजेच ते आपल्या भक्तांचे सर्व दुःख आणि कष्ट दूर करतात. पण यंदा हनुमान जयंतीच्या तारखेबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. वर्ष 2026मध्ये हनुमान जयंती नेमकी कधी आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. हनुमान जयंतीची अचूक तारीख, शुभ मुहूर्तासह सर्व माहिती जाणून घेऊया... 

हनुमान जयंती कधी साजरी केली जाणार? | Hanuman Jayanti 2026 News

हिंदू पंचांगानुसार, यंदा चैत्र पौर्णिमा तिथी 1 एप्रिल रोजी सकाळी 07.07 वाजता सुरू होऊन 2 एप्रिलच्या सकाळी 07.42 वाजेपर्यंत समाप्त असेल. त्यामुळे उदया तिथीनुसार हनुमान जयंती 2 एप्रिल रोजी साजरी केली जाईल. भाविक या दिवशी उपवास आणि विधिवत पूजा करून हनुमानाचा आशीर्वाद घेऊ शकतात.

(नक्की वाचा: Chaitra Purnima 2026: चैत्र पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी, विशेष योग आणि पूजा विधीसह सर्व माहिती वाचा सविस्तर)

हनुमान जयंती पूजेचा शुभ मुहूर्त | Hanuman Jayanti 2026 Shubh Muhurat

  1. धार्मिक मान्यतेनुसार, शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने त्याचे लाभ अनेक पटींनी वाढतात.
  2. यावेळेस हनुमान जयंतीच्या दिवशी सकाळी 6.10 वाजेपासून ते सकाळी 7.44 वाजेपर्यंत पूजेची उत्तम वेळ असेल. 
  3. संध्याकाळी 6.39 वाजेपासून ते संध्याकाळी 8.06 वाजेपर्यंत देखील पूजा करता येईल. 
  4. ब्रह्म मुहूर्त पहाटे 4.38 वाजेपासून ते पहाटे 5.24 वाजेपर्यंत पर्यंत असेल.
  5. अभिजित मुहूर्त दुपारी 12:00 वाजेपासून ते दुपारी 12:50 वाजेपर्यंत राहील.
हनुमान जयंतीच्या दिवशीचा शुभ योग | Hanuman Jayanti 2026 Shubh Yog
  1. यावेळेस हनुमान जयंतीला 'ध्रुव योग' आणि 'हस्त नक्षत्र' यांचा खास योग जुळून येत आहे. 
  2. ध्रुव योग दुपारी 2.20 वाजेपर्यंत असेल, जो अत्यंत शुभ मानला जातो. 
  3. याशिवाय संध्याकाळपर्यंत हस्त नक्षत्राचा प्रभाव राहील, ज्यामुळे पूजा-अर्चेचे महत्त्व अधिकच वाढणार आहे.

हनुमान जयंतीच्या दिवशी मनोभावे पूजा आणि व्रत केल्यास जीवनातील सर्व संकटे दूर होतात. भीती, रोग आणि अडथळे नष्ट होऊन व्यक्तीला शक्ती, साहस आणि यशाचा आशीर्वाद मिळतो; असे म्हणतात. 

Latest and Breaking News on NDTV

Photo Credit: NDTV Marathi

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com