जाहिरात

Chaitra Purnima 2026: चैत्र पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी, विशेष योग आणि पूजा विधीसह सर्व माहिती वाचा सविस्तर

Chaitra Purnima 2026: चैत्र पौर्णिमेचे व्रत कोणत्या दिवशी करावे, आज की उद्या? जाणून घ्या शुभ मुहूर्त, पौर्णिमा तिथीसह सर्व माहिती...

Chaitra Purnima 2026: चैत्र पौर्णिमेचा शुभ मुहूर्त, तिथी, विशेष योग आणि पूजा विधीसह सर्व माहिती वाचा सविस्तर
"Chaitra Purnima 2026 News: चैत्र पौर्णिमा पूजेचा शुभ मुहूर्त"

Chaitra Purnima 2026: हिंदू धर्मामध्ये चैत्र पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे. पंचांगानुसार पौर्णिमा तिथीची सुरुवात आज (1 एप्रिल) सकाळी 07.07 वाजता झाली असून समाप्ती 2 एप्रिल रोजी सकाळी 07.42 वाजता होईल. धार्मिक मान्यतेनुसार उदया तिथीनुसार चैत्र पौर्णिमेचा उपवास 2 एप्रिल (गुरुवार) रोजी करावा. पवित्र स्नान आणि दान देखील याच दिवशी करावे. 2 एप्रिल रोजी सूर्योदयाच्या वेळी पौर्णिमा तिथी असल्याने त्या दिवशी पवित्र स्नान आणि दान करणे अधिक शुभ ठरेल.

चैत्र पौर्णिमा पूजा विधी | Chaitra Purnima 2026 Puja Vidhi | Chaitra Purnima 2026 News | Chaitra Purnima 2026 News In Marathi

  • पहाटे उठून स्नान केल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करावे. नदीमध्ये स्नान करणे शक्य नसल्यास स्नानाच्या पाण्यात गंगाजल मिक्स करावे. 
  • त्यानंतर हातामध्ये जल घेऊन व्रताचा संकल्प करावा.
  • चैत्र पौर्णिमेच्या दिवशी सत्यनारायणाची पूजा करावी. 
  • घरातील देवघर स्वच्छ करून गंगाजलाने शुद्ध करावे.
  • त्यानंतर चौरंगावर भगवान विष्णूंची मूर्ती किंवा प्रतिमा स्थापित करावी.
  • देवाला पिवळ्या रंगाची फुले, फळे, पंचामृत आणि तुळशीपत्र अर्पण करावे.
  • भगवंताच्या मंत्रांचा जप करावा. सत्यनारायण कथा वाचणे देखील खूप शुभ मानले जाते.
  • यानंतर आरती करावी आणि नैवेद्य अर्पण करावा.
  • चैत्र पौर्णिमेला माता लक्ष्मी आणि हनुमानजींची पूजा देखील आवर्जून करावी.
  • माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून त्यांना लाल किंवा गुलाबी रंगाची फुले अर्पण करावी.
  • हनुमानजींना चमेलीच्या तेलात शेंदूर मिक्स करून अर्पण करावा. तसेच हनुमान चालीसा किंवा बजरंग बाणाचे पठण करावे.
  • संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावावा. 
  • चंद्राला दूधमिश्रित पाण्याचे अर्घ्य अर्पण करावे आणि प्रसाद म्हणून खीर किंवा मिठाई अर्पण करावी.
  • त्यानंतर व्रताचे पारण करावे.   

चैत्र पौर्णिमा पूजा शुभ मुहूर्त 1 एप्रिल 2026 | Chaitra Purnima 2026 Shubh Muhurat

  1. ब्रह्म मुहूर्त स्नान : पहाटे 4.39 वाजेपासून ते पहाटे 5.25 वाजेपर्यंत आहे.
  2. अमृत काळ: सकाळी 8.48 वाजेपासून ते सकाळी 10.28 वाजेपर्यंत आहे
  3. विजय मुहूर्त: दुपारी 2.30 वाजेपासून ते दुपारी 3.20 वाजेपर्यंत आहे. 
  4. गोधूलि मुहूर्त: संध्याकाळी 6.38 वाजेपासून ते संध्याकाळी 7.01 वाजेपर्यंत आहे. 
  5. अभिजीत मुहूर्त: दुपारी 12 वाजेपासून ते दुपारी 12.50 वाजेपर्यंत आहे. 

(नक्की वाचा: Chaitra Purnima 2026: चैत्र पौर्णिमा कधी आहे, 1 की 2 एप्रिल? योग्य तारीख, तिथी, शुभ मुहूर्त जाणून घ्या सविस्तर)

आजच्या दिवशी रवि योग आणि सर्वार्थ सिद्धी योग यासारखे शुभ योग जुळून आले आहेत, ज्यामुळे पूजेचे अधिक लाभ मिळू शकतात. त्यामुळे आजचा दिवस विशेष फलदायी आहे.

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com