Happy Eid-ul-Adha 2026 Wishes: इस्लामिक कॅलेंडरमध्ये Eid al-Adha म्हणजेच बकरी ईदचा सण अतिशय पवित्र आणि मोठा मानला जातो. यंदा भारतात 28 मे रोजी बकरी ईदचा सण देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. हा सण त्याग, समर्पणाचे प्रतीक मानला जातो. हा दिवस हजरत इब्राहिम यांच्या त्या महान बलिदानाची आठवण करून देतो, जे त्यांनी अल्लाहच्या आदेशावरून देण्याचा निर्णय घेतला होता. या निमित्ताने सकाळच्या वेळेस विशेष नमाज पठण केले जाते, कुर्बानी दिली जाते आणि घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे पक्वान्न बनवले जातात. या दिवशी सर्व नातेवाईक, मित्रपरिवार एकत्रित मिळून हा सण साजरा करतात. बकरी ईदनिमित्त मित्रपरिवार, नातेवाईक, कुटुंबीयांसह प्रियजनांना 'ईद मुबारक' म्हणत खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.
बकरी ईद मुबारक: बकरी ईद मुबारक मेसेज | Happy Bakrid 2026 Wishes
- तुमची प्रत्येक दुआ कबुल होवो आणि या आयुष्यात भरभरून आनंद मिळो. बकरी ईदच्या खूप खूप शुभेच्छा.
- नेहमी हसत राहा जशी हसतात फुले, जगातील सर्व दुःख तुम्ही जा विसरून. चहूबाजूंनी पसरू दे आनंदाची गाणी, या आशेसह तुम्हाला मुबारक ईद.
- या शुभप्रसंगी अल्लाह तुमची प्रत्येक इच्छा मान्य करो आणि तुमचे घर बरकतीने (समृद्धीने) भरून टाको. तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला बकरी ईद मुबारक.
- आयुष्यातील प्रत्येक क्षण आनंदापेक्षा कमी नसो, तुमचा प्रत्येक दिवस ईदच्या दिवसापेक्षा कमी नसो. असा ईदचा दिवस तुम्हाला नेहमी लाभो. बकरा ईद मुबारक.
- जसे पांढऱ्या रंगात शांतता मिळते, तशीच तुमच्या आयुष्यातही कायम शांतता टिकून राहो. अल्लाह तुम्हाला प्रत्येक वाईट गोष्टीपासून वाचवो. हॅपी बकरी ईद.
बकरीदचे मित्रांसाठी खास शुभेच्छा संदेश Happy Eid-ul-Adha 2026 Wishes In Marathi
1. ईदचा चंद्र दिसला, आपल्यासोबत भरभरून आनंद घेऊन आला. तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधार दूर होऊन यशाचा एक नवीन प्रकाश येवो. बकरी ईदच्या हार्दिक शुभेच्छा!
2. मित्रा, तुझ्यावर अल्लाहची कृपा कायम राहो. तुझे प्रत्येक काम यशस्वी होवो आणि तुझ्या मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होवो. हॅपी बकरी ईद.
3. तुझ्या सोबतीने नात्यांमध्ये गोडवा आणि मनांमध्ये प्रेम राहो, त्याग आणि समर्पणाचा हा सण तुला आणि तुझ्या कुटुंबाला मुबारक असो. ईद मुबारक.
4. लक्षात ठेव की आपल्यातील वाईट गोष्टी आणि अहंकाराचीही कुर्बानी देणे हीच या सणाची खरी शिकवण आहे. अल्लाह आपल्या सर्वांना चांगल्या मार्गावर चालण्याची बुद्धी देवो. ईद मुबारक.
5. आनंदाने भरून जावे तुमचे जीवन सारे. कधीही न येवो तुमच्या डोळ्यात आसू, असाच असावा तुमचा येणारा काळ. बकरी ईद मुबारक.
(नक्की वाचा : Bakrid 2026 Date: बकरी ईदच्या तारखेवरून गोंधळ? भारतात बकरीद कधी, 27 की 28 मे? वाचा अचूक तारीख, इतिहास, महत्त्व)
दोन ओळींचे व्हॉट्सॲप स्टेटस (2 Line WhatsApp Status)
1. दुआंमध्ये लक्षात ठेवा आणि आनंद वाटत राहा, हाच या पवित्र सणाचा खरा अर्थ आहे. ईद मुबारक.
2. तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होवो आणि अल्लाहची कृपा तुमच्यावर नेहमी राहो. बकरी ईद शुभेच्छा!
3. आनंदाचा दिवस आला आहे, सोबत भरपूर बरकत घेऊन आला आहे. चला मिळून आभार मानूया त्या खुदाचे, ज्याने आपल्याला हा दिवस दाखवला आहे.
4. मनापासून सर्वांना माफ करून या ईदला एक नवीन सुरुवात करूया. अल्लाह तुम्हा सर्वांना कायम सुरक्षित ठेवो. ईद मुबारक 2026.
5. प्रेम आणि बंधुभावाच्या या सुंदर सणाच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा.
6. द्वेष मिटवून प्रेमाची गोष्ट करूया, या ईदला आपण सर्व मिळून आनंदाची सुरुवात करूया.
7. अल्लाह तुमचे घर आनंदाने, मन शांततेने आणि आयुष्य बरकतीने भरून टाको. ईद मुबारक.
8. या पवित्र दिवशी माझी हीच प्रार्थना आहे की जगात सर्वत्र शांतता नांदो. हॅपी बकरी ईद 2026.
9. सूर्याची किरणे आणि ताऱ्यांची बहार, चंद्राची चांदणी आणि खास लोकांचे लोकांचे प्रेम. तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना ईद मुबारक.
10. ईद अशा प्रकारे मुबारक होवो तुम्हाला की, तुम्ही आनंदात आम्हाला सामील करण्याचे आमंत्रण घेऊन लवकरच घरी याल.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world