
Independence Day 2025 Wishes And Quotes In Marathi: दरवर्षी 15 ऑगस्ट रोजी आपण आपल्या देशाच्या स्वातंत्र्यदिनाचा (Independence Day 2025) उत्सव मोठ्या अभिमानाने आणि सन्मानाने साजरा करतो. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या या मातीतील शूर सुपुत्रांचे, क्रांतिकारकांच्या शौर्याचे, देशभक्तीचे स्मरण प्रत्येक देशवासीय या दिवशी करतो. 15 ऑगस्टचा (15th August) दिवस म्हणजे आपल्यातील देशभक्ती, एकता आणि स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची भावना पुन्हा जागृत करण्याची संधी आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त (Independence Day 2025 Wishes And Quotes) देशभक्तीच्या भावना मित्रपरिवार, नातेवाईकांसह प्रियजनांना खास शुभेच्छा संदेशाद्वारे नक्की पाठवा.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | 79th Independence Day 2025 Wishes In Marathi
1. स्वातंत्र्यसंग्रामात अनेकांनी बलिदान दिले, रक्त सांडले
आणि देशासाठी हसत-हसत फासावर गेले
त्यांच्या त्यागामुळे आपण आज स्वतंत्र आहोत
चला आजच्या दिवशी त्यांच्या आठवणींना वंदन करूया
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
2. ही माती, हे आकाश, हे स्वातंत्र्य
सहजासहजी मिळालेले नाही
शेकडो वर्षांच्या संघर्षातून हे स्वातंत्र्य मिळालंय
आपण ते व्यवस्थित जपायला हवे
15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
3.स्वातंत्र्य म्हणजे केवळ झेंडा फडकवणे नव्हे
तर स्वाभिमानाने जगणे हे देखील स्वातंत्र्य आहे
आजच्या दिवशी देशासाठी काही तरी मोठे करण्याची प्रतिज्ञा करूया
15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
4.देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटलेल्या वीरांचे स्मरण करूया
त्यांच्या स्वप्नांतील भारत घडवूया
आपला भारत समृद्ध, सुरक्षित आणि प्रगतिपथावर असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
5. जय जवान, जय किसान, जय विज्ञान
या घोषणांनी प्रेरित होऊन आपण एक नवा भारत घडवूया
स्वातंत्र्य दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
6. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान दिलेल्या वीरसैनिकांना शतशः नमन
त्यांच्या त्यागाचा आपण या जगाला विसर पडू देऊ नये
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
7. आपण भारतीय आहोत, याचा अभिमान बाळगा
हा देश आपला आहे आणि आपणच त्याचे रक्षणकर्ते आहोत
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
8. स्वातंत्र्याचा खरा अर्थ म्हणजे जबाबदारी
प्रत्येक नागरिकाने ती पार पाडल्यासच खरा स्वतंत्र भारत घडेल
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
9.भारत माता की जय!
देशभक्तीने भारलेले मन घेऊन आपले कार्य पूर्ण निष्ठेने पार पाडूया
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
10.स्वातंत्र्य दिन म्हणजे केवळ एक राष्ट्रीय सण नव्हे
तर ती आपली ओळख आहे
ही ओळख जपणे हीच खरी देशभक्ती
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
Happy Independence Day 2025
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world