Happy Independence Day 2025 Wishes : देश आणि तिरंगा आपुली शान! स्वातंत्र्य दिनानिमित्त पाठवा खास संदेश

Independence Day 2025 Wishes In Marathi: 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रियजनांना खास शुभेच्छा संदेश नक्की पाठवा.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Independence Day 2025 Wishes And Quotes In Marathi: स्वातंत्र्य दिनाचे खास शुभेच्छा संदेश!"

Independence Day 2025 Wishes And Quotes In Marathi: 15 ऑगस्ट म्हणजे आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिवस. यंदा आपण 79वा स्वातंत्र्य दिवस साजरा करतोय. सर्वत्र देशभक्तीचे वातावरण दिसतंय. 15 ऑगस्ट हा आपल्या भारताच्या इतिहासातील एक सुवर्ण दिन आहे. हा दिवस केवळ एका तारखेपुरता मर्यादित नाहीय तर स्वातंत्र्याचा प्रत्येक क्षण आपल्याला संघर्षाची, लाखो स्वातंत्र्यसैनिकांच्या बलिदानाची साक्ष देणारा आणि आपल्या राष्ट्राच्या अस्मितेचा उत्सव साजरा करण्याची आठवण करून देत असतो. स्वातंत्र्य दिनानिमित्त प्रियजनांचे देशभक्तीचे संदेश नक्की पाठवा...

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! (Independence Day 2025 Wishes And Quotes In Marathi)

1. तिरंगा आपल्या अंत:करणात घर करतो
कारण तो आपल्याला आपल्या मातृभूमीच्या स्वातंत्र्याची आठवण करून देतो 
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

2. संविधानाने दिलेले अधिकार जपताना आपल्या कर्तव्यांनाही विसरू नका
हाच खरा स्वातंत्र्याचा आदर आहे
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! 

Photo Credit: PTI

3. तिरंग्याचे तीन रंग हे आपले मूल्य आहेत 
त्याग, शांती आणि समृद्धी
चला हे मूल्य आयुष्यात रुजवूया
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

4. भारतीय होणे म्हणजे गर्वाची गोष्ट
आपल्या भारतीयत्वाचा आज अभिमान साजरा करूया 
15 ऑगस्टच्या हार्दिक शुभेच्छा!

Photo Credit: PTI

(नक्की वाचा: Happy Independence Day 2025 Wishes: बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो! स्वातंत्र्यदिनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

5. स्वातंत्र्य ही केवळ स्थिती नसून
ती एक मानसिकता आहे निर्भय आणि न्यायप्रेमी
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

6. आपण आपली संस्कृती, परंपरा आणि स्वातंत्र्य यांचा आदर केला
तरच भारत महान बनेल
15 ऑगस्टच्या मंगलमय शुभेच्छा!

Photo Credit: PTI

(नक्की वाचा: Independence Day 2025 Wishes: हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे! स्वातंत्र्यदिनानिमित्त पाठवा खास शुभेच्छा)

7. स्वातंत्र्य दिन म्हणजे एकतेचा, बंधुत्वाचा आणि नवभारताच्या संकल्पाचा दिवस
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

8. भारतमातेच्या चरणी आपलं सर्वस्व अर्पण करणाऱ्या वीरांना मानाचा मुजरा!
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा!

Photo Credit: Canva

9. आपण मिळवलेले स्वातंत्र्य हे अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला आजही सजग राहावे लागेल
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

10. तिरंग्याला सलाम करून देशभक्तीची शपथ घेऊया
हाच खरा स्वातंत्र्य दिनाचा उत्सव आहे.
स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!

Photo Credit: Canva

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)