Makar Sankranti Wishes 2025 In Marathi: मकर संक्रांतीचा सण दरवर्षी 14 जानेवारीला उत्साहात साजरा केला जातो. समृद्धी आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून हा सण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. मकर संक्रांतीला पुरणपोळी, तिळाचे लाडू यासारख्या मिष्ठान्नाची घरोघरी मेजवानी असते. तसेच या दिवशी सूर्यदेवतेची पूजा करणंही शुभ मानले जाते. मकरसंक्रांतीला पतंगबाजीही मजा लुटली जाते. तुम्हाला जवळच्या माणसांसोबत सण साजरा करणे शक्य नसेल तर तर मित्रपरिवार आणि नातेवाईकांना मेसेज पाठवून सणाच्या शुभेच्छा द्यायला विसरू नका.
मकर संक्रांतीचे शुभेच्छा संदेश - Happy Makar Sankranti 2025
शुभ दिनी सूर्य देव तुम्हाला ऊर्जा, आनंद आणि यश प्रदान करो
मकर संक्रांतीच्या 2025च्या हार्दिक शुभेच्छा !
तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबीयांना मकर संक्रांतीनिमित्त भरभरून आनंद आणि सुख समृद्धी समाधान मिळो
मकर संक्रांतीच्या 2025च्या हार्दिक शुभेच्छा !
जसेजसे पतंग आकाशात उंच उडतो, तसेतसे तुमची स्वप्न देखील गगनभरारी घेवो
मकर संक्रांतीच्या 2025 हार्दिक शुभेच्छा !
मकर संक्रांतीच्या सणामुळे तुमचे जीवन सकारात्मकतेने, उत्तम आरोग्याने आणि आनंदाने भरून जावो.
मकर संक्रांतीच्या 2025 हार्दिक शुभेच्छा !
(नक्की वाचा: Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी या वेळेस करा स्नान, जाणून घ्या शुभ मुहूर्त)
हृदयात आनंद आहे
मन उत्साहाने भरलेले आहे
रंगीबेरंगी पतंग आकाशात उडत आहेत
आकाशात पसरलाय मकर संक्रांतीचा रंग.
मकर संक्रांतीच्या 2025 हार्दिक शुभेच्छा !
सूर्याने मकर राशीत केला प्रवेश
गंगा स्नान करून भाविक आले
जीवनात वाहो आनंदाचा झरा
मकर संक्रांतीच्या 2025 हार्दिक शुभेच्छा !
तीळगूळ घ्या आणि गोड गोड बोला
मकर संक्रांतीच्या 2025 हार्दिक शुभेच्छा !
सूर्य दुसऱ्या राशीत करेल प्रवेश
अनेकांचे नशीब चमकेल
नव्या वर्षाच्या पहिल्या सणाला
तुमचे जीवन आनंदाने व्यापून जावो
मकर संक्रांतीच्या 2025 हार्दिक शुभेच्छा !
(नक्की वाचा: Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीपूर्वी सूर्यामुळे जुळून येतील शक्तिशाली योग, 3 राशींसाठी येणार अच्छे दिन)
कोणीही कापू शकणार नाही तुमचा पतंग
न तुटो आपली मैत्री आणि विश्वासाला कधीही न जावो तडा
सूर्याप्रमाणे चमको तुमचे जीवन
पतंगाप्रमाणे गगनाला स्पर्श करो तुमचे स्वप्न
मकर संक्रांतीच्या 2025 हार्दिक शुभेच्छा !
तीळगुळाचा गोडवा
पतंगांनी रंगले आभाळ
गंगायमुनेच्या तीरावर भाविकांची गर्दी
सूर्यदेवतेकडून मिळो शुभ आशीर्वाद
मकर संक्रांतीच्या 2025 हार्दिक शुभेच्छा !
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)