जाहिरात

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीपूर्वी सूर्यामुळे जुळून येतील शक्तिशाली योग, 3 राशींसाठी येणार अच्छे दिन 

Makar Sankranti Shubh Yog: 14 जानेवारीला मकर संक्रांतीचा सण साजरा करण्यात येणार आहे. हा सण कोणकोणत्या राशींसाठी शुभवार्ता घेऊन येणार आहे, याची माहिती जाणून घेऊया...

Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीपूर्वी सूर्यामुळे जुळून येतील शक्तिशाली योग, 3 राशींसाठी येणार अच्छे दिन 

Makar Sankranti 2025: हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीचे विशेष महत्त्व आहे. या दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीमध्ये प्रवेश करतो, असे म्हटले जाते. या दिवशी सूर्यदेवतेची (Surya Dev) उपासना केल्यास चांगले लाभ मिळतात. दरवर्षी मकर संक्रांतीचा सण 14 किंवा 15 जानेवारीला साजरा केला जातो. या सणाचे धर्म, संस्कृती आणि शेतीशी संबंधित महत्त्व आहे. इतकेच नव्हे तर सूर्याचे मकर राशीत होणाऱ्या प्रवेशाचे ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातून विशेष महत्त्व असते. याचा अनेक राशींच्या लोकांच्या जीवनावरही परिणाम होतो. तर मकर संक्रांतीला सूर्यामुळे कोणते योग जुळून आले आहेत आणि याचा कोणत्या राशींना फायदा होणार आहे, याची माहिती जाणून घेऊया... 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

मकर संक्रांतीपूर्वी सूर्यामुळे जुळून येत आहेत हे योग

ज्योतिषशास्त्राच्या मान्यतेनुसार, मकर संक्रांतीच्या एक दिवस आधी म्हणजेच सोमवारी (13 जानेवारी 2025) रोजी दुपारी 1.40 वाजता सूर्य आणि अरुण ग्रह एकमेकांपासून 120 अंश डिग्री अंतरावर असतील. ज्यामुळे नवपंचम राजयोग (Navpancham Rajyog) जुळून येणार आहे. हा राजयोग काही राशीच्या लोकांसाठी फलदायी ठरणार आहे. 

(नक्की वाचा : Makar Sankranti 2025: मकर संक्रांतीच्या दिवशी या वेळेस करा स्नान, जाणून घ्या शुभ मुहूर्त)

कर्क रास (Cancer Zodiac)

ज्योतिषांच्या माहितीनुसार, सूर्य आणि अरुण ग्रहामुळे तयार होणारा नवपंचम राजयोग कर्क राशीसाठी शुभ ठरणार आहे. या काळात कर्क राशीच्या लोकांनी स्वतःची खूप काळजी घेणे आवश्यक आहे. तुम्ही स्वतःमध्ये अनेक बदल करू शकता, ज्यामुळे प्रगतीचे नवीन मार्ग उपलब्ध होतील. यावेळेस तुमच्या नात्यांमध्येही गोडवा निर्माण होऊ शकतो, मानसन्मान वाढेल आणि करिअरच्या दृष्टीकोनातून मोठे पद मिळू शकते. कर्क राशीच्या लोकांना व्यापारामध्येही चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळतील. बिझनेस पार्टनरसह चांगले संबंध निर्माण होतील, आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, नात्यात गोडवा येईल आणि आरोग्याशी संबंधित समस्या देखील निर्माण होणार नाहीत.  

तूळ रास (Libra Zodiac) 

तूळ राशीच्या लोकांसाठी नवपंचम राजयोग शुभ फळ घेऊन येणारा ठरणार आहे. यावेळेस तुम्हाला नशीबाची पूर्ण साथ मिळेल. बऱ्याच काळापासून प्रलंबित असणारी कामं पूर्ण होतील. उत्पन्न मिळवण्याचे मार्ग वाढतील, भौतिक सुखसोयी वाढतील, जीवनात आनंद निर्माण होईल, घरामध्ये शुभ किंवा मंगलमय घटना घडू शकतात. व्यवसायामध्ये आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे, तुम्ही पैसे कमवण्यास खूप सक्षम होऊ शकता. यासोबतच बचत करून तुम्ही तुमच्या प्रेम जीवनातही सुधारणा करू शकता.  

(नक्की वाचा: New Year 2025 Festivals And Important Days: 2025मधील सणउत्सव आणि दिनविशेषांची संपूर्ण यादी पाहा एका क्लिकवर)

वृश्चिक रास (Scorpio Zodiac)  

वृश्चिक राशीकरिता नवपंचम राजयोग आनंद घेऊन येणार आहे. भाऊबहिणीचे नाते मजबूत होईल. यादरम्यान प्रवासाचे योग जुळून येऊ शकतात आणि पैसाही कमावू शकता. करिअरच्या क्षेत्रामध्ये वारंवार प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना यश मिळेल. यासह आर्थिक लाभ होण्याचाही योग आहे, सूर्य देवतेच्या कृपेमळे व्यापारात यश मिळेल. बचत करण्यामध्ये तुम्हाला यश मिळेल आणि दीर्घकाळापासून जोडीदारासोबत सुरू असलेल्या समस्यांवरही समाधान मिळेल. 

(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

Listen to the latest songs, only on JioSaavn.com