Navratri Wishes 2024: अंबाबाईचा उदो उदो! नवरात्रौत्सवाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवा हे मेसेज

Happy Navratri Wishes 2024: नवरात्रौत्सवाच्या हे खास मेसेज पाठवून मित्रपरिवार आणि नातेवाईकांना सणाच्या शुभेच्छा पाठवा.

Advertisement
Read Time: 2 mins

Happy Navratri Wishes 2024:  शारदीय नवरात्रौत्सवास 3 ऑक्टोबरपासून शुभारंभ होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवामध्ये दुर्गा मातेच्या (Maa Durga) विविध रुपांची पूजा-अर्चना केली जाणार आहे. दुर्गामातेच्या आगमनामुळे चैतन्य आणि आनंदाचे वातावरण निर्माण होणार आहे. नवरात्रौत्सवानिमित्त (Navratri 2024) आपल्या मित्रपरिवार आणि नातेवाईकांना खास मराठीतून शुभेच्छा संदेश पाठवून नवरात्री उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊ शकता.  

नवरात्रोत्सव स्पेशल शुभेच्छा संदेश| Happy Shardiya Navratri 2024 Wishes In Marathi

1. सुख, शांती आणि समृद्धी लाभो 
तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला नवरात्रौत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा! 
Happy Shardiya Navratri 2024

2. अंबे माता तुम्हाला सुख, समृद्धी, वैभव प्रदान करो. 
जय माता दी.
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 

3. आई अंबाबाईची कृपादृष्टी कायम राहो
तुझा मायेचा हात आमच्या डोक्यावर कायम राहो
तुझ्या पदी लागो माझे मन 
हाच दे तुझा आशीर्वाद सदैव
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा! 

(नक्की वाचा: Navratri 2024: औंधासुराचा वध करणारी साताऱ्यातील प्रसिद्ध श्री यमाई देवी)

4. नवरात्रोत्सवाचा सण आला
भरपूर आनंद घेऊन आला
देवीआई तुम्हाला सर्व काही देवो
तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होवो
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!  

5. आयुष्यातील प्रत्येक इच्छा पूर्ण होवो
कोणतीही इच्छा न राहो अपूर्ण  
हात जोडून प्रार्थना करतो दुर्गा देवीला 
कोणतेही संकट तुमच्यावर न येवो
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!  

(नक्की वाचा: कोल्हापूरचा ऐतिहासिक शाही दसरा महोत्सव, 3 ते 12 ऑक्टोबरपर्यंत या विशेष कार्यक्रमांचे आयोजन)

6. सिंहावर स्वार होऊन, आनंदाचे वरदान घेऊन
घराघरात अवतरली अंबे माता, जगदंबे माता 
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!  

7. नवी कल्पना, नवी ज्योत्स्ना 
नवी शक्ती, नवी आराधना
नवरात्रीच्या शुभ प्रसंगी पूर्ण होवोत तुमच्या सर्व ईच्छा 
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!  

8. दुर्गा मातेचे नऊ अवतार
आई तुमच्यावर करो सुख, शांती, समाधानाचा वर्षाव अपार
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!  

(नक्की वाचा: Navratri Colours 2024: नवरात्रीच्या 9 दिवसांचे 9 रंग, जाणून घ्या प्रत्येक रंगाचे महत्त्व)

9. लक्ष्मीमातेचा आशीर्वादाचा हात 
सरस्वतीची असो साथ 
भगवान गणेशाचा घरात असो निवास 
दुर्गामातेचा डोक्यावर कायम असो हात
तुमच्या जीवनात कायम येवो प्रगतीचा प्रकाश 
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!  

10. देवी आई तुमच्या घरी येवो
आनंदाचा तुमच्यावर वर्षाव होवो
संकट तुमच्यापासून दूर जावो
नवरात्रीचा उत्सव तुमच्या जीवनात सुख-शांती-समाधान घेऊन येवो 
नवरात्रौत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा!  

Nashik| नवरात्रौत्सवात येवल्याचं जगदंबा माता मंदिर 24 तास खुलं राहणार