
Happy Teachers' Day 2025 Wishes In Marathi: शिक्षक म्हणजे आपल्या शिल्पकार आणि मार्गदर्शक. विद्यार्थ्यांना अज्ञानातून ज्ञानाच्या प्रकाशाकडे नेणारा दीपस्तंभ. जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर शिक्षकांची शिकवण वेळोवेळी कामी येते. भारतात दरवर्षी 5 सप्टेंबर रोजी शिक्षकांप्रति आदर, कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शिक्षक दिन (Teachers' Day 2025) साजरा केला जातो. तसेच हा दिवस म्हणजे भारताचे माजी राष्ट्रपती आणि महान शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस देखील आहे. शिक्षण क्षेत्रातील त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलंय. म्हणून डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्म दिवस 'शिक्षक दिन' म्हणून साजरा केला जातो. शिक्षक दिनानिमित्त (Teachers' Day Wishes In Marathi) तुम्ही तुमच्या गुरुप्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी खास मेसेज नक्की पाठवा.
शिक्षक दिन 2025| शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा| Happy Teachers' Day 2025 | Happy Teachers' Day 2025 Wishes In Marathi
1. तुम्ही आम्हाला केवळ पुस्तकातले ज्ञान दिले नाही
तर जीवन जगण्याची कला शिकवली
तुमच्या मार्गदर्शनामुळे आम्ही जे शिकलो, ते संपूर्ण आयुष्यभर साथ देईल
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !
2. शिक्षक म्हणून तुमचे आमच्या मनात श्रद्धेचे स्थान
तुमचे ज्ञान, समर्पण आणि प्रेमामुळे आम्हाला प्रेरणा मिळाली
शिक्षक दिनानिमित्त तुमचे मनापासून आभार आणि कोटी कोटी शुभेच्छा!
3. शिक्षक म्हणजे दीपस्तंभ
जो तिमारातूनही तेजाकडे घेऊन जातो
तो प्रकाश तुम्ही आमच्यासाठी आहात
शिक्षक दिनाच्या अनंत शुभेच्छा!
4. माझ्या जीवनातील मार्गदर्शक
तुमच्या मोलाच्या शिकवणुकीमुळेच
मला माझे आयुष्य योग्य मार्गावर नेता आले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि मनःपूर्वक धन्यवाद!
Happy Teachers Day 2025
5. तुमच्या प्रत्येक शब्दामध्ये आहे एक शिकवण
प्रत्येक कृतीत आहे एक आदर्श
तुमचे माझ्या आयुष्यात आहे मोठे योगदान
राहिल त्याची कायम आठवण
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
6. आपल्या शिकवणीने आम्हाला केवळ यशाकडे नव्हे
तर व्यक्तिमत्त्वही चांगले घडले
माझ्या जीवनातील तुमच्या अमूल्य योगदानासाठी शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
7. शब्द अपुरे आहेत तुमचे कौतुक करण्यासाठी
पण आजच्या दिवशी इतकंच म्हणावसे वाटते
माझ्या आयुष्याला आकार देण्यासाठी धन्यवाद
शिक्षक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
8. तुमचे धैर्य, शिस्त आणि समर्पण
आम्हाला नेहमीच प्रेरणा देत राहील
गुरु हे ज्ञानाचे दरवाजे उघडणारे किल्ली आहेत
तुम्ही आमच्यासाठी ती किल्ली बनलात
शिक्षक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा!
9. शिक्षक दिन म्हणजे तुमच्या योगदानाची आठवण करून देण्याचा दिवस
तुमचे ज्ञान आणि प्रेम आमच्या नेहमी सोबत असो
तुमच्यामुळे आम्ही विचार करायला शिकलो
स्वप्न पाहायला शिकलो आणि स्वतःवर विश्वास ठेवायला शिकलो
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
10. तुमचे शिकवणे आमच्यासाठी एक अमूल्य देणे आहे
Happy Teachers Day!
11. शिक्षक म्हणजे केवळ ज्ञान देणारे नाही
तर व्यक्तिमत्त्व घडवणारेही असतात
तुम्ही आमचे आयुष्य घडवले
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
12. आपण आम्हाला केवळ गुण मिळवायला नाही
तर जीवनात यशस्वी व्हायला शिकवले
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
13. तुमचे हसते, प्रेमळ आणि कधी कठोर
पण न्यायी स्वभाव आमच्यासाठी प्रेरणादायी ठरले
शिक्षक दिनाच्या लाख लाख शुभेच्छा!
14. तुमचे ज्ञान आमच्या जीवनात दिव्यासारखे उजळत राहो
आज आम्ही जे काही आहोत, ते तुमच्यामुळे
तुमचे मार्गदर्शन म्हणजे आमच्यासाठी वरदान
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
15. तुमच्या बोलण्यात एक विचार आहे
आणि तुमच्या अस्तित्वात एक आदर्श
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
16. माणूस घडवणे ही मोठी कला आहे
आणि ती तुम्ही उत्तमरित्या पार पाडली
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
17. तुमची शिकवणी म्हणजे अमृत
तुमचे योगदान कधीही न विसरता येणारे
शिक्षक दिनाच्या शुभेच्छा!
18. तुमच्या शिकवणुकीने आम्हाला आत्मविश्वास दिला
तुमच्या योग्य मार्गदर्शनामुळेच आम्ही आमचे ध्येय गाठू शकलो
शब्द अपुरे आहेत तुमचे कौतुक करण्यासाठी
शिक्षक दिनी तुमचे स्मरण करणे म्हणजे आमचे सौभाग्य
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
19. तुमच्या एका शब्दाने आयुष्य बदलू शकते, हे आम्ही अनुभवलंय
तुमचे धैर्य, शिस्त, आणि मार्गदर्शनामुळे जीवनाला योग्य दिशा मिळाली
तुमच्या कठोर शिकवणीमुळे आयुष्याला आकार मिळाला
शिक्षक दिन म्हणजे तुमच्या योगदानाचा गौरव करण्याचा दिवस
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
20. तुमच्या मार्गदर्शनाशिवाय आयुष्य अपूर्ण राहिले असते
तुमचे ज्ञान म्हणजे मार्गदर्शक दीप
शिक्षक म्हणजे एक अमूल्य ठेवा
आणि तुम्ही तर खजिनाच आहात
तुमचे अस्तित्वच ज्ञानाचे मंदिर
तुमचे शिकवणी केवळ पुस्तकी नव्हती
तर ते आयुष्याचं गमक होते
शिक्षक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही किंवा दावाही करत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world