Weight Loss Tips: रिकाम्या पोटी प्या या मसाल्याचे पाणी, चयापचयाची क्षमता सुधारण्यासह वजनही होईल झटकन कमी

Weight Loss Drink: प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये गरम मसाल्याचा स्वतंत्र डबा असतोच. गरम मसाल्यांमुळे स्वयंपाकाची चव वाढण्यासह आरोग्यासही पोषणतत्त्वांचा पुरवठा होतो. 

Advertisement
Read Time: 2 mins

Weight Loss Drink: भारतीय खाद्यपदार्थांमध्ये वापरल्या जाणाऱ्या गरम मसाल्यांचे विशेष असे महत्त्व आहे. गरम मसाल्यांमुळे स्वयंपाकाची चव वाढते आणि आरोग्यासही पोषकघटकांचाही पुरवठा होतो. आरोग्यासाठी फायदेशीर असणाऱ्या गरम मसाल्यातील जिऱ्याबाबतची महत्त्वपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत. जिऱ्याच्या फोडणीमुळे स्वयंपाक चविष्ट आणि रुचकर होतो. पण जिऱ्याचे पाणी (Jeera Water Benefits) योग्य पद्धतीने आणि योग्य प्रमाणात प्यायल्यास अनेक आजारांपासून सुटका होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे जाणून घेऊया...

रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यास अगणित फायदे मिळू शकतात. जिऱ्यातील पोषकघटकांमुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारण्यास मदत मिळते. त्यामुळे पोटाशी संबंधित समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांनी जिऱ्याचे पाणी पिणे सुरू केल्यास पचनप्रक्रिया सुरळीत सुरू राहील आणि कित्येक आजारांपासून शरीराचेही संरक्षण होईल.

जिऱ्याचे पाणी पिण्याचे फायदे

हल्लीच्या धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे आणि फास्ट फुड-जंक फुडच्या सेवनामुळे बहुतांश लोकांना पोट फुगण्याच्या समस्येचा सामना करावा लागतो. या समस्येपासून सुटका हवी असल्यास जिऱ्याचे पाणी करून प्यावे. यामुळे शरीराची चयापचयाची क्षमता सुधारण्यास मदत मिळते. चयापचयाची क्षमता मजबूत असेल तर शरीरातील अतिरिक्त फॅट्स देखील कमी होण्यास मदत मिळते. तसेच दिवसभर शरीरामध्ये ऊर्जा टिकून राहण्यास मदत मिळेल. 

जिऱ्याचे पाणी पिणे आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असते. पण जिऱ्यासह धणे, ओवा आणि बडिशेप देखील मिक्स करून पाणी गरम करून प्यायल्यास शरीरास मोठे लाभ मिळतील.

रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यास काय होते?

- सकाळी उठल्यानंतर चहा आणि कॉफीऐवजी जिऱ्याचे पाणी पिणे रामबाण उपाय ठरू शकतो. 
- सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफी पिणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते, कारण यामुळे शरीरातील अ‍ॅसिडची पातळी वाढते.  
- जिऱ्यामध्ये फायबरसह अन्य पोषणतत्त्वांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे, जे आरोग्यासाठी पोषक आहेत. 
- रिकाम्या पोटी जिऱ्याचे पाणी प्यायल्यास रक्ताभिसरणाची प्रक्रिया सुरळीत सुरू राहते. 
- शरीरातील इन्सुलिनची पातळी देखील संतुलित राहण्यास मदत मिळते. 

Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.